Dinesh Kartik : रवी शास्त्रींनी केली दिनेश कार्तिकची प्रशंसा, शास्त्रींनी नेमकं काय म्हटंल? वाचा ट्विट आणि दिनेशच्या कमबॅकविषयी

कार्तिकने 34 चेंडूत 66 धावांनी नाबाद खेळी करत आरसीबीला 16 धावांनी सामना जिंकून दिला. यानंतर दिनेश कार्तिकचं कौतुक होऊ लागलं. सोशल मीडियावर देखील त्या्चीच चर्चा रंगली. अशाच रवी शास्त्री यांनी देखील दिनेशचं तोंडभरुन कौतुक केलंय.

Dinesh Kartik : रवी शास्त्रींनी केली दिनेश कार्तिकची प्रशंसा, शास्त्रींनी नेमकं काय म्हटंल? वाचा ट्विट आणि दिनेशच्या कमबॅकविषयी
रॉयल चॅलेंजर्स बँगलोर दिनेश कार्तिक Image Credit source: ipl/bcci
Follow us
| Updated on: Apr 17, 2022 | 5:22 PM

मुंबई : आयपीएलच्या (IPL 2022) पंधराव्या हंगामात दिनेश कार्तिक (Dinesh Kartik) सध्या धडाकेबाज कामगिरी करतोय. गेल्या सामन्यानंतर केकेआरने (KKR) या अनुभवी खेळाडूला सोडले होते. रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुने यावर्षी मेगा लिलावात त्याला 5.50 कोटी रुपयांमध्ये निवडले. तेव्हापासून तो फ्रँचायझीसाठी एक महत्वाचं व्यक्तिमत्व बनला आहे. सहापैकी पाच वेळा तो नाबाद राहिला आहे. तसेच मॅच -विनिंग खेळी देखील गाजवताना दिसतो आहे. शनिवारी दिल्ली कॅपिटल्स विरुद्धच्या त्याच्या ताज्या खेळीत कार्तिकने 34 चेंडूत 66 धावांनी नाबाद खेळी करत आरसीबीला 16 धावांनी सामना जिंकून दिला. आपल्या खेळीदरम्यान त्याने पाच चौकार आणि पाच षटकारही ठोकले. आता या धडाकेबाज कामगिरीचं क्रिकेट प्रेमींकडून चांगलंच कौतुक झालं. सोशल मीडियावर देखील कार्तिकचीच चर्चा होती. यात एक महत्वाचं नाव समोर आलं. ते म्हणजे रवी शास्त्री यांचं. त्यांनी देखील दिनेशचं कौतुक केलं. त्यांनी दिनेशला टी 20 स्पेशल म्हटलंय.

रवी शास्त्री यांचे ट्विट

दिनेशनं खेळ सुरु ठेवला!

दिल्ली कॅपिटल्स विरुद्धच्या सामन्यात काल रॉयल चॅलेंजर्स बँगलोरच्या पाच बाद 92 धावा झाल्या होत्या. कठीण परिस्थिती होती. पण दिनेश कार्तिकने कुठलाही दबाव न घेता आपला खेळ सुरु ठेवला. त्याने 34 चेंडूत नाबाद 66 धावा फटकावल्या. यात पाच चौकार आणि पाच षटकार होते. सहाव्या विकेटसाठी दिनेश आणि शाहबाज अहमदमध्ये 55 चेंडूत नाबाद 97 धावांची भागीदारी झाली. दिनेशच्या या वादळी खेळीमुळेच आरसीबीला 189 ही डोंगराएवढी धावसंख्या उभारता आली. 18 व षटक टाकणाऱ्या मुस्तफिजुर रहमानच्या गोलंदाजीची दिनेश कार्तिकने वाट लावली. त्याच्या एका ओव्हरमध्ये 4,4,4,6,6,4, अशा 28 धावा वसूल केल्या. दिनेश कार्तिकच्या या खेळीनंतर यावर्षी ऑक्टोबरमध्ये ऑस्ट्रेलियात होणाऱ्या वर्ल्ड कप स्पर्धेत त्याला संघात स्थान देण्याची मागणी केली आहे. वयाच्या हिशोबाने दिनेश कदाचित निवड समिती सदस्यांना फिट वाटणार नाही. पण आजचा त्याचा फॉर्म पाहिला, तर त्याला भारतीय संघाबाहेर ठेवण हे आपलचं नुकसान करुन घेण्यासारखा आहे. मिडविकेट, कव्हर्सला तो जे काही चौकार-षटकार मारतोय, ते पाहून लाजबाव असेच शब्द तोंडातून बाहेर पडतात. सध्या कौन हैं प्रविण तांबे हा चित्रपट OTT वर गाजतोय. त्यामध्ये श्रेयस तळपदे एक डायलॉग बोलतो. ‘सर ये एज-वेज में विश्वास नही रखता’ दिनेशची सध्याची बॅटिंग पाहली की, हेच शब्द पहिले आठवतात.

