Pune crime : पाणीपुरवठा विभागाच्या आवारातून चोरले लोखंडी पाइप; दोन प्लंबरसह चौघांना पिंपरी-चिंचवड पोलिसांनी केली अटक

खेड (Khed) तालुक्‍यातील पाणीपुरवठा (Water supply) विभागाच्या आवारातून सुमारे 10 लाख रुपये किंमतीचे सुमारे 100 लोखंडी पाइप चोरीला गेल्याप्रकरणी पिंपरी-चिंचवड पोलिसांनी (Pimpri Chinchwad Police) दोन प्लंबरसह चार जणांना अटक केली आहे.

Pune crime : पाणीपुरवठा विभागाच्या आवारातून चोरले लोखंडी पाइप; दोन प्लंबरसह चौघांना पिंपरी-चिंचवड पोलिसांनी केली अटक
लोखंडी पाइप चोरणाऱ्यांना पिंपरी चिंचवड पोलिसांकडून अटक
Follow us
| Updated on: Apr 17, 2022 | 5:04 PM

पुणे : खेड (Khed) तालुक्‍यातील पाणीपुरवठा (Water supply) विभागाच्या आवारातून सुमारे 10 लाख रुपये किंमतीचे सुमारे 100 लोखंडी पाइप चोरीला गेल्याप्रकरणी पिंपरी-चिंचवड पोलिसांनी (Pimpri Chinchwad Police) दोन प्लंबरसह चार जणांना अटक केली आहे. अमोल गोरे (28), हनुमंता कट्टीमणी (32), आतिश कांबळे (22) आणि सुंदर दोडामणी (33) अशी पोलिसांनी अटक केलेल्यांची नावे आहेत.राज्य सरकारच्या पाणीपुरवठा आणि स्वच्छता विभागाच्या महाराष्ट्र जीवन प्राधिकरणाच्या अधिकार्‍यांनी पिंपरी-चिंचवड हद्दीतील महाळुंगे पोलीस ठाण्यात याप्रकरणी प्रथम माहिती अहवाल (एफआयआर) नोंदवला होता. वाघजाईनगर परिसरातील विभागाच्या आवारातून 8 एप्रिल ते 10 एप्रिल दरम्यान पाइप चोरीला गेल्याचे अधिकाऱ्यांनी सांगितले. याप्रकरणी अटक केलेल्यांमधील काही जणांवर याआधीही गुन्ह्यांची नोंद आहे. त्यामुळे त्यांच्यासह इतरांचाही शोध पोलिसांनी सुरू केला आहे. तर सध्या चौघांना अटक करण्यात आली आहे.

‘आणखी कोणाचा सहभाग, याचा तपास सुरू’

महाळुंगे पोलीस ठाण्याचे प्रभारी वरिष्ठ निरीक्षक अरविंद पवार म्हणाले, की प्राथमिक तपासात हे स्पष्ट झाले आहे, की हे जड डक्टाइल लोखंडी पाइप क्रेन ऑपरेटरच्या मदतीशिवाय हलवता आले नसते. आम्ही तपास सुरू केल्यावर, एका टीमने क्रेन ऑपरेटरवर लक्ष केंद्रित केले. परिसरातील एका ऑपरेटरकडून आम्हाला माहिती मिळाली, की पाणीपुरवठा कंत्राटदार म्हणून दाखविणाऱ्या काही व्यक्तींनी त्याला पाइप दुसऱ्या ठिकाणी हलवण्यास सांगितले होते. त्यानंतर आम्ही चार जणांना अटक करून त्यांच्याकडून चोरीचे पाइप जप्त केले. त्यापैकी दोन जणांवर यापूर्वी चोरीचे गुन्हे दाखल आहेत आणि दोन जण प्लंबर म्हणून काम करतात. यात आणखी कोणाचा सहभाग आहे का, याचा आम्ही तपास करत आहोत.

