Maharashtra Election News LIVE : ज्यांच्या जगण्यात उरला नाही भगवान राम, काय करणार हे मुंबईकरांसाठी काम : आशिष शेलार
BMC Maharashtra Municipal Corporation Election 2026 News LIVE Updates: राज्य निवडणूक आयोगाच्या निर्देशानुसार २० डिसेंबर रोजी राज्यातील २४ नगरपरिषदांसाठी मतदान होणार आहे. तर २१ डिसेंबर रोजी सर्व नगरपरिषदांचे निकाल लागतील. न्यायालयीन प्रक्रियेत या पालिकांच्या निवडणुका लांबल्या होत्या.

LIVE NEWS & UPDATES
-
यवतमाळ नगरपरिषद निवडणुकीसाठी उद्या मतदान, २० डिसेंबरला सार्वजनिक सुट्टी जाहीर
यवतमाळ नगर परिषदेसह वणी आणि दिग्रस येथील विविध प्रभागांच्या निवडणुकांसाठी उद्या २० डिसेंबर रोजी मतदान प्रक्रिया पार पडणार आहे. या पार्श्वभूमीवर मतदारांना आपला मतदानाचा हक्क बजावता यावा यासाठी जिल्हा प्रशासनाकडून संबंधित निवडणूक क्षेत्रात सार्वजनिक सुट्टी जाहीर करण्यात आली आहे. निवडणूक पार पाडण्यासाठी आज मतदान पथके साहित्यासह केंद्रांकडे रवाना झाली आहेत. या निवडणुकांसाठी प्रशासकीय यंत्रणा सज्ज झाली आहे. उद्या होणाऱ्या मतदानाकडे संपूर्ण जिल्ह्याचे लक्ष लागले आहे.
-
मी कार्यकर्त्यांमध्ये रमणारा माणूस, रवींद्र धंगेकरांचे स्पष्टीकरण
शिवसेना शिंदे गटाचे नेते रवींद्र धंगेकर यांनी पक्षात डावलले जात असल्याच्या चर्चांचे पूर्णपणे खंडन करत आपली भूमिका स्पष्ट केली आहे. “शिवसेनेकडून मला डावलले जात आहे असे काहीही नाही, काल माझ्याकडे दुसरी जबाबदारी असल्याने मी उपस्थित नव्हतो. मानपानाच्या राजकारणात मला रस नाही. शेवटी कार्यकर्त्यांना रस्त्यावर उतरूनच काम करावे लागते आणि मी स्वतःला आजही एक कार्यकर्ताच मानतो. नेत्यांच्या प्रभावक्षेत्रात राहण्यापेक्षा कार्यकर्त्यांमध्ये रमायला आपल्याला अधिक आवडते, असेही त्यांनी रवींद्र धंगेकर यांनी नमूद केले.
-
-
माणिकराव कोकाटेंच्या याचिकेवर आज उच्च न्यायालयात सुनावणी, राजकीय वर्तुळाचे लक्ष
नाशिक जिल्हा सत्र न्यायालयाने दोन वर्षांची शिक्षा सुनावल्यानंतर माजी आमदार माणिकराव कोकाटे यांनी उच्च न्यायालयात धाव घेतली असून, त्यांच्या याचिकेवर आज महत्त्वाची सुनावणी होणार आहे. या सुनावणीसाठी याचिकाकर्ते अंजली दिघोळे राठोड आणि आशुतोष राठोड स्वतः उच्च न्यायालयात उपस्थित राहणार असून, सत्र न्यायालयाचा शिक्षा कायम ठेवण्याचा निकाल कायम राहावा यासाठी ते जोरदार युक्तिवाद करणार आहेत. दरम्यान, नाशिक पोलिसांचे एक पथक काल रात्रीच मुंबईतील लीलावती रुग्णालयात दाखल झाल्याने या प्रकरणाला वेगळे वळण मिळाले आहे. उच्च न्यायालयातून कोकाटेंना दिलासा मिळतो की त्यांची अडचण वाढते, याकडे आता संपूर्ण राज्याचे लक्ष लागले आहे.
-
भाजपाचा सांगली जिल्ह्यावर”राग”, फसवणूक करणारा पक्ष – खासदार विशाल पाटील यांचा आरोप
भाजपाचा सांगली जिल्ह्यावर राग आहे, सांगली जिल्ह्यासाठी भाजपा कोणताही निधी देणार नाही,फसवणूक करणारा पक्ष असल्याचा आरोप खासदार विशाल पाटील यांनी केला आहे. दहा वर्ष भाजपाचे खासदार होते,त्यावेळी निधी का ? नाही दिला,त्यामुळेच त्या खासदारांनी भाजप सोडली, असा आरोप देखील विशाल पाटलांनी केला आहे.
