AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

ENG vs IND : पहिल्या टेस्टसाठी प्लेईंग ईलेव्हन जाहीर, तिघांचा पत्ता कापला

England vs India 1st Test : इंडिया विरुद्ध इंग्लंड पहिल्या टेस्ट मॅचच्या 48 तासाआधी टीमने प्लेइंग ईलेव्हन जाहीर केली आहे. हेडिंग्लेमध्ये कोणते 11 खेळाडू खेळणार? जाणून घ्या.

ENG vs IND : पहिल्या टेस्टसाठी प्लेईंग ईलेव्हन जाहीर, तिघांचा पत्ता कापला
Rishabh Pant IND vs ENGImage Credit source: PTI
| Updated on: Jun 19, 2025 | 8:05 AM
Share

इंग्लंड विरुद्ध टीम इंडिया यांच्यातील कसोटी मालिकेसाठी आता काही तासांचा अवधी बाकी आहे. उभयसंघात एकूण 5 कसोटी सामने खेळवण्यात येणार आहेत. मालिकेतील सलामीचा सामना हा 20 जूनपासून हेडिंग्ले लीड्स येथे आयोजित करण्यात आला आहे. शुबमन गिल याच्याकडे भारतीय संघाची धुरा आहे. तर बेन स्टोक्स इंग्लंडचं नेतृत्व करणार आहे. दोन्ही संघांनी सलामीच्या सामन्यासाठी जोरदार सराव केला आहे. मात्र इंग्लंडने प्लेइंग ईलेव्हन जाहीर करत आघाडी घेतली आहे. इंग्लंड क्रिकेट बोर्डाने 18 जून रोजी पहिल्या सामन्यासाठी अंतिम 11 खेळाडूंची नावं जाहीर केली आहेत. याबाबतची माहिती सोशल मीडियावरुन देण्यात आली आहे.

इंग्लंडने 4 जून रोजी पहिल्या कसोटीसाठी 14 खेळाडूंची नावं जाहीर केली होती. त्यामुळे प्लेइंग ईलेव्हनमध्ये कोणत्या 11 खेळाडूंना संधी मिळणार? याकडे टीम इंडियाचंही लक्ष होतं. अखेर सामन्याच्या 48 तासांआधी अंतिम 11 खेळाडूंची नावं समोर आली आहेत. तर 3 प्रमुख खेळाडूंचा पत्ता कट करण्यात आला आहे. इंग्लंड अंतिम 11 खेळाडूंमध्ये 3 वेगवान गोलंदाज आणि 1 स्पेशालिस्ट स्पिनरचा समावेश करण्यात आला आहे. इंग्लंडने जेकब बेथल, जेमी ओव्हरटन आणि सॅम कूक या तिघांना बाहेर ठेवलं आहे.

खेळपट्टी कुणाचा खेळ करणार?

मीडिया रिपोर्ट्सनुसार, इंग्लंड टीमने लीड्स येथे हिरव्या खेळपट्टीऐवजी फलंदाजीसाठी मदतशीर पीच तयार करावी, अशी मागणी केली आहे. मात्र इंग्लंडची प्लेइंग ईलेव्हन पाहून तसं वाटत तरी नाही, त्याचं कारण 4 स्पेशालिस्ट बॉलर. या चौघांपैकी एक फिरकीपटू आहे. तसेच इंग्लंडचा कॅप्टन बेन स्टोक्स मध्यमगती गोलंदाज आहे. त्यामुळे इंग्लंडची प्लेइंग ईलेव्हन पाहता पहिल्या सामन्यात वेगवान गोलंदाजांचा दबदबा पाहायला मिळू शकतो.

इंग्लंडची प्लेइंग ईलेव्हन पाहता टीम इंडिया त्याचा फायदा घेऊ शकते. इंग्लंडच्या गोलंदाजांकडे फारसा अनुभव नाही. टीम इंडिया विरूद्धच्या शेवटच्या मालिकेत जेम्स अँडरसन आणि स्टूअर्ट ब्रॉड हे अनुभवी वेगवान गोलंदाज होते. मात्र दोघेही निवृत्त झाले आहेत. त्यामुळे इंग्लंडची धुरा आता ब्रायडन कार्स, जोश टंग आणि शोएब बशीर यांच्याकडे आहेत. तर ख्रिस वोक्स हा टीम इंडियासाठी डोकेदुखी ठरला आहे. मात्र वोक्स व्यतिरिक्त टीम इंडियासाठी तशी डोकेदुखी नाही, असं म्हटलं तर वावगं ठरणार नाही. मात्र मैदानात जो सरस ठरणार तोच जिंकणार.

इंग्लंड प्लेइंग ईलेव्हन : झॅक क्रॉली, बेन डकेट, ऑली पोप, जो रूट, हॅरी ब्रूक, बेन स्टोक्स (कॅप्टन), जेमी स्मिथ, क्रिस वोक्स, ब्रायडन कार्स, जॉश टंग आणि शोएब बशीर.

गुंडांनी खाकी वर्दीवर उचलला हात, रोहित पवार चांगलेच भडकले, म्हणाले...
गुंडांनी खाकी वर्दीवर उचलला हात, रोहित पवार चांगलेच भडकले, म्हणाले....
क्लासमध्ये वाद अन विद्यार्थ्याच्या मृत्यू, वडिलांची संतप्त प्रतिक्रिया
क्लासमध्ये वाद अन विद्यार्थ्याच्या मृत्यू, वडिलांची संतप्त प्रतिक्रिया.
मोठी बातमी.. दोन ते तीन दिवसांत ठाकरे बंधू एकत्र? काँग्रेसशिवाय युती..
मोठी बातमी.. दोन ते तीन दिवसांत ठाकरे बंधू एकत्र? काँग्रेसशिवाय युती...
फडणवीसांनी निवडणुकीची घोषणा होताच महायुतीची रणनीती सांगितली; म्हणाले..
फडणवीसांनी निवडणुकीची घोषणा होताच महायुतीची रणनीती सांगितली; म्हणाले...
'धुरंधर'वरून शिंदे-ठाकरेंमध्ये जुंपली, रहमान डकैतवरून तुफान टोलेबाजी
'धुरंधर'वरून शिंदे-ठाकरेंमध्ये जुंपली, रहमान डकैतवरून तुफान टोलेबाजी.
फेकनाथ मिंधे...आदित्य ठाकरे यांची टोलेबाजी, एकनाथ शिंदे यांना डिवचलं!
फेकनाथ मिंधे...आदित्य ठाकरे यांची टोलेबाजी, एकनाथ शिंदे यांना डिवचलं!.
राज्यात 29 महापालिका निवडणुकांचं बिगुलं वाजलं,आजपासून आचारसंहिता लागू
राज्यात 29 महापालिका निवडणुकांचं बिगुलं वाजलं,आजपासून आचारसंहिता लागू.
मुंबई, ठाणे ते पुणे... महापालिकेची निवडणूक अन् निकाल कधी? तारखा जाहीर
मुंबई, ठाणे ते पुणे... महापालिकेची निवडणूक अन् निकाल कधी? तारखा जाहीर.
मनसेचा निवडणूक आयोगाच्या कार्यालयात राडा, कम्प्युटर तोडले अन्... नेमकं
मनसेचा निवडणूक आयोगाच्या कार्यालयात राडा, कम्प्युटर तोडले अन्... नेमकं.
कोचिंग क्लासमध्ये भोसकला चाकू अन्... 10वीच्या मुलाकडून मित्राची हत्या
कोचिंग क्लासमध्ये भोसकला चाकू अन्... 10वीच्या मुलाकडून मित्राची हत्या.