पहिले तीन खेळाडू आजारी, पदार्पणातील सामन्यात दहावा खेळाडू सलामीला उतरला, झंझावाती शतक ठोकलं

पदार्पणातील सामन्यात शतक लगावणं हे प्रत्येक खेळाडूचं स्वप्न असतं.

पहिले तीन खेळाडू आजारी, पदार्पणातील सामन्यात दहावा खेळाडू सलामीला उतरला, झंझावाती शतक ठोकलं
प्रातिनिधिक छायाचित्र
Follow us
| Updated on: Feb 13, 2021 | 1:36 PM

मुंबई : कसोटी क्रिकेटमध्ये (Test Cricket) आंतरराष्ट्रीय पातळीवर देशाचं प्रतिनिधित्व करणं प्रत्येक क्रिकेटपटूचं स्वप्न असतं. आपल्या पदार्पणातील सामन्यात नेहमी स्मरणात राहिल अशी कामगिरी करण्याची इच्छा खेळाडूची असते. पण असं स्वप्नवत पदार्पण प्रत्येकांच पूर्ण होतचं असं नाही. पण एका खेळाडूने आजपासून काही वर्षांपूर्वी अशी खेळी केली की ती तु्म्ही जाणून चकित व्हाल. (England Cricketer Billy Griffith scored century in debut match against west indies )

नक्की काय घडलं?

संघातील पहिले 3 महत्वाचे फलंदाज हे आजारी पडले. याच सामन्यातून एका खेळाडून कसोटी पदार्पण केलं. पहिले 3 फलंदाज अस्वस्थ असल्याने या पदार्पण केलेल्या खेळाडूला थेट 10 व्या क्रमांकावरुन सलामीला खेळण्याची संधी मिळाली. या पठठ्याने संधीचं सोनं केलं. पदार्पणात त्याने धमाकेदार शतक लगावलं. ही गोष्ट आहे इंग्लंडचे क्रिकेटपटू बिली ग्रिफिथ (England Cricketer Billy Griffith) यांची.

इंग्लंड विरुद्ध वेस्ट इंडिज यांच्यात 11 ते 16 फेब्रुवारी 1948 मध्ये हा कसोटी सामना खेळवण्यात आला होता. या सामन्याचं आयोजन पोर्ट ऑफ स्पेनमध्ये करण्यात आलं होतं या सामन्यात इंग्लंडचे पहिल्या 3 क्रमांकाचे फलंदाज (ओपनर ( 2) +वनडाऊन (1) = 3) अचानक आजारी पडले. त्यामुळे पदार्पण केलेल्या ग्रीफिथ यांना सलामीला पाठवण्याचा निर्णय टीम मॅनेजमेंट आणि कॅप्टननी घेतला. ठरलेल्या निर्णयानुसार ग्रीफिथ सलामीसाठी मैदानात आले. ग्रीफिथ यांना नाईलाज म्हणून सलामीला पाठवण्यात आले. त्यांच्याकडून टीमला मोठ्या खेळीची अपेक्षाही नव्हती. पण ग्रीफिथने जे केले, त्यानंतर क्रिकेट विश्वातून त्याचं कौतुक करण्यात आलं.

ग्रीफिथ तडाखेबंद खेळी करत दमदार शतक लगावलं. त्यांनी एकूण 140 धावांची खेळी केली. मात्र ते या सामन्यातील दुसऱ्या डावात अवघ्या 4 धावांवर बाद झाले.

क्रिकेट कारकिर्द

ग्रीफिथ यांनी आपल्या कसोटी कारकिर्दीत अवघ्या 3 सामन्यात इंग्लंडचं प्रतिनिधित्व केलं. यामध्य त्यांनी 31.40 च्या सरासरीने 157 धावा केल्या. यामध्ये त्यांनी एक शतक लगावलं. तसेच 5 कॅचेस घेण्याची कामगिरी त्यांनी केली. तसेच ग्रीफिथने 215 फर्स्ट क्लास सामन्यात 16.42 च्या एव्हरेजने 3 शतक आणि 15 अर्धशतकांसह 4 हजार 846 धावा केल्या. तसेच ग्रीफिथ यांनी 328 कॅच घेतल्या. तर विकेटकीपर म्हणून एकूण 80 कॅच घेण्याची कामगिरी केली.

संबंधित बातम्या :

India vs England 2nd Test, 1st Day Live | हिटमॅन रोहित शर्माचे शानदार शतक

India vs England 2nd Test | कॅप्टन कोहली आणि जो रुटला किर्तीमान करण्याची संधी, अश्विनही स्पर्धेत

India vs England 2nd Test | अक्षर पटेलचं कसोटी पदार्पण, फिरकीवर इंग्लंडला नाचवणार?

(England Cricketer Billy Griffith scored century in debut match against west indies )

Non Stop LIVE Update
मोठी कारवाई, नाकाबंदीत ATM कॅश व्हॅनमधील 4 कोटींची रोकड कुठं जप्त?
मोठी कारवाई, नाकाबंदीत ATM कॅश व्हॅनमधील 4 कोटींची रोकड कुठं जप्त?.
चंद्रकांत पाटलांच्या त्या वक्तव्याने अजितदादा नाराज, बोलून दाखवली खंत
चंद्रकांत पाटलांच्या त्या वक्तव्याने अजितदादा नाराज, बोलून दाखवली खंत.
आता ठाकरेंसमोर एवढाचं प्रश्न.. पवारांच्या मुलाखतीवर शिरसाटांचं वक्तव्य
आता ठाकरेंसमोर एवढाचं प्रश्न.. पवारांच्या मुलाखतीवर शिरसाटांचं वक्तव्य.
लोकसभेच्या निवडणुकीदरम्यान महाराष्ट्रात आणखी एका निवडणुकीचं वाजल बिगूल
लोकसभेच्या निवडणुकीदरम्यान महाराष्ट्रात आणखी एका निवडणुकीचं वाजल बिगूल.
पवारांचा पक्ष काँग्रेसमध्ये विलीन होणार? फडणवीसांनी थेट तारीख सांगितली
पवारांचा पक्ष काँग्रेसमध्ये विलीन होणार? फडणवीसांनी थेट तारीख सांगितली.
लोक कडाक्याच्या उन्हान हैराण अन भर उन्हाळ्यात पाण्यात बुडाल्या गाड्या?
लोक कडाक्याच्या उन्हान हैराण अन भर उन्हाळ्यात पाण्यात बुडाल्या गाड्या?.
अयोध्येत राऊत म्हणाले, आपण बंड करू; शिवसेना नेत्याच्या दाव्यानं खळबळ
अयोध्येत राऊत म्हणाले, आपण बंड करू; शिवसेना नेत्याच्या दाव्यानं खळबळ.
शिंदेंना शिवसेना संपवायची होती, 2013 मध्ये.. विचारेंचा मोठा गौप्यस्फोट
शिंदेंना शिवसेना संपवायची होती, 2013 मध्ये.. विचारेंचा मोठा गौप्यस्फोट.
शरद पवार गट काँग्रेसमध्ये विलीन होणार? एका मुलाखतीतून मोठा गौप्यस्फोट
शरद पवार गट काँग्रेसमध्ये विलीन होणार? एका मुलाखतीतून मोठा गौप्यस्फोट.
नॉट रिचेबल असणाऱ्या किरण सामंत यांच्याबद्दल नारायण राणे म्हणाले...
नॉट रिचेबल असणाऱ्या किरण सामंत यांच्याबद्दल नारायण राणे म्हणाले....