इतर बातम्या

Devendra Fadnavis : दिल्ली प्रमाणे महाराष्ट्रात दंगली घडवण्याचा डाव, राऊतांचा आरोप; राज ठाकरेंपाठोपाठ फडणवीसही म्हणाले…

RR vs KKR Playing XI IPL 2022: दिग्गज गोलंदाजाचं राजस्थानच्या संघात कमबॅक, कोलकात्याची टीम जैसे थे!

Pune crime : पाणीपुरवठा विभागाच्या आवारातून चोरले लोखंडी पाइप; दोन प्लंबरसह चौघांना पिंपरी-चिंचवड पोलिसांनी केली अटक

Non Stop LIVE Update
2017 ला कुठे बैठक झाली? हे सांगू शकतो, मुंडेंचा पवारांबाबत गौप्यस्फोट
2017 ला कुठे बैठक झाली? हे सांगू शकतो, मुंडेंचा पवारांबाबत गौप्यस्फोट.
मतदान करावं म्हणून न्हाव्याची भन्नाट ऑफर, बोटावरची शाई दाखवा आणि...
मतदान करावं म्हणून न्हाव्याची भन्नाट ऑफर, बोटावरची शाई दाखवा आणि....
बूथवर मतदारांच्या रांगा अन् मतदान बंद ठेऊन कर्मचारी करतायत जेवण
बूथवर मतदारांच्या रांगा अन् मतदान बंद ठेऊन कर्मचारी करतायत जेवण.
म्हातार लय खडूस, तिजोरीची किल्ली कंबरेला.., शरद पवारांवर कुणाचा निशाणा
म्हातार लय खडूस, तिजोरीची किल्ली कंबरेला.., शरद पवारांवर कुणाचा निशाणा.
मतदारच नाही, मतदान केंद्र पडली ओस; मतदारांचा मतदानावर का बहिष्कार?
मतदारच नाही, मतदान केंद्र पडली ओस; मतदारांचा मतदानावर का बहिष्कार?.
हे मोदीकृत भाजपाचे षडयंत्र, EVM वर शंका व्यक्त करत राऊतांचा गंभीर आरोप
हे मोदीकृत भाजपाचे षडयंत्र, EVM वर शंका व्यक्त करत राऊतांचा गंभीर आरोप.
राणा दाम्पत्याची बुलेटस्वारी, किती मतांनी विजय? नवनीत राणा म्हणाल्या..
राणा दाम्पत्याची बुलेटस्वारी, किती मतांनी विजय? नवनीत राणा म्हणाल्या...
दुसऱ्या टप्प्यात अनोख्या मतदाराची चर्चा, थेट माकड कडेवर घेऊन केल मतदान
दुसऱ्या टप्प्यात अनोख्या मतदाराची चर्चा, थेट माकड कडेवर घेऊन केल मतदान.
पुन्हा मरायला तयार... मतदानासाठी निघालेले जरांगे पाटील काय म्हणाले?
पुन्हा मरायला तयार... मतदानासाठी निघालेले जरांगे पाटील काय म्हणाले?.
हातांची झोळी केली...सोपे नव्हते मला हरविणे म्हणून...तुपकरांचा हल्लाबोल
हातांची झोळी केली...सोपे नव्हते मला हरविणे म्हणून...तुपकरांचा हल्लाबोल.