WPL Final 2023 : मेग लॅनिंग हिचं प्लॅनिंग नेमकं कुठं बिघडलं, दिल्ली कॅपिटल्सच्या पराभवाची 5 मुख्य कारणे!

दिल्ली संघाने फायनल जिंकण्याची सुवर्णसंधी गमावली. दिल्लीच्या पराभवाची 5 मुख्य कारणं आहेत ज्यामुळे त्यांनी पराभव आपल्याकडे ओढावून घेतला.

WPL Final 2023 : मेग लॅनिंग हिचं प्लॅनिंग नेमकं कुठं बिघडलं, दिल्ली कॅपिटल्सच्या पराभवाची 5 मुख्य कारणे!
Follow us
| Updated on: Mar 27, 2023 | 5:12 PM

मुंबई : वूमन्स प्रीमिअर लीगचं पहिलं पर्व मुंबई इंडिअन्सने आपल्या नावावर करत ट्रॉफीवर नाव कोरलं आहे. मुंबईमधील ब्रेबॉर्न स्टेडियमवर झालेल्या सामन्यामध्ये दिल्ली कॅपिटल्स संघावर मात करत मुंबईच्या संघाने इतिहास रचलाय. दिल्ली संघाने 131 धावांचं लक्ष्य ठेवलं होतं ते मुंबईने 7 विकेट्स राखत पूर्ण करत सामना जिंकला. मात्र मात्र दिल्ली संघाने फायनल जिंकण्याची सुवर्णसंधी गमावली. दिल्लीच्या पराभवाची 5 मुख्य कारणं आहेत ज्यामुळे त्यांनी पराभव आपल्याकडे ओढावून घेतला.

कारण1

दिल्ली संघाने प्रथम फलंदाजी करण्याचा निर्णय घेतला होता. सलामीला मेग लॅनिंग आणि शफाली वर्मा आली होती. शफालीने आक्रमक सुरूवात केली होती. दुसऱ्याच ओव्हरमध्ये सिक्सर आणि फोर मारला मात्र त्याच ओव्हरमध्ये इस्सी वोंगच्या फुलटॉसवर ती बाद झाली. हा निर्णय वादग्रस्त ठरला खरा पण तिसऱ्या पंचांनीही तिला बाद ठरवलं. त्याच ओव्हरमध्ये अॅलिस कॅप्सीसुध्दा फुलटॉसवर बाद झाली. त्यानंतर आलेल्या जेमिमाह रॉड्रिग्सनेही दोन चौकार मारत कडक सुरूवात करून दिली होती. तिलाही फुलटॉसवर इस्सी वोंगने बाद करत दिल्लीला 3 मोठे धक्के दिले.

कारण 2

दिल्लीची सुरूवात खराब झाली होतीच कारण सुरूवातीच्या 3 विकेट्स तर गेल्याच होत्या त्यानंतर पार्टनरशीप होईल असं वाटत होतं. कारण मैदानावर मेग लॅनिंग होती, तिने एक बाजू लावून धरली होती. मात्र 12 ओव्हरमध्ये चुकीच्या कॉलमुळे लॅनिंग रनआऊट झाली आणि दिल्लीच्या डावाला उतरती कळा लागली. त्यावेळी दिल्लीच्या विकेट गेल्या होत्या 5 आणि धावसंख्या होती 74 नंतर 4 विकेट या 5 धावांमध्ये गेल्या.

कारण 3

महत्त्वाच्या खेळाडू मोठी खेळी करण्यात अपयशी ठरले. बॅटींग लाईनअपमधील एक खेळाडू जरी शेवटपर्यंत टिकली असली तर धावसंख्या वाढली असती. त्या मानाने राधा यादव आणि शिखा पांडे यांची भागीदारी खूप महत्त्वाची ठरली. 10 विकेटसाठी त्यांनी आक्रमक अर्धशतकी खेळी केली. या जोरावर संघाने 130 चा आकडा पार केला. त्यामुळे एक जरी फलंदाज मोठी खेळण्यात यशस्वी ठरली असती तर संघाच्या धावसंख्येत आणखी भर पडली असती.

कारण4

दिल्लीसाठी सर्वात घातक ठरली ती म्हणजे मुंबईची खेळाडू हेली मॅथ्यूज. हेलीने 16 व्या ओव्हरमध्ये एकही धाव न देता दोन विकेट घेतल्या. आपल्या स्पेलमध्ये हेलीने 2 विकेट्स घेत 2 ओव्हर मेडन टाकत फक्त 5 धावा दिल्या आणि 3 कॅचही घेतले. मुंबईच्या विजयात हेलीने महत्त्वाची भूमिका बजावली.

