ENG vs IND : जसप्रीत बुमराहचा पंजा, इंग्लंडला आघाडी घेण्यापासून रोखलं, टीम इंडियाला 6 रन्सची लीड
England vs India 1st Test : यॉर्कर किंग जसप्रीत बुमराह याने केलेल्या धारदार बॉलिंगच्या जोरावर भारताने इंग्लंडला आघाडी घेण्यापासून रोखण्यात यश मिळवलं. भारताला दुसऱ्या डावात 6 धावांची नाममात्र आघाडी मिळाली.

टीम इंडियाने इंग्लंडला पहिल्या कसोटी सामन्यातील तिसऱ्या दिवशी (22 जून) आघाडी मोडीत काढण्यापासून रोखलं आहे. ओपनर यशस्वी जैस्वाल, कर्णधार शुबमन गिल आणि उपकर्णधार ऋषभ पंत या तिघांनी केलेल्या शतकी खेळीच्या जोरावर भारताने पहिल्या डावात 471 धावा केल्या. इंग्लंडने प्रत्युत्तरात 100.4 ओव्हरमध्ये 465 रन्स केल्या. इंग्लंडसाठी उपकर्णधार ओली पोप याने सर्वाधिक 106 धावांची खेळी केली. तर इतरांनी चांगलं योगदान दिलं. हॅरी ब्रूक नर्व्हस नाईंटीचा शिकार ठरला. तर ओपनर बेन डकेट याने अर्धशतकी खेळी केली. तर टीम इंडियाकडून जसप्रीत बुमराह याने सर्वाधिक 5 विकेट्स घेतल्या. त्यामुळेच टीम इंडियाला 6 धावांची नाममात्र आघाडी घेता आली. आता टीम इंडियाचे फलंदाज दुसऱ्या डावात कशी बॅटिंग करतात, याकडे क्रिकेट चाहत्यांचं लक्ष असणार आहे.
टीम इंडियाने शेवटची 7 विकेट्स 41 धावांच्या मोबदल्यात गमावून मोठी धावसंख्या करण्याची संधी गमावली. त्यामुळे भारताचा पहिला डाव 471 धावांवर आटोपला. त्यानंतर इंग्लंडने जोरदार प्रतिकार करत भारताला मोठी आघाडी मिळवण्यापासून रोखलं. इंग्लंडचा ओपनर झॅक क्रॉली याचा अपवाद वगळता इतर सर्वांनी किमान दुहेरी आकडा गाठला. क्रॉलीने 4 धावा केल्या.
इंग्लंडसाठी ओली पोप याने 137 बॉलमध्ये 196 रन्स केल्या. पोपचं कसोटी कारकीर्दीतील नववं शतक ठरलं. हॅरी ब्रूक यालाही शतक करण्याची संधी होती. मात्र तो दुर्देवी ठरला. हॅरी 112 चेंडूत 99 धावांवर बाद झाला. बेन डकेट याने 62 धावांचं योगदान दिलं. इंग्लंडचा अनुभवी फलंदाज जो रुट याला मोठी खेळी करण्यापासून रोखण्यात भारताला यश आलं. रुटने 28 धावा केल्या. कर्णधार बेन स्टोक्स याने 20 धावा केल्या.
जेमी स्मिथ याने 40 तर ख्रिस वोक्सने 38 धावांचं योगदान दिलं. ब्रायडन कार्सने 22 तर जोश टंग याने 11 रन्स केल्या. शोएब बशीर 1 रनवर नॉट आऊट परतला. तर टीम इंडियाकडून बुमराह व्यतिरिक्त प्रसिध कृष्णा याने तिघांना मैदानाबाहेरचा रस्ता दाखवला. मोहम्मद सिराज याने 2 विकेट्स घेतल्या. तर रवींद्र जडेजा आणि शार्दूल ठाकुर हे दोघे विकेट घेण्यात अपयशी ठरले.
भारताला लीड्समध्ये 6 रन्सची लीड
That’s Tea on Day 3! #TeamIndia bowl out England for 465 to get a 6-run lead! 👌 👌
5⃣ wickets for Jasprit Bumrah 3⃣ wickets for Prasidh Krishna 2⃣ wickets for Mohd. Siraj
Stay Tuned for the Third & Final Session of the Day!
Updates ▶️ https://t.co/CuzAEnAMIW#ENGvIND |… pic.twitter.com/iMhUuYlaXp
— BCCI (@BCCI) June 22, 2025
भारताचा पहिला डाव
दरम्यान टीम इंडियाकडून पहिल्या डावात शुबमन, ऋषभ आणि यशस्वी या तिघांव्यतिरिक्त एकालाही काही खास करता आलं नाही. शुबमनने सर्वाधिक 147 धावा केल्या. ऋषभने 134 तर यशस्वीने 101 रन्स केल्या. तर केएल राहुलने 42 धावा केल्या. तर इतरांनी निराशा केली. तर इंग्लंडकडून जोश टंग आणि बेन स्टोक्स या दोघांनी प्रत्येकी 4-4 विकेट्स घेतल्या. तर शोएब बशीर आणि ब्रायडन कार्स या दोघांनी प्रत्येकी 1-1 विकेट घेतली.