Anshul Kamboj : एका डावात 10 विकेट्स, दिग्गज कुंबळे, जडेजा-बुमराहसह खास कनेक्शन, कोण आहे अंशुल कंबोज?
Anshul Kamboj Biography : आपल्या देशाचं प्रतिनिधित्व करावं, असं प्रत्येक खेळाडूंचं स्वप्न असतं. मात्र प्रत्येक खेळाडूचं हे स्वप्न पूर्ण होतंच अंस नाही. अंशुल कंबोज याला दुखापतीमुळे भारताकडून कसोटीत पदार्पणाची संधी मिळाली. अंशुलचा इथवरचा प्रवास कसा होता? अंशुलने देशांतर्गत क्रिकेटमध्ये कशी कामगिरी केली? जाणून घ्या.

इंग्लंड दौऱ्यावर असलेल्या भारतीय क्रिकेट संघामागे दुखापतीचं ग्रहण लागलं. इंग्लंड विरूद्धच्या चौथ्या कसोटीआधी आकाश दीप आणि अर्शदीप सिंह या 2 वेगवान गोलंदाजांना दुखापतीमुळे चौथ्या सामन्यातून बाहेर व्हावं लागलं. तर ऑलराउंडर नितीश कुमार रेड्डी याचा दुखापतीमुळे उर्वरित मालिकेतूनच पत्ता कट झाला. एकाच वेळी दुखापतीने 3 खेळाडूंची विकेट काढली. मात्र ही दुखापत एका खेळाडूच्या पथ्यावर पडली आणि त्याला थेट कसोटी पदार्पणाची संधी मिळाली. अंशुल कंबोज याचा संघात कव्हर म्हणून समावेश करण्यात आला. मात्र अंशुलला इंग्लंड विरुद्ध चौथ्या कसोटी सामन्यातून आंतरराष्ट्रीय पदार्पण करण्याची संधी मिळाली. हरियाणातील एका छोट्या गावातून आलेल्या अंशुलला मँचेस्टरमध्ये खेळण्याची संधी मिळाली. हरियाणा...
