AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

ENG vs IND 2nd T20I : भारतीय खेळाडूकडून मैदानात अपशब्दाचा वापर, कोणत्या खेळाडूला दिली शिवी? नेमका काय प्रकार? जाणून घ्या…

भारतीय संघ गोलंदाजी आणि इंग्लंडचा संघ फलंदाजी करताना अपशब्द वापरल्याचा प्रकार समोर आलाय. इंग्लंडच्या डावाचं चौथं ओव्हर सुरू होतं. यावेळी हार्दिक पांड्या गोलंदाजी करत होता. याचवेळी एका खेळाडूचा आवाज कैद झाला.

ENG vs IND 2nd T20I : भारतीय खेळाडूकडून मैदानात अपशब्दाचा वापर, कोणत्या खेळाडूला दिली शिवी? नेमका काय प्रकार? जाणून घ्या...
भारतीय खेळाडूकडू मैदानात अपशब्दाचा वापरImage Credit source: social
Shubham Kulkarni
Shubham Kulkarni | Updated on: Jul 10, 2022 | 1:29 PM
Share

नवी दिल्ली : एजबॅस्टन T20 मध्ये भारताने (India) इंग्लंडचा (England) 49 धावांनी पराभव करून तीन सामन्यांच्या मालिकेत 2-0 अशी अभेद्य आघाडी घेतली. यातच क्रिकेट सामन्यात भारतीय खेळाडूने शिवीगाळ केल्याचं प्रकरण समोर आलंय. त्या खेळाडूचा आवाज माईकमध्ये कैद झाल्याचं हे प्रकरण आहे. ही शिवीगाळ कुणी केली किंवा अपशब्द कुणी वापरला हे आम्ही तुम्हाला सांगणार आहोत. त्यापूर्वी कालच्या सामन्यात काय झालं ते पाहुया. काल टीम इंडियाने साउथॅम्प्टनमध्ये यजमानांचा 50 धावांनी पराभव केला. दुसऱ्या T20 बद्दल बोलायचे झाले तर भारताने प्रथम फलंदाजी करताना रवींद्र जडेजाच्या नाबाद 46 धावांच्या जोरावर 170 धावा केल्या होत्या. इंग्लंडकडून नवोदित ग्लेसनने तीन तर ख्रिस जॉर्डनने चार बळी घेतले. लक्ष्याचा पाठलाग करताना संपूर्ण इंग्लिश संघ 121 धावांत गारद झाला. भारताकडून भुवनेश्वर कुमारने सर्वाधिक 3 बळी घेतले, तर जसप्रीत बुमराह आणि युझवेंद्र चहलने प्रत्येकी 2 बळी घेतले. रोहित शर्माच्या (Rohit Sharma) नेतृत्वाखाली टीम इंडियाने हा सलग 14 वा सामना जिंकला आहे.

अपशब्दाचा वापर

भारतीय संघ गोलंदाजी आणि इंग्लंडचा संघ फलंदाजी करताना एक अपशब्द वापरल्याचा प्रकार समोर आलाय. इंग्लंडच्या डावाचं चौथं ओव्हर सुरू होतं. यावेळी हार्दिक पांड्या गोलंदाजी करत होता. इंग्लंडकडून डेव्हिड मलान हा दहा चेंडूत आठ धावा आणि लिविंग्स्टन आठ चेंडूत पंधरा धावा बनवून खेळत होते. यावेळीचा हा किस्सा  घडला आणि तो प्रचंड चर्चेतही आलाय.

हार्दिक पांड्याच्या ओव्हरमध्ये काय झालं?

हार्दिक पांड्याच्या ओव्हरमध्ये रोहित शर्माचा आवाज स्टंप माईकमध्ये कैद झाला. यामध्ये त्यानं अपशब्द वापल्याचं समोर आलंय. मात्र, हे अपशब्द कोणत्या खेळाडूसाठी वापरण्यात आले. याबाबत अजून तरी स्पष्ट झालेलं नाही. यावरुन मॅचच्या दबावाचा अंदाज लावला जातोय. हा दबाव यासाठी देखील होता. कारण भारतानं जो स्कोर बनवला होता. तो इंग्लंडच्या बॅटिंग लाईन-अपकडे बघता इतका जास्त नव्हता, त्यातच दुसऱ्या आणि पहिल्या टी20 मध्ये चार विकेट घेणारा हार्दिक पांड्याही थोडा दिशाहीन दिसून आला.

