IND vs ENG, Racism : गंभीर! कसोटी सामन्यात वर्णभेदाचा आरोप, इंग्लंड संघाच्या चाहत्यांनी भारतीयांना लक्ष्य केलं, नेमकं काय प्रकरण? जाणून घ्या…

इंग्लंड आणि वेल्स क्रिकेट बोर्डानेही याप्रकरणी मौन सोडलंय. बोर्डानं म्हटले आहे की, 'आजच्या स्पर्धेत वर्णद्वेषी गैरवर्तनाच्या बातम्या ऐकून आम्ही चिंतित आहोत.' ते पुढे म्हणाले, 'आम्ही एजबॅस्टन अधिकाऱ्यांच्या संपर्कात आहोत, ते या प्रकरणाची चौकशी करतील. क्रिकेटमध्ये वर्णभेदाला स्थान नाही.

IND vs ENG, Racism : गंभीर! कसोटी सामन्यात वर्णभेदाचा आरोप, इंग्लंड संघाच्या चाहत्यांनी भारतीयांना लक्ष्य केलं, नेमकं काय प्रकरण? जाणून घ्या...
कसोटी सामन्यात वर्णभेदाची चर्चा
Image Credit source: social
शुभम कुलकर्णी

|

Jul 05, 2022 | 9:26 AM

नवी दिल्ली : इंग्लंड आणि भारत (IND vs ENG) यांच्यातील पाचव्या कसोटीत वर्णभेदाचा (Racism) मुद्दा समोर आला. एजबॅस्टन येथे सुरू असलेल्या कसोटी सामन्याच्या चौथ्या दिवसाच्या अखेरीस भारतीय क्रिकेट चाहत्यांना वर्णभेदाच्या मुद्दला सामोरं जावं लागलं. यावेळी वर्णभेदावरुन शिवीगाळही झाली. सोशल मीडियावर (Social Media) देखील अनेक आरोप करण्यात आले. एजबॅस्टन येथे खेळल्या जात असलेल्या भारत आणि इंग्लंड यांच्यातील पाचव्या कसोटी सामन्यात वर्णद्वेषाचे प्रकरण समोर आलंय. एजबॅस्टन कसोटीच्या चौथ्या दिवशी विरोधी संघाच्या चाहत्यांकडून भारतीय चाहत्यांवर वर्णभेदावरुन टिप्पणी केल्याचा आरोप भारताच्या काही चाहत्यांनी सोशल मीडियाच्या माध्यमातून केला आहे. सोशल मीडिया युजर्सपैकी एकानं पोस्ट केलं की एरिक हॉलीच्या स्टँडवर भारतीय चाहत्यांना वांशिक अत्याचाराचा सामना करावा लागत आहे. त्याच वेळी, इतर युजर्सनी पोस्ट केले आहे की, ‘त्यांना सामन्यादरम्यान घृणास्पद वर्णद्वेभेदाचा सामना करावा लागला. या सामन्यापूर्वी आम्ही कोणत्याही सामन्यात अनुभवला नव्हता असा गैरवर्तन. या प्रकरणी ईसीबीनं तपास करण्यास सांगितलंय.

सोशल मीडियावरील ट्विट्स

एजबॅस्टनच्या अधिकाऱ्यांकडून माफी

कसोटीच्या चौथ्या दिवशी हे प्रकरण उघडकीस आल्यानंतर एजबॅस्टनच्या अधिकाऱ्यांनी माफी मागितली असून, लवकरात लवकर या प्रकरणाची सखोल चौकशी करू, असं आश्वासन त्यांनी दिलं आहे. त्यांनी ट्विट केले की, ‘आम्हाला हे वाचून खूप दु:ख झाले आणि आम्ही अशा वर्तनाचा तीव्र निषेध करतो.’

एजबॅस्टनचं स्टेटमेंट

यॉर्कशायरचा क्रिकेटर अझीम रफीक यांचं ट्विट

‘भारत आर्मी’ या अधिकृत ट्विटर अकाऊंटवरुन ट्विट

इंग्लंड आणि वेल्स क्रिकेट बोर्डाचंही भाष्य

इंग्लंड आणि वेल्स क्रिकेट बोर्डानेही याप्रकरणी मौन सोडलंय. बोर्डानं म्हटले आहे की, ‘आजच्या स्पर्धेत वर्णद्वेषी गैरवर्तनाच्या बातम्या ऐकून आम्ही चिंतित आहोत.’ ते पुढे म्हणाले, ‘आम्ही एजबॅस्टन अधिकाऱ्यांच्या संपर्कात आहोत, ते या प्रकरणाची चौकशी करतील. क्रिकेटमध्ये वर्णभेदाला स्थान नाही.

‘क्रिकेटमध्ये वर्णभेदाला स्थान नाही’

एजबॅस्टन कसोटीबद्दल बोलायचं झालं तर गेल्या तीन दिवसांपासून यजमानांवर आपली पकड कायम ठेवणाऱ्या भारतीय संघाला चौथ्या दिवसाचा खेळ संपल्यानंतर पराभवाचा सामना करावा लागला आहे. किंबहुना, जो रूट आणि जॉनी बेअरस्टो यांनी दुसऱ्या डावात भारताने दिलेली डोंगराएवढी धावसंख्या कमी झाली आहे. पाचव्या कसोटी सामना जिंकण्यासाठी इंग्लंडला पाचव्या दिवशी फक्त 119 धावांची गरज आहे. दुसरीकडे, भारतीय संघ या कसोटी सामन्याइतकाच असेल, तर शेवटच्या दिवशी सात विकेट्स घ्याव्या लागतील.

इंग्लंडमध्ये भारतीय चाहत्यांना सोसावा लागलेला वर्णभेदाचा मुद्दा गंभीर असून त्यावर आता काय कारवाई केली जाते. ते पाहणं महत्वाचं ठरेल.

Follow us on

Related Stories

Most Read Stories

Click on your DTH Provider to Add TV9 MARATHI

राज्य चुनें