AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

ENG vs IND : इंग्लंड-इंडिया पाचव्या कसोटीसाठी टीम जाहीर, ऑलराउंडरचं 3 वर्षांनंतर कमबॅक

England vs India 5th Test : इंग्लंड विरुद्ध इंडिया यांच्यातील चौथा सामना हा 27 जुलैला बरोबरीत राहिला. त्यानंतर अवघ्या काही तासांनी आता पाचव्या सामन्यासाठी 15 सदस्यीय संघाची घोषणा करण्यात आली आहे. जाणून घ्या.

ENG vs IND : इंग्लंड-इंडिया पाचव्या कसोटीसाठी टीम जाहीर, ऑलराउंडरचं 3 वर्षांनंतर कमबॅक
England vs India Test CricketImage Credit source: Bcci
| Updated on: Jul 28, 2025 | 2:53 PM
Share

इंग्लंड विरुद्ध इंडिया यांच्यातील चौथा कसोटी सामना हा अनिर्णित राहिला. भारतीय संघाने इंग्लंडच्या दुसर्‍या डावातील 311 च्या प्रत्युत्तरात पाचव्या दिवसापर्यंत 4 बाद 425 धावा केल्या. भारताने यासह इंग्लंडच्या तोंडातील विजयाचा घास हिसकावला आणि सामना यशस्वीरित्या बरोबरीत राखला. त्यानंतरही इंग्लंड मालिकेत 2-1 ने आघाडीवर आहे. आता मालिकेतील पाचवा आणि अंतिम सामना हा लंडनमधील केनिंग्टन ओव्हल येथे होणार आहे. या सामन्याचा थरार 31 जुलैपासून रंगणार आहे. या सामन्यासाठी यजमान इंग्लंडने 3 दिवसआधीच संघ जाहीर केला आहे. इंग्लंड क्रिकेट बोर्डाने सोशल मीडियावरुन याबाबतची माहिती दिली आहे.

3 वर्षांनंतर जेमी ओव्हरटन याचा समावेश

इंग्लंडने पाचव्या कसोटीसाठी 15 सदस्यीय संघ जाहीर केलाय. बेन स्टोक्स इंग्लंडचं नेतृत्व करणार आहे. इंग्लंडने या सामन्यासाठी फक्त एकाच खेळाडूचा समावेश केला आहे. इंग्लंडने ऑलराउंडर जेमी ओव्हटन याला संधी दिली आहे. जेमीचं यासह तब्बल 3 वर्षांनंतर संघात कमबॅक झालं आहे.

जेमीने 2022 साली कसोटी पदार्पण केलं होतं. जेमीने न्यूझीलंड विरुद्ध लीड्समध्ये पदार्पण केलं होतं. जेमीने त्या सामन्यात 2 विकेट्स घेण्यासह 97 धावा करत उल्लेखनीय कामगिरी केली होती. मात्र त्यानंतर जेमीला संघातून बाहेर करण्यात आलं. त्यानंतर आता जेमीचं 3 वर्षांच्या दीर्घ प्रतिक्षेनंतर पुनरागमन झालं आहे. आता इंग्लंड टीम मॅनेजमेंट जेमीला पाचव्या सामन्यासाठी प्लेइंग ईलेव्हनमध्ये संधी देते का? याकडे क्रिकेट चाहत्यांचं लक्ष असणार आहे.

ऋषभ पंत पाचव्या सामन्यातून बाहेर

दरम्यान भारतीय संघाचा उपकर्णधार आणि विकेटकीपर ऋषभ पंत याला दुखापतीमुळे पाचव्या कसोटी सामन्यातून बाहेर व्हावं लागलं आहे. चौथ्या कसोटी सामन्यानंतर बीसीसीआयने याबाबतची माहिती दिली. पंतला चौथ्या सामन्यात फलंदाजीदरम्यान फटका मारताना दुखापत झाली. पंतच्या पायावर बॉल आदळला. त्यामुळे फ्रॅक्चर झालं. त्यामुळे पंतला पाचव्या सामन्याला मुकावं लागलं आहे. पंतच्या जागी एन जगदीशन याचा संघात समावेश करण्यात आला आहे.

इंग्लंड पाचव्या कसोटीसाठी सज्ज

टीम इंडिया विरूद्धच्या पाचव्या कसोटीसाठी इंग्लंडचा 15 सदस्यीय संघ : बेन स्टोक्स (कर्णधार), जोफ्रा आर्चर, गस अ‍ॅटकिन्सन, जेकब बेथेल, हॅरी ब्रूक, ब्रायडन कार्स, झॅक क्रॉली, लियाम डॉसन, बेन डकेट, जेमी ओव्हरटन, ओली पोप, जो रूट, जेमी स्मिथ, जोश टंग आणि ख्रिस वोक्स.

मेस्सीच्या स्वागतासाठी मुंबईत वांद्रे सी लिंकवर आकर्षक रोषणाई
मेस्सीच्या स्वागतासाठी मुंबईत वांद्रे सी लिंकवर आकर्षक रोषणाई.
मुंबईत बेपत्ता मुलांची संख्या वाढली, राज ठाकरेंचा सावल
मुंबईत बेपत्ता मुलांची संख्या वाढली, राज ठाकरेंचा सावल.
शरद पवारांना भारतरत्न देण्याची मागणी, सदावर्ते, पडळकरांनी उडवली खिल्ली
शरद पवारांना भारतरत्न देण्याची मागणी, सदावर्ते, पडळकरांनी उडवली खिल्ली.
42 हजार मिळतात म्हणून पीएचडी? दादांच PhD शिष्यवृत्तीवरचं वक्तव्य वादात
42 हजार मिळतात म्हणून पीएचडी? दादांच PhD शिष्यवृत्तीवरचं वक्तव्य वादात.
पार्थ पवार घोटाळा प्रकरणी अधिकाऱ्यांवर ठपका, त्यांनी का रोखलं नाही?
पार्थ पवार घोटाळा प्रकरणी अधिकाऱ्यांवर ठपका, त्यांनी का रोखलं नाही?.
पार्थ पवार काही छोटं बाळ... जमीन गैरव्यवहार प्रकरणी दमानियांची टीका
पार्थ पवार काही छोटं बाळ... जमीन गैरव्यवहार प्रकरणी दमानियांची टीका.
परबांचं विधानसभेत पेनड्राईव्ह बॉम्ब, 'त्या' अधिकाऱ्यांवर कारवाई होणार?
परबांचं विधानसभेत पेनड्राईव्ह बॉम्ब, 'त्या' अधिकाऱ्यांवर कारवाई होणार?.
रस्त्यावरच्या मुलांची DNA टेस्ट करा, राज ठाकरेंचं थेट फडणवीसांना पत्र
रस्त्यावरच्या मुलांची DNA टेस्ट करा, राज ठाकरेंचं थेट फडणवीसांना पत्र.
आवास योजनेतल्या इमारतींना अधिकाऱ्यांची नाव, संभाजीनगर महापालिकेचा फतवा
आवास योजनेतल्या इमारतींना अधिकाऱ्यांची नाव, संभाजीनगर महापालिकेचा फतवा.
तरुणांचं हिंसक आंदोलन, अधिवेशनावर जाणारा लोटांगण मोर्चा पोलिसानी रोखला
तरुणांचं हिंसक आंदोलन, अधिवेशनावर जाणारा लोटांगण मोर्चा पोलिसानी रोखला.