भारताची सुरुवात कशी झाली?

कर्णधार रोहित शर्मासह यष्टिरक्षक ऋषभ पंतने भारताकडून डावाची सुरुवात केली. डावाच्या पहिल्याच षटकात डेव्हिड विलीच्या चौथ्या चेंडूवर रोहितला जेसन रॉयने झेलबाद केले आणि षटकाच्या शेवटच्या चेंडूवर षटकार मारून भारतीय कर्णधारानं जळजळीत मीठ चोळले. त्यानं पुन्हा डावाच्या तिसऱ्या षटकात षटकार मारून गोलंदाजाचे स्वागत केले तर पंतने त्याच षटकात दोन चौकार मारले. त्यानंतर दोघांनी मोईन अलीविरुद्ध चौकार मारले.

Follow Us
महाराष्ट्राचं नेतृत्व एकनाथ शिंदे यांच्याकडे द्या, त्या बड्या नेत्याचं
Shivsena : महाराष्ट्राचं नेतृत्व एकनाथ शिंदे यांच्याकडे द्या, त्या बड्या नेत्याचं मोठं विधान
महायुती टिकवायची असेल तर...; भाजपचा मित्रपक्षाला इशारा
BJP Vs Shivsena : महायुती टिकवायची असेल तर झारीतील शुक्राचार्यांवर कारवाई करा; भाजपचा मित्रपक्षाला इशारा...
माकडछाप ब्रँडने भाजपला शहाणपण शिकवू नये; नवनाथ बन यांनी कोणाला सुनावलं
Navnath Ban : 12 पक्ष बदलले नाही...माकडछाप ब्रँडने भाजपला शहाणपण शिकवू नये...; नवनाथ बन यांचा रवींद्र धंगेकरांवर घणाघात
ठाण्यातल्या शिवसेनेच्याच नगरसेवकांची आंदोलनाकडे पाठ; नेमकं काय घडलं?
Shivsena : ठाण्यातल्या शिवसेनेच्याच नगरसेवकांची आंदोलनाकडे पाठ; नेमकं काय घडलं?
ठाकरे-शिंदे पुन्हा एकत्र येणार? धंगेकर यांना कुठे सिग्नल मिळाला?....
Vijay Wadettiwar : ठाकरे-शिंदे पुन्हा एकत्र येणार? रवींद्र धंगेकर यांना कुठे सिग्नल मिळाला तो त्यांनी सांगावा...
प्रदीप पूर्णेकर प्रकरण गृहमंत्री आणि पालकमंत्र्यांना महागात पडणार....
Sanjay Raut : प्रदीप पूर्णेकर प्रकरण गृहमंत्री आणि पालकमंत्र्यांना महागात पडणार; संजय राऊत असं का म्हणाले?
महाराष्ट्राच्या हितासाठी सर्वांनी एकत्र यावं; संजय राऊतांचं मोठं विधान
Sanjay Raut : वैचारिक मतभेद बाजूला ठेवून महाराष्ट्राच्या हितासाठी सर्वांनी एकत्र यावं; संजय राऊतांचं मोठं विधान
साडेचार महिन्यांच्या प्रतीक्षेनंतर माथेरानची राणी पुन्हा धावली
Matheran Mini Train : पर्यटकांसाठी आनंदाची बातमी; साडेचार महिन्यांच्या प्रतीक्षेनंतर माथेरानची राणी पुन्हा धावली
मुंबईत अचानक पावसाची हजेरी, ऑक्टोबरच्या उकाड्यानंतर रिमझिम सरी...
Mumbai Rain Updates : मुंबईत अचानक पावसाची हजेरी, ऑक्टोबरच्या उकाड्यानंतर रिमझिम सरी; वातावरणात गारवा
मुख्यमंत्र्यांना 2029 पर्यंत ठेवा म्हणजे झालं; राज ठाकरेंचं विधान
Raj Thackeray : मुख्यमंत्र्यांना 2029 पर्यंत ठेवा म्हणजे झालं... भाषणाच्या सुरुवातीलाच राज ठाकरेंचं वक्तव्य, CM स्वतःच हसू लागले