AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

IPL 2022, DC vs CSK : दिल्ली कॅपिटल्सने टॉस जिंकला, चेन्नईची पहिले फलंदाजी, जाणून घ्या संघातील बदल

CSK आज पराभूत झाल्यास तो प्लेऑफच्या शर्यतीतून बाहेर गेलेला दुसरा संघ होईल. मुंबई इंडियन्स आधीच प्लेऑफच्या शर्यतीतून बाहेर आहे.

IPL 2022, DC vs CSK : दिल्ली कॅपिटल्सने टॉस जिंकला, चेन्नईची पहिले फलंदाजी, जाणून घ्या संघातील बदल
चेन्नईची पहिले फलंदाजीImage Credit source: tv9
| Updated on: May 08, 2022 | 7:48 PM
Share

मुंबई :  आयपीएलच्या (IPL 2022) पंधराव्या सीजनमधील आजच्या 55 वा सामना दिल्ली कॅपिटल्स (DC) आणि चेन्नई सुपर किंग्ज (CSK) यांच्यात डीवाय पाटील स्टेडियमवर खेळला जात आहे. दिल्लीचा कर्णधार ऋषभ पंतने नाणेफेक जिंकून प्रथम गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतला आहे. दिल्लीने दोन तर CSKने एका खेळाडूचा बदल केलाय. रवींद्र जडेजा या सामन्यासाठी तंदुरुस्त नाही त्यामुळे दुबे चेन्नईच्या प्लेइंग इलेव्हनमध्ये परतला आहे. दुसरीकडे पंतनं अक्षर पटेल आणि केएस भरतचा प्लेइंग इलेव्हनमध्ये समावेश केला आहे. मनदीप सिंग आणि ललित यादव बाद झाले आहेत. संघांबद्दल बोलायचे झाले तर दिल्ली कॅपिटल्सचा संघावर सध्या कोरोनाचं सावट आहे. अलीकडेच, डीसीच्या कॅम्पमध्ये कोरोनाचा शिरकाव झाल्यानं काही खेळाडूंसह सपोर्ट स्टाफला देखील कोरोनाची लागण झाली. या वातावरणाचा कुठेतरी दिल्लीच्या कामगिरीवर परिणाम होणार आहे. त्याचबरोबर धोनीचा चेन्नई सुपर किंग्ज प्लेऑफच्या शर्यतीतून बाद होण्यापासून एक पाऊल दूर आहे. CSK आज पराभूत झाल्यास तो प्लेऑफच्या शर्यतीतून बाहेर गेलेला दुसरा संघ होईल. मुंबई इंडियन्स आधीच प्लेऑफच्या शर्यतीतून बाहेर आहे.

दिल्ली कॅपिटल्सने टॉस जिंकला

दोन्ही संघातील प्लेइंग इलेवन

दिल्ली संंघात बदल?

दिल्ली कॅपिटल्स प्लेइंग इलेव्हन: डेव्हिड वॉर्नर, श्रीकर भरत, मिचेल मार्श, ऋषभ पंत (w/c), रोवमन पॉवेल, अक्षर पटेल, रिपल पटेल, शार्दुल ठाकूर, कुलदीप यादव, खलील अहमद, अ‍ॅनरिक नॉर्टजे

चेन्नई संंघात बदल?

चेन्नई सुपर किंग्ज प्लेइंग इलेव्हन : ऋतुराज गायकवाड, डेव्हॉन कॉनवे, रॉबिन उथप्पा, अंबाती रायडू, मोईन अली, एमएस धोनी (w/c), शिवम दुबे, ड्वेन ब्राव्हो, महेश थेक्षना, सिमरजीत सिंग, मुकेश चौधरी

 दिल्लीवर कोरोनाचं सावट

दिल्ली कॅपिटल्सचा संघावर सध्या कोरोनाचं सावट आहे. अलीकडेच, डीसीच्या कॅम्पमध्ये कोरोनाचा शिरकाव झाल्यानं काही खेळाडूंसह सपोर्ट स्टाफला देखील कोरोनाची लागण झाली. या वातावरणाचा कुठेतरी दिल्लीच्या कामगिरीवर परिणाम होणार आहे.

…तर प्लेऑफच्या शर्यतीतून बाद

धोनीचा चेन्नई सुपर किंग्ज प्लेऑफच्या शर्यतीतून बाद होण्यापासून एक पाऊल दूर आहे. CSK आज पराभूत झाल्यास, IPL 2022 मधून बाहेर काढलेला तो दुसरा संघ होईल, मुंबई इंडियन्स आधीच प्लेऑफच्या शर्यतीतून बाहेर आहे.

नाशिकच्या सिंहस्थ कुंभमेळ्याच्या कामावर साधू महंतांची नाराजी
नाशिकच्या सिंहस्थ कुंभमेळ्याच्या कामावर साधू महंतांची नाराजी.
मुंबईला नवा महापौर कधी मिळणार? तारखेबाबत मोठी अपडेट
मुंबईला नवा महापौर कधी मिळणार? तारखेबाबत मोठी अपडेट.
शेतकरी संकटात, बदलत्या हवामानामुळे रब्बी हंगामातील पिके धोक्यात
शेतकरी संकटात, बदलत्या हवामानामुळे रब्बी हंगामातील पिके धोक्यात.
परप्रांतीयांना मुभा, मराठी माणसावर कारवाई... डोंबिवलीत मनसे आक्रमक
परप्रांतीयांना मुभा, मराठी माणसावर कारवाई... डोंबिवलीत मनसे आक्रमक.
मेलो तरी बेहत्तर, दोन व्यापाऱ्यांचा गुलाम बनून जगणार नाही
मेलो तरी बेहत्तर, दोन व्यापाऱ्यांचा गुलाम बनून जगणार नाही.
ते तर 12 जणांची प्रेयसी; भाजपने राऊतांना डिवचलं
ते तर 12 जणांची प्रेयसी; भाजपने राऊतांना डिवचलं.
शिवसेना- भाजपची गट स्थापना घटस्थापनेपर्यंत जाऊ शकते
शिवसेना- भाजपची गट स्थापना घटस्थापनेपर्यंत जाऊ शकते.
मंत्री छगन भुजबळ यांच्या निर्दोष मुक्ततेनंतर राजकारण तापलं
मंत्री छगन भुजबळ यांच्या निर्दोष मुक्ततेनंतर राजकारण तापलं.
शिंदेंना राज ठाकरेंचा लवचिक पाठिंबा, राजकीय वर्तुळात चर्चा
शिंदेंना राज ठाकरेंचा लवचिक पाठिंबा, राजकीय वर्तुळात चर्चा.
अकोल्यात राजकीय समीकरणं बदलली भाजपविरोधात एकजूट, वंचितचं नवं पर्व सुरू
अकोल्यात राजकीय समीकरणं बदलली भाजपविरोधात एकजूट, वंचितचं नवं पर्व सुरू.