AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

क्रिकेटपटू फरखांदा अझीझ खान हिला खंडणी आणि ‘त्या’ प्रकरणात जामीन मंजूर , काय केलं होतं?

जम्मू काश्मीरची महिला क्रिकेटपटू हिला कथित सेक्सटॉर्शन आणि खंडणी प्रकरणात अटक करण्यात आली होती. एप्रिल महिन्यात हे प्रकरण घडलं होतं. त्यानंतर प्रकरण न्यायालयात वर्ग झालं होतं. आता जवळपास अडीच महिन्यानंतर तिला जामीन मंजूर झाला आहे. नेमका काय गुन्हा केला होता ते जाणून घ्या

क्रिकेटपटू फरखांदा अझीझ खान हिला खंडणी आणि 'त्या' प्रकरणात जामीन मंजूर , काय केलं होतं?
क्रिकेटपटू फरखांदा अझीझ खान हिला खंडणी प्रकरणात जामीन मंजूर , काय केलं होतं?Image Credit source: प्रातिनिधीक फोटो
| Updated on: Jul 18, 2026 | 6:25 PM
Share

जम्मू काश्मीरची महिला क्रिकेटपटूला अटक केल्यानंतर क्रीडाविश्वात एकच खळबळ उडाली होती. नेमकं काय झालं? म्हणून चर्चांना उधाण आलं होतं. पण तिने केलेलं कृत्य आणि आरोप पाहता अनेकांना धक्का बसला. मुंबई गुन्हे शाखेने जम्मू काश्मीर टी20 लीगशी संबंधित महिला क्रिकेटपटूला तिच्या भावासह सेक्सटॉर्शन आणि खंडणी प्रकरणात अटक केली होती. बारामुल्ला जिल्ह्यातील बोनियार तहसीलची रहिवासी असलेल्या फरखांदा खानला तिचा भाऊ बाझिल खान याच्यासह या वर्षी एप्रिलमध्ये नवी दिल्लीतील एका हॉटेलमधून अटक करण्यात आली होती. त्यानंतर त्यांचा साथीदार इम्तियाज उद्दीन वानी याला श्रीनगरमधून अटक करण्यात आली होती. अडीच महिने तुरूंगाची हवा खाल्ल्यानंतर महिला क्रिकेटपटू फरखांदा अझीझ खान हिला एस्प्लेनेड न्यायालयाने 1 लाख रुपयांच्या वैयक्तिक जातमुचलक्यावर जामीन मंजूर केला आहे.

अभियोजन पक्षाच्या म्हणण्यानुसार, क्रिकेटपटू फरखांदा खानने कथितरित्या एका 28 वर्षीय व्यावसायिकाशी फोनवरून आणि ऑनलाइन चॅटद्वारे संपर्क साधला होता. हा इसम कुलाबा येथे राहणारा आहे. 2024 साली सदर इसमाची फरखांदा खान हिच्यासोबत पश्चिम उपनगरात ओळख झाली होती. मोबाईल चॅट्समधून त्यांची ओळख वाढत गेली. त्यानंतर आरोपीने अश्लील संभाषण सुरू झालं. त्यानंतर पीडित इसम जाळ्यात अडकल्याचं पाहून फरखांदा खानने प्लान रचला. पोलिसांनी पुढे माहिती देत सांगितलं की, तिने तिचा भाऊ बाझिल खान आणि साथीदार इम्तियाज वानी यांच्यासोबत मिळून पीडित व्यक्तीला धमकावण्याचा सपाटा लावला. तसेच त्याच्याकडे पैशांची मागणी केली. पण त्याने सुरूवातील पैसे देण्यास नकार दिला तेव्हा तिने खासगी चॅट सार्वजनिक करण्याची धमकी दिली. या भीतीपोटी पीडित व्यक्तीने 30 एप्रिल 2024 ते 13 जानेवारी 2026 दरम्यान 32 बँक ट्रान्झक्शनच्या माध्यमातून तब्बल 63 लाख रुपये ट्रान्सफर केले.

