ENG vs SA : क्विंटन डी कॉक आऊट की नॉट आऊट! सोशल मीडियावर रंगली चर्चा, व्हिडीओ पाहून तु्म्हीच काय ते ठरवा
टी20 वर्ल्डकप स्पर्धेतील उपांत्य फेरीच्या दृष्टीने महत्त्वाचा सामना इंग्लंड आणि दक्षिण अफ्रिकेत सुरु आहे. या सामन्यात एका चुकीचा फटका इंग्लंडला बसला. मार्क वूडने क्विंटन डी कॉकचा सोप झेल घेताना चूक केली.

टी20 वर्ल्डकप स्पर्धेतील सुपर 8 फेरीतील महत्त्वाचा सामना इंग्लंड आणि दक्षिण अफ्रिका यांच्यात सुरु आहे. इंग्लंडने नाणेफेकीचा कौल जिंकून प्रथम गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतला. दक्षिण अफ्रिकेने प्रथम फलंदाजी करताना 20 षटकात 6 गडी गमवून 163 धावा केल्या आणि विजयासाठी 164 धावांचं आव्हान दिलं. या सामन्यात क्विंटन डी कॉकने आक्रमक खेळी केली. त्याने 38 चेंडूत 4 षटकार आणि 4 चौकारांच्या मदतीने 65 धावा केल्या. दक्षिण अफ्रिकेने 8 षटकात बिनबाद 75 धावा केल्या होत्या. त्यामुळे इंग्लंडचे गोलंदाज तणावात होते. कशीही करून एक विकेट घेण्यासाठी धडपड सुरु होती. नववं षटक आदिल राशिदकडे सोपवलं आणि पहिल्या चेंडूवर रीझा हेन्ड्रिकने 1 धाव घेत डी कॉकला स्ट्राईक दिली. डीकॉक 29 चेंडूत 58 धावा करून खेळत होता. आदिलच्या दुसऱ्या चेंडूवर डीकॉकने जोरदार फटका मारला. पण चेंडू मार्क वूडच्या हाता गेला. पण एका चुकीने हाती आलेला झेल वाया गेला. पंचांनी चेंडू मैदानाला टेकल्याचं कारण देत नाबाद घोषित केलं. यामुळे मैदानात थोडी तू तू मै मै झाली.
मार्क वूडने झेल घेतल्यानंतर आनंद साजरा करण्यास सुरुवात केली. तेव्हा क्विंटन डी कॉक थोडी गडबड वाटली आणि त्याने पंचांकडे दाद मागितली. तिसऱ्या पंचांनी बऱ्याच वेळ झेल पाहिला. त्यानंतर एका अँगलमध्ये दोन बोटांच्या मध्ये चेंडू मैदानाला घासल्याचं दिसलं. तेव्हा तिसऱ्या पंचांनी नाबाद असल्याचं सांगितलं. त्यामुळे इंग्लंडने नाराजी व्यक्त केली. आता या वरून सोशल मीडियावर वाद रंगला आहे. काही जणांचा मते आऊट आहे, तर काही जणांनी पंचांचा निर्णय योग्य असल्याचं सांगितलं आहे.
View this post on Instagram
सुपर 8 फेरीत क्विंटन डीकॉकला आपला फॉर्म परत मिळला. अमेरिकेविरुद्ध 40 चेंडूत 74 धावा केल्यानंतर इंग्लंडविरुद्ध 38 चेंडूत 65 धावा केल्या. या वर्ल्डकपमध्ये वेगवान अर्धशतक झळकावणारा दुसरा फलंदाज ठरला आहे. 22 चेंडूत क्विंटने अर्धशतक झळकावलं. अमेरिकेच्या आरोन जोन्सने कॅनडाविरुद्ध 22 चेंडूत अर्धशतक झळकावलं होतं.
दोन्ही संघांची प्लेइंग 11
दक्षिण आफ्रिका (प्लेइंग इलेव्हन): क्विंटन डी कॉक (विकेटकीपर), रीझा हेंड्रिक्स, एडन मार्कराम (कर्णधार), डेव्हिड मिलर, हेनरिक क्लासेन, ट्रिस्टन स्टब्स, मार्को जॅनसेन, केशव महाराज, कागिसो रबाडा, एनरिक नॉर्टजे, ओटनील बार्टमन.
इंग्लंड (प्लेइंग इलेव्हन): फिलिप सॉल्ट, जोस बटलर (विकेटकीपर/कर्णधार), हॅरी ब्रूक, जॉनी बेअरस्टो, मोईन अली, लियाम लिव्हिंगस्टोन, सॅम करन, जोफ्रा आर्चर, आदिल रशीद, मार्क वुड, रीस टोपले.