-
नाशिक – माणिकराव कोकाटे यांच्या याचिकेवर आज उच्च न्यायालयात सुनावणी
नाशिक – माणिकराव कोकाटेंच्या याचिकेवर आज उच्च न्यायालयात सुनावणी होणार आहे. कोकाटेंच्या विरोधातील याचिकाकर्ते अंजली दिघोळे राठोड आणि आशुतोष राठोड हे उच्च न्यायालयात उपस्थित राहणार आहेत. उच्च न्यायालयात देखील कोकाटेंच्या याचिकेला ते आव्हान देणार आहेत. राठोड दांपत्य उच्च न्यायालयात युक्तिवाद करणार असून नाशिक जिल्हा सत्र न्यायालयातील निकाल कायम रहावा यासाठी बाजू मांडणार आहेत.
नाशिक जिल्हा सत्र न्यायालयाने माणिकराव कोकाटे यांच्यासह त्यांचे बंधू विजय कोकाटे यांना दोन वर्षांची शिक्षा सुनावली आहे. आजच्या उच्च न्यायालयातील सुनावणीकडे राज्याचं लक्ष लागलं आहे.
-
-
मीरा-भाईंदरमधील इमारतीत शिरला बिबट्या, 3 जखमी
मीरा-भाईंदरमधील तलाव रोड परिसरातील एका इमारतीत बिबट्या शिरला आहे. बिबट्याच्या हल्ल्यात आत्तापर्यंत 3 जण जखमी झाल्याची माहिती समोर आली आहे. पोलीस आणि अग्निशमन दलाचे जवाने हे घटनास्थळी पोहोचले आहेत. बिबट्याचा वापर मोबाईल कॅमेऱ्यात कैद झाला आहे.
-
दादर स्टेशनबाहेर एक व्यक्ती इमारतीवर चढला
दादर स्टेशनबाहेर एक व्यक्ती इमारतीवर चढला आहे. संबंधित व्यक्ती मनोरुग्ण असल्याची माहिती समोर आली आहे. पोलीस आणि अग्निशमन दलाच्या जवानांकडून त्याच्या रेस्क्यूचे प्रयत्न सुरू आहेत. आज पहाटेपासूनच तो एका इमारतीवर चढून बसल्याचे समजते.
-
-
भाजप आणि शिवसेनेत हिल्या बैठकीत सकारात्मक चर्चा
नांदेड महानगरपालिका निवडणुकीसाठी भाजप आणि शिवसेनेत पहिल्या बैठकीत सकारात्मक चर्चा झाली आहे. शिवसेना शिंदे गटाने ठेवला भाजपा समोर 60 – 40 चा प्रस्ताव दिला आहे.शिवसेना शिंदे गटाचे आमदार बालाजी कल्याणकर यांनी माहिती दिली. आम्ही युतीसाठी सकारात्मक आहोत चर्चेतून तोडगा काढू. तर भाजपकडून अशोकराव चव्हाण काँग्रेसमध्ये असताना संख्याबळ जास्त असल्याचा दाखला देत अधिक जागांची मागणी केली आहे. नांदेड महानगरपालिका क्षेत्रातील मतदारसंघात दोन्ही आमदार शिवसेनेचे असल्याने अधिकच्या जागा मिळवण्यासाठी शिवसेना आग्रही आहे.
-
पुण्यात कडाक्याची थंडी
उत्तरेकडून येणाऱ्या थंड वाऱ्यामुळे राज्यभरात कडाक्याची थंडी सुरू आहे. पुण्यातही तापमानाचा पारा चांगलाच खाली गेलेला पाहायला मिळत आहे. थंडीच्या वातावरणात आहे व्यायाम आरोग्यासाठी अधिक पोषक असल्याने अनेक नागरिक व्यायामासाठी घराबाहेर पडत आहेत.आणखी पुढील काही दिवस तापमानात घट होऊ शकते अंदाज हवामान खात्याच्या वतीने वर्तवण्यात आला आहे.
-
राखीव जागांवरील उमेदवारांसाठी महत्त्वाचे नियम
महापालिका निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर राज्य निवडणूक आयोगाने राखीव जागांवरील उमेदवारांसाठी महत्त्वाचे नियम स्पष्ट केले आहेत.निवडणूक लढवण्यासाठी केवळ जात प्रमाणपत्र पुरेसे नसून जातवैधता प्रमाणपत्र किंवा त्यासाठी पडताळणी समितीकडे केलेल्या अर्जाचा पुरावा जोडणे बंधनकारक आहे. सहा महिन्यांत जातवैधता प्रमाणपत्र सादर करणे आवश्यक आहे.त्यामुळे सहा महिने मुदत असणार आहे.
