AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

ENG vs SL: श्रीलंकेला विजयासाठी आणखी 430 धावांची गरज, इंग्लंडची सामन्यावर घट्ट पकड

ENG vs SL 2nd Test Day 3 Stumps: इंग्लंडने दुसऱ्या आणि अंतिम कसोटी सामन्यावर घट्ट पकड मिळवली आहे. श्रीलंकेला चौथ्या दिवशी विजयासाठी आणखी 430 धावांची गरज आहे.

ENG vs SL: श्रीलंकेला विजयासाठी आणखी 430 धावांची गरज, इंग्लंडची सामन्यावर घट्ट पकड
england cricket teamImage Credit source: @HomeOfCricket
| Updated on: Aug 31, 2024 | 11:42 PM
Share

इंग्लंड विरुद्ध श्रीलंका यांच्यातील दुसर्‍या कसोटी सामन्यातील तिसऱ्या दिवसाचा खेळ संपला आहे. तिसर्‍या दिवसाचा खेळही इंग्लंडच्या नावावर राहिला. श्रीलंकेला चौथ्या दिवशी विजयासाठी आणखी 430 धावांची गरज आहे. श्रीलंकेने 20 ओव्हरमध्ये 2 विकेट्स गमावून 53 धावा केल्या आहेत. श्रीलंकेकडून दिमुथ करुणारत्ने आणि प्रभाथ जयसूर्या ही जोडी नाबाद परतली. दिमुथ 13 तर प्रभाथ 3 धावांवर नाबाद आहेत. तर निशान मधुशका याने 13 आणि पाथुम निसांका 14 धावांवर आऊट झाला. इंग्लंडकडून गस एटकीन्सन आणि ओली स्टोन या दोघांनी 1-1 विकेट घेतली. त्यामुळे आता क्रिकेट चाहत्यांचं चौथ्या दिवसाच्या खेळाकडे लक्ष असणार आहे. इंग्लंड या मालिकेत 1-0 ने आघाडीवर आहे. त्यामुळे श्रीलंका कुठवर इंग्लंड विरुद्ध झुंज देणार? याकडेही सर्वांची नजर असणार आहे.

इंग्लंडने दुसऱ्या डावात 54.3 ओव्हरमध्ये ऑलआऊट 251 धावा केल्या. तसेच इंग्लंडकडे पहिल्या डावातील 231 धावांची आघाडी होती. त्यामुळे श्रीलंकेला 483 धावांचं आव्हान मिळालं. इंग्लंडकडून जो रुट या दोन्ही डावात सर्वाधिक धावा केल्या. जो रुटने लॉर्ड्स क्रिकेट ग्राउंडमध्ये होत असलेल्या सामन्यातील दोन्ही डावात शतक ठोकून इतिहास रचला. रुट अशी कामगिरी करणारा इंग्लंडचा चौथा फलंदाज ठरला. तसेच रुटने यासह एलिस्टर कूक याच्या सर्वाधिक 33 कसोटी शतकांचा विक्रमही मोडीत काढला. तसेच रुटने श्रीलंकेविरुद्ध सर्वाधिक कसोटी धावा करण्याचा कूकचा विक्रमही मोडला.

इंग्लंडने जो रुट याच्या 143 आणि गस एटकीन्सनच्या 118 धावांच्या जोरावर पहिल्या डावात ऑलआऊट 427 धावा केल्या. श्रीलंकेला प्रत्युत्तरात 196 धावांपर्यंतच मजल मारता आली. त्यामुळे इंग्लंडला 231 धावांची आघाडी मिळाली. इंग्लंडने या आघाडीसह दुसऱ्या डावात रुटच्या शतकी खेळीच्या जोरावर (103) ऑलआऊट 251 धावांपर्यंत मजल मारली. त्यामुळे श्रीलंकेला 483 धावांचं आव्हान मिळालं. श्रीलंकेने दुसऱ्या डावात आता 2 विकेट्स गमावून 53 धावा केल्या आहेत. आता चौथ्या दिवशी इंग्लंड श्रीलंकेला 2-0 अशा फरकाने क्लिन स्वीप देणार का? याकडे साऱ्यांचं लक्ष असणार आहे.

इंग्लंडची दुसऱ्या सामन्यावरही घट्ट पकड

इंग्लंड प्लेइंग ईलेव्हन : ओली पोप (कॅप्टन), डॅनियल लॉरेन्स, बेन डकेट, जो रूट , हॅरी ब्रुक, जेमी स्मिथ (विकेटकीपर), क्रिस वोक्स, गस एटकिंसन, मॅथ्यू पॉट्स, ओली स्टोन आणि शोएब बशीर

श्रीलंका प्लेइंग ईलेव्हन : धनंजय डी सिल्वा (कॅप्टन), दिमुथ करुणारत्ने, निशान मदुष्का, पथुम निसंका, अँजेलो मॅथ्यूज, दिनेश चंडीमल, कामिंदु मेंडिस, प्रभात जयसूर्या, असिथा फर्नांडो, लाहिरू कुमारा आणि मिलन रथनायके.

बहरीनमध्ये जय पवार यांची हळदी, बघा दिमाखदार सोहळ्याचे फोटो
बहरीनमध्ये जय पवार यांची हळदी, बघा दिमाखदार सोहळ्याचे फोटो.
पार्थ पवारांच्या कंपनीचा 42 कोटी भरण्यास नकार, बावनकुळेंनी ठणकावलं
पार्थ पवारांच्या कंपनीचा 42 कोटी भरण्यास नकार, बावनकुळेंनी ठणकावलं.
रविंद्र चव्हाणांकडून समझोता, पण निलेश राणे तयार नाही!
रविंद्र चव्हाणांकडून समझोता, पण निलेश राणे तयार नाही!.
महायुतीतील मतभेद दूर, आगामी निवडणुका एकत्र लढणार! बघा कोण काय म्हणालं?
महायुतीतील मतभेद दूर, आगामी निवडणुका एकत्र लढणार! बघा कोण काय म्हणालं?.
राणीच्या बागेतील दोन्ही वाघांचा मृत्यू, कारण लपवण्याचं कारण काय?
राणीच्या बागेतील दोन्ही वाघांचा मृत्यू, कारण लपवण्याचं कारण काय?.
'अडीच वर्षाचा स्पीड ब्रेकर सोडला, तर गेल्या 11 वर्षात प्रगतीचं...'
'अडीच वर्षाचा स्पीड ब्रेकर सोडला, तर गेल्या 11 वर्षात प्रगतीचं...'.
पुतीन यांची भारताला मोठी ग्वाही अन् रशिया-भारत करारांवर दिला भर
पुतीन यांची भारताला मोठी ग्वाही अन् रशिया-भारत करारांवर दिला भर.
भारत-रशियात महत्त्वपूर्ण करार, PM मोदी म्हणाले आता व्यापारी संबंधाना..
भारत-रशियात महत्त्वपूर्ण करार, PM मोदी म्हणाले आता व्यापारी संबंधाना...
भाजप-ठाकरे सेनेचा कामगार युनियनवरून राडा, वांद्र्यानंतर वरळीत घडल काय?
भाजप-ठाकरे सेनेचा कामगार युनियनवरून राडा, वांद्र्यानंतर वरळीत घडल काय?.
सुट्ट्यांबाबत इंडिगोचे नियम शिथिल, DGCA कडून जारी केलेले नवे आदेश काय?
सुट्ट्यांबाबत इंडिगोचे नियम शिथिल, DGCA कडून जारी केलेले नवे आदेश काय?.