IND W vs AUS W | दीप्ती शर्माचा कारनामा, ऑस्ट्रेलिया विरुद्ध ऐतिहासिक कामगिरी

Deepti Sharma वूमन्स टीम इंडियाला दुसऱ्या टी 20 सामन्यात पराभवाचा सामना करावा लागला. ऑस्ट्रेलियाने सामना जिंकत मालिकेत बरोबरी केली. मात्र दीप्ती शर्मा हीने ऐतिहासिक कामगिरी केली.

IND W vs AUS W | दीप्ती शर्माचा कारनामा, ऑस्ट्रेलिया विरुद्ध ऐतिहासिक कामगिरी
Follow us
| Updated on: Jan 08, 2024 | 3:21 PM

नवी मुंबई | वू्मन्स ऑस्ट्रेलिया विरुद्ध टीम इंडिया यांच्यातील दुसरा आणि निर्णायक टी 20 सामना हा रविवारी 7 जानेवारी रोजी पार पडला. या सामन्याचं आयोजन हे नवी मुंबईतील डी वाय पाटील स्टेडियममध्ये करण्यात आलं होतं. टीम इंडियाने पहिला सामना जिंकल्याने ऑस्ट्रेलियासाठी 3 सामन्यांच्या मालिकेतील हा दुसरा सामना महत्त्वाचा होता. ऑस्ट्रेलियाने करा या मरा स्थितीत हा सामना जिंकला आणि मालिकेत बरोबरी साधली.

दीप्ती शर्मा हीने केलेल्या 30 धावांच्या जोरावर टीम इंडियाला 8 विकेट्स गमावून 20 ओव्हरमध्ये 130 धावा करता आल्या. ऑस्ट्रेलियाने विजयासाठी मिळालेलं 131 धावांचं आव्हान हे 1 ओव्हर राखून आणि 4 विकेट्स गमावून पूर्ण केलं. टीम इंडियाकडून दीप्ती शर्मानेच सर्वाधिक 2 विकेट्स घेतल्या. या सामन्यात दीप्ती शर्मा हीने इतिहास रचला. दीप्तीने ऑस्ट्रेलिया विरुद्ध 29 धाव घेताच इतिहास घडवला.

हे सुद्धा वाचा

दीप्ती शर्माने टी 20 मध्ये 1 हजार धावा पूर्ण केल्या. तसेच याआधीच दीप्तीने विकेट्सचं शतक पूर्ण केलं होतं. दीप्ती अशाप्रकारे टीम इंडियाकडून 100 विकेट्स आणि 1 हजार धावा पूर्ण करणारी पहिली महिला क्रिकेटपटू ठरली. दीप्तीला दुसऱ्या टी 20 सामन्याआधी 1 हजार धावांचा टप्पा पार करण्यासाठी 29 धावांची गरज होती. दीप्तीच्या नावावर 102 सामन्यांमधील 72 डावात 971 धावांची नोंद होती. दीप्तीने ऑस्ट्रेलिया विरुद्ध 29 वी धाव पूर्ण करताच 1 हजार धावा पूर्ण केल्या.

दीप्तीची कामगिरी

दीप्तीने आधी बॅटिंग करताना 27 चेंडूत 5 चौकारांच्या मदतीने 30 धावा केल्या. तसेच त्यानंतर 4 ओव्हरमध्ये 22 धावांच्या मोबदल्यात 2 विकेट्स घेतल्या. दीप्तीने एलिसा हीली आणि बेथ मूनी या दोघींना मैदानाबाहेरचा रस्ता दाखवला.

टीम इंडिया प्लेईंग इलेव्हन | हरमनप्रीत कौर (कॅप्टन), स्मृती मंधाना, शफाली वर्मा, जेमिमाह रॉड्रिग्स, दीप्ती शर्मा, ऋचा घोष (विकेटकीपर), अमनजोत कौर, पूजा वस्त्राकर, श्रेयंका पाटील, रेणुका ठाकूर सिंग आणि तितास साधू.

ऑस्ट्रेलिया प्लेईंग इलेव्हन | एलिसा हिली (कॅप्टन आणि विकेटकीपर), बेथ मूनी, ताहलिया मॅकग्रा, एलिस पेरी, अॅश्ले गार्डनर, फोबी लिचफील्ड, ग्रेस हॅरिस, अॅनाबेल सदरलँड, जॉर्जिया वेरहॅम, किम गर्थ आणि मेगन शूट.

Non Stop LIVE Update
मग आता सभा घेऊन कुणाच पोर खेळवणार? राज ठाकरेंना कुणी लगावला खोचक टोला?
मग आता सभा घेऊन कुणाच पोर खेळवणार? राज ठाकरेंना कुणी लगावला खोचक टोला?.
किरण सामंतांची भावावर नाराजी? कार्यालयावरील उदय सामंतांचे बॅनर हटवले
किरण सामंतांची भावावर नाराजी? कार्यालयावरील उदय सामंतांचे बॅनर हटवले.
शिवसेना का सोडली? बाळासाहेबांना लिहिलेल्या पत्रात राणेंनी काय म्हटलं?
शिवसेना का सोडली? बाळासाहेबांना लिहिलेल्या पत्रात राणेंनी काय म्हटलं?.
महायुतीत कुठल्या पक्षाला, किती जागा? जागावाटपाचा फॉर्म्युला कसा?
महायुतीत कुठल्या पक्षाला, किती जागा? जागावाटपाचा फॉर्म्युला कसा?.
हेमंत गोडसेंना नाशिक लोकसभेची उमेदवारी, छगन भुजबळ नाराज? काय म्हणाले?
हेमंत गोडसेंना नाशिक लोकसभेची उमेदवारी, छगन भुजबळ नाराज? काय म्हणाले?.
ठाणे लोकसभेतून उमेदवारी जाहीर, नरेश म्हस्केंची पहिली प्रतिक्रिया काय?
ठाणे लोकसभेतून उमेदवारी जाहीर, नरेश म्हस्केंची पहिली प्रतिक्रिया काय?.
अखेर कल्याण-ठाण्याचे उमेदवार शिंदे गटातून जाहीर, कुणाला लोकसभेच तिकीट?
अखेर कल्याण-ठाण्याचे उमेदवार शिंदे गटातून जाहीर, कुणाला लोकसभेच तिकीट?.
मुख्यमंत्र्यांची पुन्हा तत्परता; रस्त्यात अपघात, शिंदेंनी ताफा थांबवला
मुख्यमंत्र्यांची पुन्हा तत्परता; रस्त्यात अपघात, शिंदेंनी ताफा थांबवला.
घोडे समजून ज्यांना घेतलं ती खेचरं अन्.. ठाकरेंची शिंदे-फडणवीसांवर टीका
घोडे समजून ज्यांना घेतलं ती खेचरं अन्.. ठाकरेंची शिंदे-फडणवीसांवर टीका.
आमच्या डोक्यात प्रकाश पडायला 17 वर्ष लागली, अजितदादांचा निशाणा कुणावर?
आमच्या डोक्यात प्रकाश पडायला 17 वर्ष लागली, अजितदादांचा निशाणा कुणावर?.