AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

ENG vs IND : इंग्लंड-इंडिया चौथा कसोटी सामना, शुबमनसेना मँचेस्टरमध्ये कमबॅक करणार?

England vs India 4th Test Live Streming : टीम इंडिया या टेस्ट सीरिजमध्ये पिछाडीवर आहे. मालिकेत कायम राहण्यासाठी भारताला मँचेस्टरमध्ये होणारा सामना कोणत्याही स्थितीत जिंकावाच लागणार आहे.

ENG vs IND : इंग्लंड-इंडिया चौथा कसोटी सामना, शुबमनसेना मँचेस्टरमध्ये कमबॅक करणार?
Shubman Gill Team India Huddlle TalkImage Credit source: Bcci
| Updated on: Jul 23, 2025 | 12:36 AM
Share

इंग्लंड विरुद्ध इंडिया यांच्यात 5 सामन्यांची कसोटी मालिका खेळवण्यात येत आहे. इंग्लंडने लॉर्ड्समध्ये झालेल्या तिसऱ्या सामन्यात 22 धावांनी विजय मिळवून मालिकेत 2-1 ने आघाडी घेतली. इंग्लंडने यासह आता मालिका विजयाचा दावा मजबूत केला आहे. तर दुसऱ्या बाजूला भारतीय संघाला मालिकेत कायम राहण्यासाठी चौथ्या सामन्यात विजय मिळवायचा आहे. त्यामुळे चौथ्या सामन्यात भारतीय संघांची अग्निपरीक्षा असणार आहे. शुबमन गिल भारतीय संघातं नेतृत्व करणार आहे. तर बेन स्टोक्स याच्याकडे इंग्लंडच्या कर्णधारपदाची जबाबदारी आहे. या सामन्याबाबत महत्त्वाची माहिती जाणून घेऊयात.

इंग्लंड विरुद्ध भारत चौथा कसोटी सामना केव्हा?

इंग्लंड विरुद्ध भारत चौथा कसोटी सामना बुधवार 23 जुलैपासून खेळवण्यात येणार आहे.

इंग्लंड विरुद्ध भारत चौथा कसोटी सामना कुठे?

इंग्लंड विरुद्ध भारत चौथा कसोटी सामना मँचेस्टरमधील एमिरेट्स ओल्ट ट्रॅफर्ड मैदानात खेळवण्यात येणार आहे.

इंग्लंड विरुद्ध भारत चौथ्या कसोटी सामन्याला किती वाजता सुरुवात होणार?

इंग्लंड विरुद्ध भारत चौथ्या कसोटी सामन्याला भारतीय वेळेनुसार दुपारी 3 वाजून 30 मिनिटांनी सुरुवात होईल. तर 3 वाजता टॉस होईल.

इंग्लंड विरुद्ध भारत चौथा कसोटी सामना टीव्ही आणि मोबाईलवर कुठे पाहता येईल?

इंग्लंड विरुद्ध भारत चौथ्या कसोटी सामना टीव्हीवर स्टार स्पोर्ट्स नेटवर्कवरील चॅनेल्सवर पाहायला मिळेल. तर जिओहॉटस्टार एपवर लाईव्ह मॅचचा आनंद घेता येईल.

टीम इंडियात 2 बदल निश्चित

इंग्लंडने सामन्याच्या 48 तासांआधी प्लेइंग ईलेव्हनची घोषणा केली. यजमान संघाने दुखापतीमुळे मालिकेतून बाहेर पडलेल्या शोएब बशीर याच्या जागी लियाम डॉसन याला संधी दिली आहे. तर दुसऱ्या बाजूला भारताच्या 3 पैकी 2 खेळाडूंना दुखापतीमुळे चौथ्या सामन्यातून बाहेर व्हावं लागलं आहे. यामध्ये अर्शदीप सिंह आणि आकाश दीप या दोघांचा समावेश आहे. तर नितीश कुमार रेड्डी दुखापतीमुळे मालिकेतूनच बाहेर झाला आहे. अशात आता प्लेइंग ईलेव्हनमध्ये शार्दूल ठाकुर आणि अंशुल कंबोज या दोघांना संधी मिळू शकते.

शुबमनसेना मँचेस्टरमध्ये इतिहास घडवणार?

दरम्यान मँचेस्टरमध्ये टीम इंडियाला कसोटी क्रिकेटमध्ये आतापर्यंत एकदाही विजय मिळवता आलेला नाही. भारताला या मैदानात खेळलेल्या 9 पैकी 4 सामन्यात पराभूत व्हावं लागलंय. तर 5 सामने भारताने अनिर्णित राखले आहेत. त्यामुळे या मैदानात शुबमनसेना विजयाचं खातं उघडणार का? याकडे क्रिकेट विश्वाचं लक्ष असणार आहे.

महाराष्ट्रात शिक्षकांच राज्यव्यापी आंदोलन, या मागण्यांसाठी पुकारला संप
महाराष्ट्रात शिक्षकांच राज्यव्यापी आंदोलन, या मागण्यांसाठी पुकारला संप.
ऐतिहासिक सारंगखेडा यात्रेला सुरूवात, कोट्यवधीच्या घोड्यांची विक्री अन
ऐतिहासिक सारंगखेडा यात्रेला सुरूवात, कोट्यवधीच्या घोड्यांची विक्री अन.
तपोवनच्या वादात राणेंनी ईदच्या बकरीला आणलं खेचून! नेमकं काय म्हणाले?
तपोवनच्या वादात राणेंनी ईदच्या बकरीला आणलं खेचून! नेमकं काय म्हणाले?.
भाजप-शिंदेंच्या सेनेत भडका: फोडाफोडीवरून शिरसाटांचा भाजपला इशारा
भाजप-शिंदेंच्या सेनेत भडका: फोडाफोडीवरून शिरसाटांचा भाजपला इशारा.
पुतीन भारतात, दोस्ती दमदार..रशियाचे राष्ट्राध्यक्ष दोन दिवसीय दौऱ्यावर
पुतीन भारतात, दोस्ती दमदार..रशियाचे राष्ट्राध्यक्ष दोन दिवसीय दौऱ्यावर.
अंदर की बात है, खडसे एकसाथ है? खडसे कुटुंबाची पडद्यामागे भाजपला मदत?
अंदर की बात है, खडसे एकसाथ है? खडसे कुटुंबाची पडद्यामागे भाजपला मदत?.
पवार कुटुंबात भाऊबंदकीचं ग्रहण? लग्नसमारंभातील अनुपस्थितीमुळे चर्चा
पवार कुटुंबात भाऊबंदकीचं ग्रहण? लग्नसमारंभातील अनुपस्थितीमुळे चर्चा.
नगरपालिका निवडणुकीनंतर राड्यानंतर आता EVM लाा CCTV, पोलिसांचा पहारा
नगरपालिका निवडणुकीनंतर राड्यानंतर आता EVM लाा CCTV, पोलिसांचा पहारा.
ईदला बकरीला मिठ्या... तपोवनचं साधूग्राम अन् राणेंनी आणलं हिंद-मुसलमान!
ईदला बकरीला मिठ्या... तपोवनचं साधूग्राम अन् राणेंनी आणलं हिंद-मुसलमान!.
दादांच्या मुलाच डेस्टिनेशन वेडिंग,असं असणार जय पवारांचं बहरीनमधलं लग्न
दादांच्या मुलाच डेस्टिनेशन वेडिंग,असं असणार जय पवारांचं बहरीनमधलं लग्न.