Shubman Gill चा महारेकॉर्ड, अशी कामगिरी करणारा पहिलाच भारतीय कर्णधार
Shubman Gill ENG vs IND 5th Test : भारतीय कर्णधार शुबमन गिल याने पाचव्या आणि अंतिम कसोटी सामन्यात 22 धावांच्या खेळीसह 2 माजी दिग्गजांना मागे टाकत इतिहास रचला आहे. जाणून घ्या.

भारतीय कसोटी संघाचा कर्णधार शुबमन गिल याने आतापर्यंत इंग्लंड दौऱ्यातील कसोटी मालिकेत उल्लेखनीय कामगिरी केलीय. इंग्लंड दौऱ्याआधी रोहित शर्माच्या निवृत्तीनंतर शुबमनला कर्णधार करण्यात आलं. या निर्णयावरुन टीका करण्यात आली. शुबमनला नेतृत्व जमणार नाही, असं काही क्रिकेटप्रेमींनी म्हटलं. मात्र शुबमनने इंग्लंड दौऱ्यात धावांचा पाऊस पाडून त्याच्या नेतृत्वावर आणि बॅटिंगच्या क्षमतेवर शंका घेणाऱ्यांना चोख उत्तर दिलं. शुबमनने या मालिकेत अनेक विक्रम मोडीत काढले. शुबमनने हाच झपाटा कायम ठेवत केनिंग्टन ओव्हलमधील पाचव्या कसोटी सामन्यात इतिहास घडवला आहे.
शुबमनला पाचव्या कसोटीतील पहिल्या डावात ठीकठाक सुरुवात मिळाली. मात्र शुबमन घाईगडबडीत रनआऊट झाला. शुबमनने 21 धावा केल्या. मात्र या खेळीसह शुबमनने इतिहास रचला. शुबमनने या खेळीसह महारेकॉर्ड केला. शुबमनने 2 माजी फलंदाजांना मागे टाकलं. शुबमनने सुनील गावसकर आणि गॅरी सोबर्स यांना पछाडलं. शुबमनने 2 धावा करताच गॅरी सोबर्स यांना मागे टाकलं. तर 11 वी धाव पूर्ण करताच शुबमन अशी कामगिरी करणारा पहिलाच भारतीय कर्णधार ठरला.
शुबमन नंबर 1 भारतीय कर्णधार
शुबमनने 11 वी धाव घेताच तो एका कसोटी मालिकेत भारतासाठी सर्वाधिक धावा करणारा पहिला कर्णधार ठरला. शुबमनने सुनील गावसकर यांचा रेकॉर्ड मोडला. गावसकरांनी विंडीज विरुद्ध 1978-1979 साली झालेल्या मालिकेत 732 धावा केल्या होत्या. तसेच शुबमनने सेना देशात एका मालिकेत सर्वाधिक धावा करणारा कर्णधार होण्याचा बहुमान मिळवला.
शुबमनच्या निशाण्यावर 2 विक्रम
शुबमनला या मालिकेत आणखी 2 विक्रम मोडीत काढण्याची संधी आहे. गावसकरांनी एका मालिकेत 774 धावा केल्या होत्या. शुबमनला हा विक्रम मोडीत काढण्याची संधी आहे. तसेच शुबमनने एकूण 811 धावा केल्यास तो इंग्लंडमध्ये एका मालिकेत सर्वाधिक धावा करणारा पहिला फलंदाज ठरेल. इंग्लंडमध्ये एका मालिकेत सर्वाधिक धावा करण्याचा विक्रम हा सर डॉन ब्रॅडमॅन यांच्या नावावर आहे. ब्रॅडमॅन यांनी 90 वर्षांपूर्वी ही कामगिरी केली होती.
शुबमनची जबरदस्त कामगिरी
दरम्यान शुबमनने कर्णधार म्हणून पहिल्याच कसोटी मालिकेत चमकदार कामगिरी केली. शुबमनने 1 द्विशतक आणि 3 शतकं झळकावली. शुबमनने आतापर्यंत या मालिकेतील 5 सामन्यांमधील 9 डावांत 743 धावा केल्या आहेत.
