T20 World Cup 2021 : विराटच्या नशिबी अपयशच येणार, आमचाच संघ वर्ल्डकप जिंकणार, दिग्गज क्रिकेटपटूची भविष्यवाणी

T20 World Cup 2021 : इंग्लंडचा माजी कर्णधार मायकल वॉनने (Michael Vaughan) मात्र यंदाही विराटच्या नशिबी अपयशच येणार असल्याचं सांगत भारत टी ट्वेन्टी वर्ल्डकप जिंकणार नाही, असं भाकित केलंय. यंदाच्या वर्षी इंग्लंडचा संघ तुफान फॉर्मात आहे.

T20 World Cup 2021 : विराटच्या नशिबी अपयशच येणार, आमचाच संघ वर्ल्डकप जिंकणार, दिग्गज क्रिकेटपटूची भविष्यवाणी
भारतीय संघ

मुंबई : विराट कोहलीच्या (Virat Kohli) नेतृत्वाखालील भारतीय संघाने सराव सामन्यात इंग्लंडला पाणी पाजून यंदाच्या टी ट्वेन्टी विश्वचषकाचे (T 20 World Cup 2021) आपण प्रबळ दावेदार असल्याचं सिद्ध केलं.  पण इंग्लंडचा माजी कर्णधार मायकल वॉनने (Michael Vaughan) मात्र यंदाही विराटच्या नशिबी अपयशच येणार असल्याचं सांगत भारत टी ट्वेन्टी वर्ल्डकप जिंकणार नाही, असं भाकित केलंय. यंदाच्या वर्षी इंग्लंडचा संघ तुफान फॉर्मात आहे. त्यामुळे इंग्लंडचा संघ यंदाच्या विश्वचषकावर नाव कोरेल, असं भाकितही मायकल वॉनने केलं आहे.

विराटच्या नशिबी अपयशच!

इंग्लंडचा माजी कर्णधार मायकल वॉन म्हणतो, “मला समजतच नाही की भारतीय संघ विश्चविजेतेपदाचा प्रबळ दावेदार कसा असू शकतो? विराटच्या नेतृत्वाखालील भारतीय संघ पाठीमागील स्पर्धांचा विचार केल्यास खूप मागे आहे. तसंच विश्वविजयापासून ते खूप दूर आहेत. त्यामुळे यंदाचा विश्वचषक भारतीय संघ जिंकेल, अशी सुतरामही शक्यता वाटत नाही”

आमचाच संघ टी ट्वेन्टी वर्ल्ड कप जिंकणार!

मायकेल वॉनने इंग्लंड संघाला जेतेपदाचा प्रबळ दावेदार म्हणून सांगितलं. “इंग्लंड संघात असे काही खेळाडू आहेत जे संघाला विजेता बनवू शकतात. वेस्ट इंडीज आणि पाकिस्तान संघात देखील काही चांगले खेळाडू आहेत. न्यूझीलंड संघात उच्च दर्जाचे खेळाडू आहेत. आम्हाला माहित आहे की ते मॅच विनिंग स्ट्रॅटेजी घेऊन मैदानात उतरतील.ग्लेन मॅक्सवेल ऑस्ट्रेलियासाठी चांगली कामगिरी करेल पण ऑस्ट्रेलिया संघ विश्वचषकात फार दूर जाऊ शकणार नाही”, असं मायकल वॉन म्हणाला.

भारत-इंग्लंडकडे एक-एक वेळा विजेतेपद

भारत आणि इंग्लंड या दोघांनी एकदा टी -20 विश्वचषक जिंकला आहे. भारताने 2007 मध्ये एकमेव टी -20 विश्वचषक जिंकला. दुसरीकडे, इंग्लंडने 2010 मध्ये ऑस्ट्रेलियाला हरवून टी -20 विश्वचषक जिंकला. टी -20 विश्वचषकात दोन्ही संघ वेगवेगळ्या गटात आहेत. अंतिम किंवा उपांत्य फेरीत हे दोन संघ एकमेकांसमोर येऊ शकतात. पहिल्या सराव सामन्यात भारताने इंग्लंडचा 7 गडी राखून पराभव केला.

(England are strong contenders for the T20 World Cup Says England Former Captain Michael Vaughan)

हे ही वाचा :

T20 World Cup साठी भारतीय संघाची रणनीती ठरली, अशी असेल टीम इंडिया, काय म्हणाले रवी शास्त्री?

T20 World Cup 2021: 33 शतकं लगावली, विश्व-चषकही जिंकवून दिला, आता फॉर्म नसल्यामुळे स्वत:च अंतिम 11 मधून बाहेर पडणार

T20 World Cup मध्ये स्कॉटलंडच्या खेळासह जर्सीही फॅन्सना आवडली, 12 वर्षांची चिमुरडी आहे डिझायनर

Click on your DTH Provider to Add TV9 MARATHI