पीडित व्यक्तीने या रकमेचा बराचसा भाग इम्तियाज वाणी खात्यात ट्रान्सफर केला होता. तसेच काही रक्कम फरखांदाचे वडील अब्दुल अझीझ खान यांच्या खात्यातही वर्ग केली होती. पीडित व्यक्ती घाबरल्याचं पाहून वानी आणि बाझिल खानने त्याला धमक्या देणं सुरूच ठेवलं. सदर चॅट उघड करून तुरूंगवारी घडवू अशी भीती दाखवली. या धमक्यांना घाबरून जानेवारी 2026 मध्ये पीडित व्यक्तीने आरोपींच्या खात्यात 40 लाख ट्रान्सफर केले होते. पण इतके पैसे वर्ग करूनही ब्लॅकमेलिंग काही थांबलं नाही. त्यामुळे त्याने पोलिसात तक्रार केली. अखेर पोलिसांनी फरखांदा आणि तिला साथ देणाऱ्या दोघांन अटक केली.

Follow Us
Burger King च्या पुणे आउटलेटला मोठा झटका! FDA ने परवानाच रद्द केला
Burger King च्या पुणे आउटलेटला मोठा झटका! FDA ने परवाना रद्द केला, नेमकं कारण काय?
काँग्रेसने लोकशाहीचा मुडदा पाडला; राहुल गांधींवर एकनाथ शिंदेंचा घणाघात
Eknath shinde | काँग्रेसने लोकशाहीचा मुडदा पाडला; राहुल गांधींवर एकनाथ शिंदेंचा घणाघात, 45 सरकारांचा दाखला देत म्हणाले...
शेताला साडी नेसवली अन् रानडुकरांना पळवलं! शेतकऱ्यांची भन्नाट शक्कल
Nagpur Farmer | शेताला साडी नेसवली अन् रानडुकरांना पळवलं! नागपूरच्या शेतकऱ्यांची भन्नाट शक्कल चर्चेत, व्हिडिओ होतोय व्हायरल
राहुल गांधींच्या मिमिक्रीने नवा वाद! मिठ्या मारणं म्हणजे...
Rahul Gandhi | राहुल गांधींच्या मिमिक्रीने नवा वाद! मिठ्या मारणं म्हणजे परराष्ट्र धोरण नाही म्हणत मोदींवर निशाणा
शिवसेना तालुकाप्रमुखाला जीवे मारण्याची धमकी? ऑडिओ व्हायरल
तू तेव्हा वाचला आहेस, आता वाचणार नाहीस! शिवसेना तालुकाप्रमुखाला जीवे मारण्याची धमकी? ऑडिओ व्हायरल
केळेवाडी ते चर्नी रोड पूल कधी होणार? मनसेचा प्रशासनाला सवाल
MNS Protest | केळेवाडी ते चर्नी रोड पूल कधी होणार? मनसेचा प्रशासनाला सवाल; आंदोलन पेटलं
हातात बंदुका, आता रॅम्पवर कॅटवॉक! नक्षलवाद्यांचा भन्नाट नवा अवतार बघाच
Ramp Walk | हातात बंदुका, आता रॅम्पवर कॅटवॉक! आत्मसमर्पित महिला नक्षलवाद्यांचा भन्नाट नवा अवतार बघाच
Jalna Triple S City! मुख्यमंत्री फडणवीसांचा मोठा प्लॅन....
Jalna Triple S City! मुख्यमंत्री फडणवीसांचा मोठा प्लॅन; रेशीम उद्योगाला मिळणार नवी झेप
राष्ट्रवादी शरद पवारांचीच!; सुप्रिया सुळेंचं मोठं विधान
Supriya Sule | राष्ट्रवादी शरद पवारांचीच!; सुप्रिया सुळेंचं मोठं विधान, नेमकं काय म्हणाल्या...
2027 च्या जनगणनेत जात, ओळख आणि कोविड लस संबंधित माहितीचा समावेश
2027 च्या जनगणनेत जात, ओळख आणि कोविड लस संबंधित माहितीचा समावेश