ENG vs SA : वनडेनंतर टी 20I मालिकेचा थरार, इंग्लंड विरुद्ध दक्षिण आफ्रिका आमनेसामने, पहिला सामना केव्हा?
England vs South Africa 1st T20I Live Streaming : इंग्लंड विरुद्ध दक्षिण आफ्रिका यांच्यात एकदिवसीय मालिकेनंतर 10 सप्टेंबरपासून टी 20i मालिका खेळवण्यात येणार आहे. या मालिकेसाठी दोन्ही संघ सज्ज झाले आहेत. जाणून घ्या.

दक्षिण आफ्रिकेने इंग्लंड दौऱ्यात अप्रतिम सुरुवात केली. इंग्लंडने सलग 2 सामने जिंकत 3 सामन्यांची एकदिवसीय मालिका आपल्या नावावर केली. तर इंग्लंडने तिसऱ्या आणि अंतिम सामन्यात विजय मिळवत लाज राखली. इंग्लंडने यासह दक्षिण आफ्रिकेला विजयी हॅटट्रिकपासून रोखलं. दक्षिण आफ्रिकेने ही मालिका 2-1 अशा फरकाने जिंकली. त्यानंतर आता उभयसंघात टी 20I मालिकेचा थरार रंगणार आहे. इंग्लंड विरुद्ध दक्षिण आफ्रिका यांच्यात 10 ते 14 सप्टेंबर दरम्यान एकूण 3 टी 20I सामने होणार आहेत. एडन मारक्रम दक्षिण आफ्रिकेचं नेतृत्व करणार आहे. तर हॅरी ब्रूक याच्याकडे इंग्लंडच्या कर्णधारपदाची जबाबदारी असणार आहे. हा सामना टीव्ही आणि मोबाईलवर कुठे पाहता येणार? सामन्याला किती वाजता सुरुवात होणार? हे जाणून घेऊयात.
इंग्लंड विरुद्ध दक्षिण आफ्रिका पहिला टी 20I सामना केव्हा?
इंग्लंड विरुद्ध दक्षिण आफ्रिका पहिला टी 20I बुधवारी 10 सप्टेंबरला खेळवण्यात येणार आहे.
इंग्लंड विरुद्ध दक्षिण आफ्रिका पहिला टी 20I सामना कुठे?
इंग्लंड विरुद्ध दक्षिण आफ्रिका पहिला टी 20I कार्डीफमधील सोफिया गार्डन्समध्ये होणार आहे.
इंग्लंड विरुद्ध दक्षिण आफ्रिका पहिल्या टी 20I सामन्याला किती वाजता सुरुवात होणार?
इंग्लंड विरुद्ध दक्षिण आफ्रिका पहिल्या टी 20I सामन्याला भारतीय वेळेनुसार रात्री 11 वाजता सुरुवात होईल. तर 10 वाजून 30 मिनिटांनी टॉस होईल.
इंग्लंड विरुद्ध दक्षिण आफ्रिका पहिला टी 20I सामना टीव्हीवर कुठे पाहायला मिळेल?
इंग्लंड विरुद्ध दक्षिण आफ्रिका पहिला टी 20I सामना टीव्हीवर सोनी स्पोर्ट्स नेटवर्कवरील चॅनेल्सवर पाहता येईल.
इंग्लंड विरुद्ध दक्षिण आफ्रिका पहिला टी 20I सामना मोबाईलवर कुठे पाहायला मिळेल?
इंग्लंड विरुद्ध दक्षिण आफ्रिका पहिला टी 20I सामना मोबाईल आणि लॅपटॉपवर फॅनकोड एपद्वारे पाहता येईल.
कोण करणार विजयी सुरुवात?
दक्षिण आफ्रिकेने एकदिवसीय मालिकेतील पहिले सलग 2 सामने जिंकले होते. तसेच मालिकाही जिंकली. त्यामुळे इंग्लंडसमोर टी 20I मालिका जिंकण्याचा दबाव असणार आहे. तसेच 3 सामन्यांची ही मालिका आहे. त्यामुळे पहिला सामना गमावणाऱ्या संघासाठी दुसऱ्या मॅचमध्ये करो या मरो अशी स्थिती असणार आहे. त्यामुळे दोन्ही संघांचा विजयी सुरुवात करण्याचा प्रयत्न असणार आहे. या प्रयत्नात आता कुणाला यश येणार आणि कुणाची पराभवाने सुरुवात होणार? हे निकालानंतरच स्पष्ट होईल.
