AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

IPL 2021: मुंबई इंडियन्सच्या सततच्या पराभवांमागील कारण काय?, प्रशिक्षक झहीर खानने केला खुलासा

तब्बल पाच वेळा आयपीएलचा खिताब पटाकावलेल्या मुंबई इंडियन्स संघाला आयपीएलच्या दुसऱ्या पर्वात मात्र सतत पराभवांचा सामनाच करावा लागत आहे. दुसऱ्या पर्वातील तिन्ही सामन्यात मुंबईला पराभव पत्करावा लागला आहे.

IPL 2021: मुंबई इंडियन्सच्या सततच्या पराभवांमागील कारण काय?, प्रशिक्षक झहीर खानने केला खुलासा
मुंबई इंडियन्स संघ
| Edited By: | Updated on: Sep 27, 2021 | 9:43 PM
Share

IPL 2021: आयपीएलला जगातील सर्वात मनोरंजनात्मक क्रिकेट लीग म्हणून ओळखलं जातं. तसंच या स्पर्धेत कधी काय होईल? याचा काही नेम नाही. यावेळी पुन्हा एकदा याचा प्रत्यय आला ते म्हणजे स्पर्धेतील सर्वात यशस्वी संघ ज्याने 5 वेळा आयपीएलचा खिताब पटकावला आहे. तो मुंबई इंडियन्सचा (Mumbai Indians) संघ यंदा प्लेऑफमध्ये जाण्यापासूनही वंचित राहिल अशी शक्यता निर्माण झाली आहे. दरम्यान मुंबईच्या सततच्या पराभवांमागील कारण त्यांचा प्रशिक्षक झहीर खान (Zahir Khan) याने सांगितलं आहे.

रविवारी कोहलीच्या आरसीबी संघाविरुद्ध (RCB vs MI) झालेल्या सामन्यात मुंबईचा 54 धावांनी पराभव झाला. हा दुसऱ्या पर्वातील सलग तिसरा पराभव असल्यामुळे मुंबईचा संघ तसेच चाहते सर्वच नाराज होते. यावेळी कोच झहीर खान म्हणाला की, ”मुंबई इंडियन्सच्या खेळाडूंचा खेळ चांगला असला तरी त्यांच्यात सर्वात महत्त्वाची गोष्ट असणारी आक्रमकता अद्याप पाहायला मिळालेली नाही. सर्व खेळाडू एकत्र मिळूनच संघाला जिंकवू शकतात. तशी आक्रमक संघात्मक भूमिका अजून दिसून येत नाही. अशावेळी केवळ चारच सामने मुंबईच्या हातात असल्याने आता पुढील सामने जिंकण अनिवार्य झालं आहे.”

आरसीबीकडून मुंबईचा दारुण पराभव

सामन्याच्या सुरुवातीला नाणेफेक जिंकत मुंबई इंडियन्सने गोलंदाजी घेतली. पण आरसीबीचे फलंदाज धमाकेदार फलंदाजी करत असल्याने मुंबईला त्यांचा निर्णय़ चुकला असे वाटत होते. पण अखेरच्या षटकात मात्र मुंबईच्या गोलंदाजांनी उत्तम बोलिंग करत आरसीबीला 165 धावांवर रोखलं. त्यानंतर मुंबईचे फलंदाज 166 धावा करुन सामना जिंकण्यासाठी मैदानात उतरले. सुरुवातही दमदार झाली. सलामीवीर कर्णधार रोहित शर्मा आणि क्विंंटन डिकॉक यांनी दमदार सुरुवातकेली. पण 57 धावांवर डिकॉक बाद झाला. ज्यानंतर कर्णधार रोहित एकाकी झुंज देत होता. पण रोहित नॉन स्ट्राईकवर असताना ईशान किशनचा बॉल त्याला लागला. ज्यानंतर पुढच्याच चेंडूवर रोहित बाद झाला. 43 धावा करुन रोहित बाद होताच एकामागोमाग एक फलंदाज बाद होतं गेले. पण अखेरच्या काही षटकात क्रिजवर हार्दीक आणि पोलार्ड हे धाकड खेळाडू होते. ज्यांच्यासाठी सामना जिंकवणं अवघड नव्हतं. पण त्याच क्षणी आरसीबीनं त्यांचा हुकमी एक्का काढला.

