AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

यशस्वी जयस्वालच्या रनआऊटमुळे वाद, अनुभवी खेळाडूचा पंचांवर आरोप, Video पाहा आणि तुम्हीच ठरला

वेस्ट इंडिजविरुद्धच्या दुसऱ्या कसोटी सामन्यात पहिल्या डावात यशस्वी जयस्वालची द्विशतकाची संधी हुकली. यशस्वी जयस्वालचा डाव 175 धावांवर आटोपला. यशस्वी धावचीत होत तंबूत परतला. पण यात नेमकी चूक कोणाची? अनुभवी खेळाडूने पंचांवर थेट आरोप केला.

यशस्वी जयस्वालच्या रनआऊटमुळे वाद, अनुभवी खेळाडूचा पंचांवर आरोप, Video पाहा आणि तुम्हीच ठरला
यशस्वी जयस्वालच्या रनआऊटमुळे वाद, अनुभवी खेळाडूचा पंचांवर आरोप, Video पाहा आणि तुम्हीच ठरलाImage Credit source: video grab/X
| Updated on: Oct 11, 2025 | 5:52 PM
Share

भारत आणि वेस्ट इंडिज यांच्यातील दुसऱ्या कसोटीच्या दुसऱ्या दिवसाचा खेळ संपला. वेस्ट इंडिज 140 धावांवर 4 गमावले आहेत. दरम्यान, भारताने पहिला डाव 5 गडी बाद 518 धावांवर घोषित केला होता. त्यामुळे भारताकडे अजूनही 378 धावांची आघाडी आहे. ही आघाडी मोडून काढणं वेस्ट इंडिजला कठीण जाणार आहे. दुसरीकडे, तिसऱ्या दिवशी झटपट विकेट काढाव्या लागणार आहेत. असं असताना दुसऱ्या दिवशीच्या पहिल्या सत्रात यशस्वी जयस्वाल धावचीत होत तंबूत परतला. खरं तर कसोटी सामन्यात धावचीत होणं हा क्रीडाप्रेमींच्या मते गुन्हा आहे. कारण तुमच्यावर चोरटी धाव घेण्याचं तसं काही दडपण नसतं. पण ही चूक यशस्वी जयस्वालला महागात पडली. 175 धावांवर असताना धावचीत झाला आणि तंबूत परतला. त्यामुळे द्विशतकाची संधी हुकली. पण रनआऊटची चर्चा रंगली आहे.

यशस्वीने मिड ऑफच्या दिशेने चेंडू मारला आणि धाव घेतली. पण शुबमन गिलने त्याला नकार दिला. त्यामुळे त्याला अर्ध्यातून परतावं लागलं. यात जयस्वाल धावचीत झाला. आता रनआऊट करताना विकेटकीपरच्या हाती चेंडू होता का यावरून वाद निर्माण झाला आहे. या निर्णयासाठी अनिल कुंबलेने पंचांना धारेवर धरलं आहे. दाद मागण्यासाठी पंचांनी हा निर्णय तिसऱ्या पंचांकडे का सोपावला नाही. अनिल कुंबळे म्हणाले की, ‘चेंडू कीपरच्या पूर्णपणे नियंत्रणात नव्हता. त्यामुळे हा निर्णय तिसऱ्या पंचांकडे जायला हवा होता. त्यामुळे आश्चर्य वाटलं. बेल्स उडवल्या तेव्हा चेंडू हातात होता की नाही याबाबत शंका होती.’

दुसरीकडे, यशस्वी धावचीत होण्यासाठी गिल जबाबदार होता का? असा प्रश्नही अनेक जण विचारत आहेत. अनिल कुंबळे यांनी सांगितलं की, ‘ही यशस्वी जयस्वालची चूक होती. कारण चेंडू थेट मि़ड ऑफच्या खेळाडूकडे गेला होता. त्यामुळे काहीच संधी नव्हती. त्याची खेळण्याची पद्धत आज थोडी वेगळी होती. मला वाटलं की पहिल्या दिवशीच्या माइंडसेटने येईल. पण तो काल संध्याकाळच्या माइंडसेटने उतरला होता. त्यामुळे मला आश्चर्य वाटलं होतं. तो मोठ्या खेळीसाठी सेट झाला होता.’

Follow Us
तुषार गांधींना ताब्यात घेतल्याने राजकीय वातावरण तापलं! आदित्य ठाकरे...
तुषार गांधींना ताब्यात घेतल्याने राजकीय वातावरण तापलं! आदित्य ठाकरे, संजय राऊत पोलीस ठाण्यात दाखल
दिल्लीतील आंदोलकांच्या धरपकडीवर राज ठाकरे आक्रमक; सरकारवर साधला निशाणा
दिल्लीतील आंदोलकांच्या धरपकडीवर राज ठाकरे आक्रमक; सरकारवर साधला निशाणा
कधीकाळी ऐतिहासिक वारसा म्हणून ओळख; चालुक्यकालीन महादेव मंदिर बारव...
कधीकाळी ऐतिहासिक वारसा म्हणून ओळख; चालुक्यकालीन महादेव मंदिर बारव नष्ट होण्याच्या मार्गावर
इथे आजीचं निधन, तिथे अभिजीत दिपके पोलिसांच्या ताब्यात; अंत्यदर्शनाला..
इथे आजीचं निधन, तिथे अभिजीत दिपके पोलिसांच्या ताब्यात; अंत्यदर्शनालाही मुकणार, कुटुंबिय म्हणाले आता...
अरविंद केजरीवाल, सिसोदीया यांना ताब्यात घेतलं, दिल्लीतील आंदोलनात...
मोठी बातमी! अरविंद केजरीवाल, सिसोदीया यांना ताब्यात घेतलं, दिल्लीतील आंदोलनात धरपकड सुरूच
सोलापूरमध्ये दुष्काळाची भीषण स्थिती! 10 तालुक्यांत केंद्रीय पथकाची...
सोलापूरमध्ये दुष्काळाची भीषण स्थिती! 10 तालुक्यांत केंद्रीय पथकाची पाहणी, खरीप पिकांचे मोठे नुकसान
Mamata Banerjee | दिल्ली पोलिसांनी ममता बॅनर्जीना ताब्यात घेतलं
Mamata Banerjee | दिल्ली पोलिसांनी ममता बॅनर्जीना ताब्यात घेतलं, मोठं कारण समोर
नाशिकच्या कांदा उत्पादकांसाठी चिंतेची बातमी! येत्या काळात कांद्याचे दर
नाशिकच्या कांदा उत्पादकांसाठी चिंतेची बातमी! येत्या काळात कांद्याचे दर वाढणार?
कोल्हापूरच्या अंबाबाई दर्शनासाठी हायटेक नियोजन! QR कोड स्कॅन करताच...
कोल्हापूरच्या अंबाबाई दर्शनासाठी हायटेक नियोजन! QR कोड स्कॅन करताच मिळणार 'ही' सुविधा
काँग्रेसच्या काळातील SIRवर आक्षेप का नाही घेतला? - नितेश राणे
Nitesh Rane | काँग्रेसच्या काळातील SIRवर आक्षेप का नाही घेतला? - नितेश राणे