-
सरपंच संतोष देशमुख खून प्रकरणाची आज बीडच्या विशेष मकोका न्यायालयात सुनावणी
आरोपींवर आज दोष निश्चित होण्याची दाट शक्यता आहे. दोष निश्चित झाल्यानंतर प्रकरण फास्ट ट्रॅकवर चालवलं जाईल. विशेष सरकारी वकील उज्ज्वल निकम उपस्थित राहणार असल्याची माहिती समोर येत आहे. तर देशमुख कुटुंबीय देखील सुनावणीला उपस्थित राहणार आहेत.आजच्या सुनावणीकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.
-
परराज्यातील अवैध मद्य तस्करीवर पुणे उत्पादन शुल्क विभागाची मोठी कारवाई
पुणे राज्य उत्पादन शुल्क विभागाने परराज्यातून होणाऱ्या अवैध मद्य तस्करीविरोधात दोन स्वतंत्र कारवाया करत मोठा साठा जप्त केला. उरुळी कांचन आणि भोर तालुक्यात सापळा रचून एकूण पाच आरोपींना अटक करण्यात आली. या कारवाईत चारचाकी, ट्रकसह सुमारे ४८ लाख रुपयांहून अधिक किमतीचा विदेशी मद्यसाठा जप्त करण्यात आला.
-
पुण्यातील केशवनगरमध्ये बिबट्याचा वावर
‘कोणार्क रिवा’ आणि ‘एल्कोन सिल्व्हर लीफ’ सोसायटीच्या पार्किंग परिसरात बिबट्या सीसीटीव्ही कॅमेऱ्यात कैद झाला. त्यामुळे परिसरात भीतीचे वातावरण आहे. माहिती मिळताच वन विभाग व बचाव पथकाने तपासणी सुरू केली. बिबट्या सापडला नसला, तरी पाण्याच्या टाकीजवळ त्याचे पायांचे ठसे आढळले. नागरिकांनी दक्ष राहण्याचे आवाहन वन विभागाने केले आहे.
-
सुट्टीच्या दिवशी ही कामकाज सुरू राहणार
महापालिका निवडणुकीसाठी राज्यातील जिल्हा जात पडताळणीच्या सुट्टीच्या दिवशी ही कामकाज सुरू राहणार आहे. पालिकेच्या राखीव जागा लढवण्यासाठी उमेदवारांना जात प्रमाणपत्र जात पडताळणी आवश्यक आहे. राज्यातील चार जिल्हा समिती अध्यक्ष पद रिक्त असून त्याचा पदभार लगतच्या जिल्ह्यातील समितीकडे दिला आहे. निवडणूक काळात जात पडताळणी प्रमाणपत्र घेण्यात अडचणी येऊ नये यासाठी सुट्टीच्या दिवशीही कार्यालय सुरू राहणार आहे.
-
माणिकराव कोकाटे यांच्याप्रकरणात हायकोर्टात सुनावणी
माणिकराव कोकाटे यांची उद्या सकाळी अँजिओग्राफी केली जाणार आहे. लिलावती हॉस्पिटलमध्ये सकाळी अँजिओग्राफी केली जाणार आहे.अँजिओग्राफी चा रिपोर्ट आल्यानंतरच माणिकराव कोकाटे यांना अटक करण्यासंदर्भात नाशिक पोलीस निर्णय घेणार आहे. तर आज हायकोर्टात त्यांनी दाखल केलेल्या याचिकेवर सुनावणी होईल.
सध्या राज्या निवडणुकीचा हंगाम सुरू आहे. या वर्षाची अखेर आणि वर्षाची सुरुवात निवडणुकीने होणार आहे. पुढील वर्षी जानेवारी महिन्याच्या मध्यंतरात राज्यातील २९ महानगरपालिकांच्या निवडणुका होत आहेत. तर त्यानंतर जिल्हा परिषद निवडणूक होणार आहे. दरम्यान राज्य निवडणूक आयोगाच्या निर्देशानुसार २० डिसेंबर रोजी राज्यातील २४ नगरपरिषदांसाठी मतदान होणार आहे. तर २१ डिसेंबर रोजी सर्व नगरपरिषदांचे निकाल लागतील. न्यायालयीन प्रक्रियेत या पालिकांच्या निवडणुका लांबल्या होत्या. उद्या आणि परवा दोन दिवस नगरपालिका मतदान आणि निकालांचा धुरळा उडणार आहे.
Published On - Dec 19,2025 8:02 AM