विजयासाठी मुंबईला 60 धावांची गरज असताना आरसीबीचा यंदाच्या हंगामातील मुख्य गोलंदाज हर्षल पटेलने चेंडू हातात घेतला. तो 17 वी ओव्हर टाकत होता. समोर हार्दीकसह पोलार्ड होता. सिक्सर किंग असणारे दोघेही सामना जिंकवण्याची ताकद मनगटात ठेवून होते. पण हर्षलने जबरदस्त अशा स्लो डिलेव्हरीज टाकत आधी हार्दीकला कर्णधार कोहलीच्या हाती झेलबाद केलं. त्यानंतर दुसऱ्या चेंडूवर पोलार्डची दांडी उडवली. या दोघांच्या जाण्याने मुंबईच्या हातातून सामना जवळपास गेलाच होता. पण तिसऱ्या चेंडूवर हर्षलने राहुल चाहरला पायचीत करत अप्रतिम अशी हॅट्रिक नोंदवली. त्याच्या या हॅट्रिकमुळे आरसीबीला विजय सोपा झाला. पुढील काही शतकात मुंबईचे उर्वरीत फलंदाजही बाद झाले आणि आरसीबीने 54 धावांनी विजय नोंदवला.

मुंबई इंडियन्सचे उर्वरीत सामने

– 28 सप्टेंबर (गुरुवार): मुंबई vs पंजाब किंग्‍स, सायंकाळी 7:30 वाजता, अबू धाबी – 02 ऑक्टोबर (शनिवार): मुंबई vs दिल्‍ली कॅपिटल्‍स, दुपारी 3:30 वाजता, शारजाह – 05 ऑक्टोबर (मंगळवार): मुंबई vs राजस्‍थान रॉयल्‍स, सायंकाळी 7:30 वाजता, शारजाह – 08 ऑक्टोबर (शुक्रवार): मुंबई vs सनरायजर्स हैद्राबाद, दुपारी 3:30 वाजता, अबू धाबी

हे ही वाचा

Hardik Pandya : चांगल्या लयीत नसल्याने हार्दिक पंड्या T 20 विश्वचषकातून बाहेर पडणार?, ‘या’ खेळाडूला संधी मिळण्याची दाट शक्यता

IPL 2021: आरसीबीच्या दमदार विजयानंतर ड्रेसिंग रुममध्ये सर्व आनंदी, एबी डिव्हिलीयर्सने केली विराटची नकल, पाहा VIDEO

IPL 2021: बलाढ्य सीएसके संघाची कमकुवत बाजू कोणती?, वीरेंद्र सेहवागने सांगितली आतली माहिती

(Due to less aggression Mumbai indians are loosing says Coach Zahir Khan)

देवयानी फरांदे भावूक; भाजप प्रवेश अन निष्ठावंतांच्या न्यायासाठी उद्रेक
देवयानी फरांदे भावूक; भाजप प्रवेश अन निष्ठावंतांच्या न्यायासाठी उद्रेक.
जागावाटपाचा तिढा फडणवीसांच्या दरबारात, भाजपकडून 115 जणांची नाव निश्चित
जागावाटपाचा तिढा फडणवीसांच्या दरबारात, भाजपकडून 115 जणांची नाव निश्चित.
पुण्यात ठाकरेंची सेना अन् मनसेची युती होणार? कोण किती जागांवर लढणार?
पुण्यात ठाकरेंची सेना अन् मनसेची युती होणार? कोण किती जागांवर लढणार?.
राज ठाकरेंवर माझी नाराजी नाही, पण... दिनकर पाटलांची पहिली प्रतिक्रिया
राज ठाकरेंवर माझी नाराजी नाही, पण... दिनकर पाटलांची पहिली प्रतिक्रिया.
भाजप कार्यकर्त्यांचा विरोध तरीही मनसेचे दिनकर पाटील भाजपात अन्..
भाजप कार्यकर्त्यांचा विरोध तरीही मनसेचे दिनकर पाटील भाजपात अन्...
कोणतीही तडजोड नाही, वंचितकडून काँग्रेसला मोठा प्रस्ताव अन् राज्यात...
कोणतीही तडजोड नाही, वंचितकडून काँग्रेसला मोठा प्रस्ताव अन् राज्यात....
जगताप यांच्या काँग्रेस प्रवेशावरून पुणे शहर काँग्रेसमध्ये नाराजी?
जगताप यांच्या काँग्रेस प्रवेशावरून पुणे शहर काँग्रेसमध्ये नाराजी?.
भाजपचा एकाचवेळी काँग्रेस, ठाकरे सेनेला जोर का धक्का! BJPची ताकद वाढणार
भाजपचा एकाचवेळी काँग्रेस, ठाकरे सेनेला जोर का धक्का! BJPची ताकद वाढणार.
..तो भी पिटोगे, मराठी भाषेच्या अपमानावरून संदीप देशपांडेंचा थेट इशारा
..तो भी पिटोगे, मराठी भाषेच्या अपमानावरून संदीप देशपांडेंचा थेट इशारा.
ठाकरेंच्या सेनेतून विनायक पांडे, यतिन वाघ यांची हकालपट्टी, राऊतांनी...
ठाकरेंच्या सेनेतून विनायक पांडे, यतिन वाघ यांची हकालपट्टी, राऊतांनी....