AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

IND vs ENG | दुसऱ्या कसोटीसाठी प्लेईंग ईलेव्हनमध्ये 2 मोठे बदल, या खेळाडूचं पदार्पण

England Playing 11 For 2nd Test Against India | टीम इंडिया विरुद्ध इंग्लंड यांच्यीतील दुसऱ्या कसोटी सामन्याला शुक्रवार 2 फेब्रुवारीपासून सुरुवात होणार आहे. या सामन्यासाठी दोन्ही संघ सज्ज आहेत.

IND vs ENG | दुसऱ्या कसोटीसाठी प्लेईंग ईलेव्हनमध्ये 2 मोठे बदल, या खेळाडूचं पदार्पण
| Updated on: Feb 01, 2024 | 3:17 PM
Share

विशाखापट्टणम | इंग्लंड क्रिकेट टीमने टीम इंडिया विरुद्धच्या 5 सामन्यांच्या कसोटी मालिकेची सुरुवात विजयाने केली. इंग्लंडने हैदराबादमधील पहिला सामना हा चौथ्या दिवशी 28 धावांनी जिंकत 1-0 ने आघाडी घेतली. आता उभयसंघातील दुसरा कसोटी सामना हा 2 फेब्रुवारीपासून विशाखापट्टणम येथे होणार आहे. या सामन्याच्या एक दिवसआधी इंग्लंडने प्लेईंग ईलेव्हन जाहीर करत आपण सज्ज असल्याची घोषणा केली आहे.

इंग्लंडचा कॅप्टन बेन स्टोक्स याने प्लेईंग ईलेव्हनमध्ये 2 बदल केले आहेत. इंग्लंड हैदराबाद कसोटीनुसार विशाखापट्टणममध्येही 3 स्पिनर्स आणि 1 वेगवान गोलंदाजासह मैदानात उतरणार आहे. शोएब बशीर याला अखेर पदार्पणाची संधी मिळाली आहे. तर जेम्स एंडरसन याची टीममध्ये एन्ट्री झाली आहे. तर जॅक लीच दुखापतीमुळे बाहेर पडला आहे. तर मार्क वूड याला बाहेर ठेवण्यात आलं आहे. इंग्लंड क्रिकेटने ट्विटद्वारे प्लेईंग ईलेव्हन जाहीर केल्याची माहिती दिली आहे.

शोएब बशीरचं पदार्पण

दरम्यान अखेर अनेक दिवसांच्या प्रतिक्षेनंतर शोएब बशीर याच्यासाठी इंग्लंड टीमचे दरवाजे उघडे झाले आहेत. शोएबचं पदार्पण हे जवळपास पहिल्याच कसोटीतून होणार होतं. मात्र त्याला भारतात येण्यासाठी आवश्यक व्हीजा मिळाला नाही. त्यामुळे शोएबची प्रतिक्षा लांबली. पण आता शोएब खेळताना दिसणार आहे. शोएब आणि त्याच्या कुटुंबियांसाठी 2 फेब्रुवारी हा अविस्मरणीय असा दिवस असणार आहेत.

दुसऱ्या कसोटी सामन्यासाठी इंग्लंडकडून प्लेईंग ईलेव्हनमध्ये 2 बदल

टीम इंडिया विरुद्धच्या दुसऱ्या टेस्टसाठी इंग्लंडची प्लेईंग ईलेव्हन | बेन स्टोक्स (कॅप्टन), झॅक क्रॉली, बेन डकेट, ओली पोप, जो रूट, जॉनी बेयरस्टो, बेन फोक्स (विकेटकीपर),रेहान अहमद, टॉम हार्टले, शोएब बशीर आणि जेम्स एंडरसन.

दुसऱ्या कसोटी सामन्यासाठी टीम इंडिया | रोहित शर्मा (कॅप्टन), जसप्रीत बुमराह (उपकर्णधार), शुबमन गिल, यशस्वी जयस्वाल, श्रेयस अय्यर, केएस भरत (विकेटकीपर), ध्रुव जुरेल (विकेटकीपर), रवीचंद्रन अश्विन, अक्षर पटेल, कुलदीप यादव, मोहम्मद सिराज, मुकेश कुमार, आवेश खान, रजत पाटीदार, सरफराज खान, वॉशिंग्टन सुंदर आणि सौरभ कुमार.

INTIMASIA 2025 एक्झिबिशनमध्ये फ्लोरेटच्या आधुनिक उत्पादनांचे प्रदर्शन!
INTIMASIA 2025 एक्झिबिशनमध्ये फ्लोरेटच्या आधुनिक उत्पादनांचे प्रदर्शन!.
राजीनामा स्वीकारताच कोकाटेंच्या अटकेसाठी पोलीस रवाना
राजीनामा स्वीकारताच कोकाटेंच्या अटकेसाठी पोलीस रवाना.
फलटण प्रकरणी राजकारण नको! फडणवीसांनी स्पष्टच सांगितलं
फलटण प्रकरणी राजकारण नको! फडणवीसांनी स्पष्टच सांगितलं.
ड्रग्जचे कारखाने गुंतवणूक आहे का? राऊतांचा खोचक प्रश्न
ड्रग्जचे कारखाने गुंतवणूक आहे का? राऊतांचा खोचक प्रश्न.
.. म्हणून एकनाथ शिंदेंचा राजीनामा घ्या! सुषमा अंधारेंची मोठी मागणी
.. म्हणून एकनाथ शिंदेंचा राजीनामा घ्या! सुषमा अंधारेंची मोठी मागणी.
थंडीचा कडाका वाढला; रब्बी हंगामासाठी पोषक वातावरण
थंडीचा कडाका वाढला; रब्बी हंगामासाठी पोषक वातावरण.
अजितदादांकडून फडणवीसांची भेट; मोठं कारण आलं समोर
अजितदादांकडून फडणवीसांची भेट; मोठं कारण आलं समोर.
मुंबईतलं 2017चं सूत्र आता नको; शिंदेंच्या नेत्यांची मागणी
मुंबईतलं 2017चं सूत्र आता नको; शिंदेंच्या नेत्यांची मागणी.
जोपर्यंत देवाभाऊ मुख्यमंत्री, तोपर्यंत...; फडणवीसांचं मोठं विधान
जोपर्यंत देवाभाऊ मुख्यमंत्री, तोपर्यंत...; फडणवीसांचं मोठं विधान.
नाना पटोलेंमुळं काँग्रेस डबघाईला आली! अशोक चव्हाणांचा गंभीर आरोप
नाना पटोलेंमुळं काँग्रेस डबघाईला आली! अशोक चव्हाणांचा गंभीर आरोप.