ENG vs SL Live Streaming : श्रीलंकेची अस्तित्वाची लढाई, तर इंग्लंडला पहिल्या स्थानाचे वेध; जाणून घ्या सामन्याबाबत
England vs Sri Lanka Womens World Cup 2025 Live Match Score : वुमन्स वनडे वर्ल्डकप स्पर्धेतील 12वा सामना श्रीलंका आणि इंग्लंड यांच्यात होत आहे. हा सामना दोन्ही संघासाठी महत्त्वाच आहे. इंग्लंडला पहिल्या स्थानासाठी, तर श्रीलंकेला स्पर्धेतील आव्हान कायम ठेवण्यासाठी हा सामना जिंकणं भाग आहे.

श्रीलंका आणि इंग्लंड यांच्यात आयसीसी वनडे वुमन्स वर्ल्डकप 2025 स्पर्धेतील 12वा सामना होत आहे. हा सामना श्रीलंकेतील कोलंबोच्या आर. प्रेमदासा स्टेडियमवर होणार आहे. या स्पर्धेतील दोन्ही संघांचा हा तिसरा सामना आहे. इंग्लंडने सलग दोन सामन्यात विजय मिळवला आहे. इंग्लंडने दक्षिण आफ्रिका आणि बांगलादेशविरुद्धच्या दोन्ही सामन्यात विजय मिळवला आहे. तर श्रीलंका दोन सामने खेळली. श्रीलंकेची या स्पर्धेतील सुरुवात काही चांगली झाली नाही. गुवाहाटीतील बरसापारा स्टेडियमवर भारताने 59 धावांनी पराभूत केलं. त्यात भारताविरूद्धचा सामना गमवला. तर ऑस्ट्रेलिया विरुद्धचा सामना पावसामुळे रद्द झाला. त्यामुळे श्रीलंकेच्या खात्यात 1 गुण आहे. आता श्रीलंका आपल्या विजयासाठी आतुर आहे. श्रीलंका आणि इंग्लंड यांच्यात आतापर्यंत 20 वनडे सामने झाले आहेत. यात इंग्लंडने 17 आणि श्रीलंकेने फक्त 3 सामने जिंकले आहे. यावरून इंग्लंडचं पारडं जड दिसत आहे.
आर. प्रेमदासा स्टेडियमच्या खेळपट्टीचा अंदाज
कोलंबोमधील आर . प्रेमदासा स्टेडियममधील खेळपट्टी फलंदाजीसाठी अनुकूल आहे. सुरुवातीच्या षटकांमध्ये वेगवान गोलंदाजांना फायदा मिळेल. पण सामना पुढे जाताच फिरकीपटूंचं वजन वाढेल आणि मधल्या टप्प्यात विकेट काढू शकतात. मैदानावर अनेकदा मोठी धावसंख्या झाली आहे. दुसऱ्या डावात फिरकीचं वर्चस्व वाढतं. या मैदानात खेळलेल्या 24 महिला एकदिवसीय सामन्यांपैकी प्रथम फलंदाजी करणाऱ्या संघांनी 14 जिंकले आहेत. तर 10 सामन्यांमध्ये पाठलाग करणाऱ्या संघांनी विजय मिळवला आहे. नाणेफेक जिंकणारा संघ प्रथम फलंदाजी स्वीकारेल.
आयसीसी वनडे वुमन्स वर्ल्डकप 2025 मधील श्रीलंका विरुद्ध इंग्लंड सामना कधी खेळला जाणार आहे?
श्रीलंकेचा सामना आयसीसी वुमन्स वर्ल्डकप 2025 स्पर्धेतील 12 वा सामना श्रीलंका आणि इंग्लंड यांच्यात होत आहे. हा सामना शनिवारी, 11 ऑक्टोबर 2025 रोजी दुपारी 3:00 वाजतापासून इंग्लंडशी होईल.
श्रीलंका विरुद्ध इंग्लंड सामना भारतात कुठे थेट पाहता येईल?
श्रीलंका आणि इंग्लंड यांच्यातील आयसीसी वुमन्स वर्ल्डकप 2025 चा सामना जिओहोस्टार आणि स्टार स्पोर्ट्सवर लाईव्ह पाहता येईल.
दोन्ही संघांचे खेळाडू
श्रीलंकेचा महिला संघ : हसिनी परेरा, चामारी अथापथु (कर्णधार), हर्षिता समरविक्रमा, विश्मी गुणरत्ने, कविशा दिलहरी, निलाक्षी डी सिल्वा, अनुष्का संजीवनी (विकेटकीपर), सुगंधिका कुमारी, अचिनी कुलसूरिया, उदेशिका प्रबोधनी, इनोका रनवीरा, देवमी वोनाहँग, पियुमी वत्सला बादलगे, मलकी मदारा, इमेषा दुलानी.
इंग्लंड महिला संघ : टॅमी ब्यूमोंट, एमी जोन्स (विकेटकीपर), हीदर नाइट, नॅट सायव्हर-ब्रंट (कर्णधार), सोफिया डंकली, एम्मा लॅम्ब, एलिस कॅप्सी, चार्लोट डीन, सोफी एक्लेस्टोन, लिन्सी स्मिथ, लॉरेन बेल, एम आर्लॉट, लॉरेन फाइलर, सारा ग्लेन, डॅनिएल वायट-हॉज.
