माझ्या करिअरचा टर्निंग प्वॉइंट…! सारा तेंडुलकरने घेतलेल्या मुलाखतीत क्रिकेटपटूने व्यक्त केल्या भावना
मास्टर ब्लास्टर सचिन तेंडुलकरची कन्या सारा ही या ना त्या कारणाने नेहमीच चर्चेत असते.आता तिने घेतलेल्या एका मुलाखतीमुळे चर्चेत आली आहे. या मुलाखतीत तिने क्रिकेटपटूला बोलतं केलं. तसेच तिच्या प्रवासाबाबत जाणून घेतलं.

मास्टर ब्लास्टर सचिन तेंडुलकर यांची कन्या सारा तेंडुलकर मल्टी टॅलेंटेड आहे. तिने फॅशन, फिटनेस, बिझनेस आणि सोशल वर्कमध्ये बरंच काही केलं आहे. सोशल मीडियावर ती कायम सक्रिय असते. तसेच अपडेट टाकत असते. आता तिचा नवा अंदाज समोर आला आहे. तिचा हा अंदाज चाहत्यांच्या पसंतीस उतरला आहे. कारण सारा तेंडुलकरने एक मुलाखत घेतली आहे. सारा तेंडुलकर एक पिलाटे अकादमी चालवते. या अकादमीत तिने एका क्रिकेटपटूची मुलाखत घेतली. ही क्रिकेटपटू दुसरी तिसरी कोणी नसून भारतीय संघाची अष्टपैलू दीप्ती शर्मा आहे. तिच्या या मुलाखतीचा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. दीप्ती शर्मा मागच्या महिन्यात सारा तेंडुलकरच्या पिलाटे अकादमीत गेली होती. मुंबईतील प्रसिद्ध अकादमी म्हणून ख्याती आहे. तिथे तिने सारासोबत वर्कआऊट केलं. इतकंच क्या दोघांनी खाणंपिणं आणि फिटनेसबाबत चर्चा केली. याचा व्हिडीओ सोशल मीडियावर पोस्ट केला आहे.
सारा तेंडुलकरने दीप्ति शर्माला क्रिकेट प्रवासाबाबत विचारलं. तेव्हा दीप्तिने सांगितलं की, ‘मी जेव्हा 8 किंवा 9 वर्षांची होती तेव्हा क्रिकेट खेळणं सुरू केलं होतं. माझी भावंडे क्रिकेट खेळायची आणि ते पहिल्यांदा मला मैदानात घेऊन गेले. तेव्हा तिथे मी एक थ्रो केला. यात चेंडू थेट विकेटला जाऊन लागला. हा माझ्या क्रिकेट करिअरचा टर्निंग पॉइंट होता.’ दीप्ति शर्माने वनडे वर्ल्डकप स्पर्धेत चमकदार कामगिरी केली होती. संघाच्या विजयात तिने मोलाचं योगदान दिलं होतं. फलंदाजी तसेच गोलंदाजीतही अष्टपैलू कामगिरी केली होती.
View this post on Instagram
सारा तेंडुलकर सचिन तेंडुलकर फाउंडेशनची डायरेक्टर आहे. यात स्पोर्ट्स, हेल्थ आणि एज्युकेशनच्या माध्यमातून गरीब मुलांची मदत केली जाते. सारा तेंडुलकर मल्टी टॅलेंटेड असून लंडनच्या क्लिनिकल अँड पब्लिक हेल्थ न्यूट्रिशनमध्ये मास्टर्स केलं आहे. ती रजिस्टर्ड न्यूट्रिशनिस्ट आहे. यासह तिने मॉडलिंगमध्येही नावलौकिक मिळवला आहे. सारा सोशल मिडिया इन्फ्लुएंसर आहे. तिने ई-स्पोर्ट्समध्येही गुंतवणूक केली आहे. सारा आपल्या शिक्षणाचा आणि न्यूट्रिशनचा वापर फाउंडेशनसाठी करते. सारा तेंडुलकरचे कोट्यवधि फॉलोअर्स आहेत.
