AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

युवराज सिंग पंजाबच्या गुरुदासपूरमधून निवडणुकीच्या रिंगणात! ‘या’ पक्षाकडून निवडणूक लढवण्याची चर्चा

आयपीएलसोबत आता लोकसभा निवडणुकीचे वारे वाहू लागले आहेत. यासाठी सर्वच पक्षांकडून आऊटगोईंग इनकमिंग सुरु आहे. सध्या सर्वाधिक भरणा भारतीय जनता पार्टीत आहे. अनेक राजकीय नेत्यांनी या पक्षात उड्या मारल्या आहेत. दुसरीकडे, पंजाबमध्ये आम आदमी पार्टीची सत्ता आहे. त्यामुळे पंजाबच्या गुरूदासपूरमधून कोण निवडणूक लढवणार यासाठी मोर्चेबांधणी सुरु झाली आहे.

युवराज सिंग पंजाबच्या गुरुदासपूरमधून निवडणुकीच्या रिंगणात! 'या' पक्षाकडून निवडणूक लढवण्याची चर्चा
युवराज सिंग क्रिकेटनंतर या पक्षाकडून राजकीय मैदान गाजवणार! राजकीय नेत्यांच्या भेटीगाठीनंतर चर्चांना उधाण
| Updated on: Feb 13, 2024 | 5:07 PM
Share

मुंबई : माजी क्रिकेटपटू युवराज सिंगने क्रिकेटमध्ये एक काळ गाजवला आहे. 2007 टी20 वर्ल्डकप स्पर्धेत युवराज सिंगने सलग सहा षटकार ठोकले होते. तसेच वर्ल्डकप विजयात मोलाची साथ दिली होती. त्यानंतर वनडे वर्ल्डकप 2011 स्पर्धेतही युवराज सिंगची बॅट चालली होती. कँसरशी झुंज देत वर्ल्डकपचं जेतेपद मिळवून दिलं होतं. आयपीएलमध्ये युवराज सिंगचा बोलबाला पाहायला मिळाला आहे. असं असताना युवराज सिंग आता नव्या इनिंगसाठी सज्ज झाल्याची चर्चा रंगली आहे. लोकसभा निवडणुकीत युवराज सिंग भाजपाकडून रिंगणात उतरणार असल्याची माहिती समोर येत आहे. केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांनी युवराज सिंग यांच्या कुटुंबियांची भेट घेतल्यानंतर या चर्चांना उधाण आलं आहे. पंजाबच्या गुरुदासपूरमधून निवडणुकीच्या रिंगणात उतरणार असल्याचं सांगण्यात येत आहे. बॉलिवूड अभिनेता सनी देओल मागच्या लोकसभा निवडणुकीत या मतदारसंघातून भाजपाकडून जिंकला होता. आता या जागेसाठी युवराज सिंग याच्या नावाची चर्चा होत आहे.

एकीकडे चर्चांना उधाण आलं असतान युवराजच्या कुंटुंबाकडून कोणतीही माहिती समोर आलेली नाही. त्यामुळे बातम्यांच पेव फुटलं आहे. राजकीय प्रवेशाच्या बातम्यांना अधिक बळ मिळताना दिसत आहे. युवराज सिंगचा साथीदार गौतम गंभीर यापूर्वी भाजपाच्या तिकिटावर लोकसभेत पोहोचला आहे. तर हरभजन सिंगला आपकडून राज्यसभेवर खासदार म्हणून नियुक्त करण्यात आलं आहे. मोहम्मद अझरुद्दीन आणि कीर्ती आझाद यांनीही लोकसभेची निवडणूक लढवली आहे. त्यामुळे युवराज सिंगही निवडणुकीच्या रिंगणात दिसला तर आश्चर्य वाटायला नको.

पंजाबच्या गुरुदासपूरमधून भाजपाच्या तिकीटावर सनी देओलने 82,459 मतांनी विजय मिळवला होता. सनी देओलला 5,58,719 मतं पडली होती. तर काँग्रेसचा उमेदवार सुनिल जाखरला 4,76,260 मतं पडली होती. दुसरीकडे, 2017 मध्ये अभिनेता विनोद खन्ना यांच्या निधनानंतर गुरुदारपूरमध्ये पोटनिवडणूक झाली होती. तेव्हा जाखर यांनी विजय मिळवला होता.

युवराज सिंगची क्रिकेट कारकिर्द

युवराज सिंगने टीम इंडियासाठी 40 कसोटी, 304 एकदिवसीय आणि 58 टी20 सामने खेळला आहे. कसोटीत 1900 धावा आणि 9 गडी बाद केले आहेत. तर वनडेत 8701 धावा आणि 111 विकेट्स घेतल्या आहेत. तर टी20 क्रिकेटमध्ये 1177 धावा करत 28 गडी नावावर केले आहेत.

नाशिकच्या सिंहस्थ कुंभमेळ्याच्या कामावर साधू महंतांची नाराजी
नाशिकच्या सिंहस्थ कुंभमेळ्याच्या कामावर साधू महंतांची नाराजी.
मुंबईला नवा महापौर कधी मिळणार? तारखेबाबत मोठी अपडेट
मुंबईला नवा महापौर कधी मिळणार? तारखेबाबत मोठी अपडेट.
शेतकरी संकटात, बदलत्या हवामानामुळे रब्बी हंगामातील पिके धोक्यात
शेतकरी संकटात, बदलत्या हवामानामुळे रब्बी हंगामातील पिके धोक्यात.
परप्रांतीयांना मुभा, मराठी माणसावर कारवाई... डोंबिवलीत मनसे आक्रमक
परप्रांतीयांना मुभा, मराठी माणसावर कारवाई... डोंबिवलीत मनसे आक्रमक.
मेलो तरी बेहत्तर, दोन व्यापाऱ्यांचा गुलाम बनून जगणार नाही
मेलो तरी बेहत्तर, दोन व्यापाऱ्यांचा गुलाम बनून जगणार नाही.
ते तर 12 जणांची प्रेयसी; भाजपने राऊतांना डिवचलं
ते तर 12 जणांची प्रेयसी; भाजपने राऊतांना डिवचलं.
शिवसेना- भाजपची गट स्थापना घटस्थापनेपर्यंत जाऊ शकते
शिवसेना- भाजपची गट स्थापना घटस्थापनेपर्यंत जाऊ शकते.
मंत्री छगन भुजबळ यांच्या निर्दोष मुक्ततेनंतर राजकारण तापलं
मंत्री छगन भुजबळ यांच्या निर्दोष मुक्ततेनंतर राजकारण तापलं.
शिंदेंना राज ठाकरेंचा लवचिक पाठिंबा, राजकीय वर्तुळात चर्चा
शिंदेंना राज ठाकरेंचा लवचिक पाठिंबा, राजकीय वर्तुळात चर्चा.
अकोल्यात राजकीय समीकरणं बदलली भाजपविरोधात एकजूट, वंचितचं नवं पर्व सुरू
अकोल्यात राजकीय समीकरणं बदलली भाजपविरोधात एकजूट, वंचितचं नवं पर्व सुरू.