‘संशयास्पद हालचाली दिसल्यास कळवावे’

पिंपरी चिंचवड पोलीस कार्यक्षेत्रातील एका अधिकाऱ्याने सांगितले, की संबंधित आवारात कोणतेही सीसीटीव्ही कॅमेरे किंवा सुरक्षारक्षक नव्हते. चाकण आणि खेडमधील औद्योगिक क्षेत्रातील अनेक सार्वजनिक आणि खासगी संस्थांच्या बाबतीतही हीच स्थिती असल्याचे निदर्शनास आले आहे. आम्ही या सर्व घटकांना सुरक्षा कॅमेरे बसवण्याचे आणि रक्षक नेमण्याचे आवाहन करतो. आम्ही लोकांना आवाहन करतो, की त्यांनी औद्योगिक भागात कोणत्याही संशयास्पद हालचाली दिसल्यास आम्हाला कळवावे.

आणखी वाचा :

Kolhapur Suicide : कोल्हापुरात महिला कॉन्स्टेबलची राहत्या घरी गळफास घेऊन आत्महत्या

Ganesh Naik case : इच्छेविरुद्ध शारीरिक संबंध प्रस्थापित केल्याप्रकरणी गणेश नाईकांवर गुन्हा दाखल, रुपाली चाकणकर म्हणाल्या…

Nandurbar : डाकीण असल्याच्या संशयावरून महिलेचा विवस्त्र करून छळ, प्रथेच्या नावाखाली नंदूरबारमध्ये धक्कादायक प्रकार

Non Stop LIVE Update
तू ज्या शाळेत शिकतो बेटा, त्याचा मी हेडमास्तर; अजित पवारांचा खोचक टोला
तू ज्या शाळेत शिकतो बेटा, त्याचा मी हेडमास्तर; अजित पवारांचा खोचक टोला.
राजसाहेबांचं भाषण झोंबलंय, पिक्चर अभी... मनसे नेत्याचा राऊतांना इशारा
राजसाहेबांचं भाषण झोंबलंय, पिक्चर अभी... मनसे नेत्याचा राऊतांना इशारा.
पैसे मोजताना मी स्वतः...मातोश्रीवरचा तो किस्सा राणेंनी भरसभेत सांगितला
पैसे मोजताना मी स्वतः...मातोश्रीवरचा तो किस्सा राणेंनी भरसभेत सांगितला.
बाप तो बाप... बारामतीत शरद पवारांच्या सभास्थळी टोले लगावणारे बॅनर
बाप तो बाप... बारामतीत शरद पवारांच्या सभास्थळी टोले लगावणारे बॅनर.
माझ्याकडे असा दारूगोळा आहे, पण मी...; उज्ज्वल निकम यांचं सूचक वक्तव्य
माझ्याकडे असा दारूगोळा आहे, पण मी...; उज्ज्वल निकम यांचं सूचक वक्तव्य.
'हेमंत करकरेंना कसाबने नाहीतर RSS समर्थक पोलीस अधिकाऱ्यानं घातली गोळी'
'हेमंत करकरेंना कसाबने नाहीतर RSS समर्थक पोलीस अधिकाऱ्यानं घातली गोळी'.
मतांसाठी कसाबची बाजू... लाज बाळगा; भाजप नेत्याची वडेट्टीवारांवर टीका
मतांसाठी कसाबची बाजू... लाज बाळगा; भाजप नेत्याची वडेट्टीवारांवर टीका.
2004ला दादा मुख्यमंत्री, पवारांनी प्रस्ताव नाकारला, कुणाचा गौप्यस्फोट?
2004ला दादा मुख्यमंत्री, पवारांनी प्रस्ताव नाकारला, कुणाचा गौप्यस्फोट?.
संताच्या ओव्या, अभंग, मोदी..., सोशल मीडियावरील फडणवीसांचा अनोखा प्रचार
संताच्या ओव्या, अभंग, मोदी..., सोशल मीडियावरील फडणवीसांचा अनोखा प्रचार.
ठाकरेंची कशावरून सटकली? 'त्या' वक्तव्यावरून शिंदेंनी लगावला खोचक टोला
ठाकरेंची कशावरून सटकली? 'त्या' वक्तव्यावरून शिंदेंनी लगावला खोचक टोला.