कारण5

मुंबईला दिलेल्या लक्ष्याचा पाठलाग करताना दिल्ली संघाने सुरूवातीला दोन विकेट्स घेत सामना झुकवला होता. मात्र हरमनप्रीत कौर आणि नॅट सायव्हर-ब्रंट यांची पार्टनरशीप त्यांना तोडता आली नाही. हरमनप्रीत बाद झाल्यावर सामना काहीसा फिरला होता. मात्र 19 ओव्हरमध्ये तब्बल 16 धावा निघाल्या आणि तिथेच सामना मुंबईने आपल्या पारड्यात झुकवला होता. 19 ओव्हरमध्ये जर कमी धावा गेल्या असत्या तर सामन्याचा निकाल वेगळा लागला असता.

मुंबई इंडियन्स प्लेइंग इलेव्हन| हरमनप्रीत कौर (कॅप्टन), यास्तिका भाटिया (विकेटकीपर), हेली मॅथ्यूज, नॅट सायव्हर-ब्रंट, मेली केर, पूजा वस्त्राकर, इस्सी वोंग, अमनजोत कौर, हुमैरा काझी, जिंतिमनी कलिता आणि सायका इशाक.

दिल्ली कॅपिट्ल्स प्लेइंग इलेव्हन | मेग लॅनिंग (कर्णधार), शफाली वर्मा, जेमिमाह रॉड्रिग्स, मारिझान कॅप, अॅलिस कॅप्सी, जेस जोनासेन, अरुंधती रेड्डी, तानिया भाटिया (विकेटकीपर), मिन्नू मणी, राधा यादव आणि शिखा पांडे.

Non Stop LIVE Update
'जो राम का नाही, वो किसी काम का नही, बाकी XXX', कुणाची जीभ घसरली?
'जो राम का नाही, वो किसी काम का नही, बाकी XXX', कुणाची जीभ घसरली?.
बच्चू कडू पोलीस अधिकाऱ्यांवर संतापले, अमरावतीत नेमकं काय घडतंय?
बच्चू कडू पोलीस अधिकाऱ्यांवर संतापले, अमरावतीत नेमकं काय घडतंय?.
नारायण राणे जो टोप घालतात त्याचे केसही पिकलेत, संजय राऊतांची खोचक टीका
नारायण राणे जो टोप घालतात त्याचे केसही पिकलेत, संजय राऊतांची खोचक टीका.
समाजवादी पक्षाला सोडचिठ्ठी देणार की नाही? अबू आझमी यांनी स्पष्टच म्हटल
समाजवादी पक्षाला सोडचिठ्ठी देणार की नाही? अबू आझमी यांनी स्पष्टच म्हटल.
निरूपम महाराष्ट्रद्रोही तर...शालिनी ठाकरेंचा शिंदेंना टोला काय?
निरूपम महाराष्ट्रद्रोही तर...शालिनी ठाकरेंचा शिंदेंना टोला काय?.
सभेपूर्वीच राणा-कडूंमध्ये वाद उफळला अन् आमने-सामने, प्रकरण नेमकं काय?
सभेपूर्वीच राणा-कडूंमध्ये वाद उफळला अन् आमने-सामने, प्रकरण नेमकं काय?.
कुत्र विचारत नाही त्यांना Y+ सुरक्षा, पार्थ पवारांवर कुणाचा निशाणा?
कुत्र विचारत नाही त्यांना Y+ सुरक्षा, पार्थ पवारांवर कुणाचा निशाणा?.
अजितदादांच राष्ट्रवादीतून बाहेर काढलय? कुणाच्या वक्तव्याने उडाली खळबळ
अजितदादांच राष्ट्रवादीतून बाहेर काढलय? कुणाच्या वक्तव्याने उडाली खळबळ.
परत जायचा रस्ता कुठून जातो, ते मी तुला... सभेत राणेंचा ठाकरेंना इशारा
परत जायचा रस्ता कुठून जातो, ते मी तुला... सभेत राणेंचा ठाकरेंना इशारा.
भिवंडीत भाजपचं 'कमळ' फुलणार की शरद पवारांची 'तुतारी' वाजणार?
भिवंडीत भाजपचं 'कमळ' फुलणार की शरद पवारांची 'तुतारी' वाजणार?.