AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

ENG vs IND : लीड्समध्ये टीम इंडियासमोर इंग्लंडचं आव्हान, कोण करणार विजयी सुरुवात?

England vs India 1st Test Live Streaming : रोहित शर्मा आणि विराट कोहली या दोघांच्या निवृत्तीनंतर भारतीय क्रिकेट संघ कसोटी मालिका खेळण्यासाठी सज्ज आहे. टीम इंडिया इंग्लंड विरुद्ध 2 हात करणार आहे.

ENG vs IND : लीड्समध्ये टीम इंडियासमोर इंग्लंडचं आव्हान, कोण करणार विजयी सुरुवात?
ENG vs IND Test SeriesImage Credit source: News 9
| Updated on: Jun 19, 2025 | 3:22 PM
Share

शुबमन गिल याच्या नेतृत्वात टीम इंडिया इंग्लंड दौऱ्यासाठी सज्ज झाली आहे. भारतीय क्रिकेट संघ इंग्लंड दौऱ्यात 5 कसोटी सामने खेळणार आहे. या मालिकेतील सलामीचा सामना हा 20 जूनपासून लीड्समधील हेडिंग्ले येथे खेळवण्यात येणार आहे. रोहित शर्मा याच्या निवृत्तीनंतर शुबमन गिल या मालिकेतून कर्णधार म्हणून नव्या इनिंगला सुरुवात करणार आहे. तर बेन स्टोक्स याच्याकडे इंग्लंडच्या नेतृत्वाची धुरा आहे. दोन्ही संघाची ही डब्ल्यूटीसीच्या साखळीतील पहिलीच मालिका असणार आहे.

टीम इंडियाने विराट कोहली (2019-2021) आणि त्यानंतर रोहित शर्मा (2021-2023) या 2 कर्णधारांच्या नेतृत्वात सलग 2 वेळा वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशीप फायनलमध्ये धडक दिली होती. मात्र टीम इंडिया दोन्ही वेळेस वर्ल्ड चॅम्पियन होण्यात अपयशी ठरली. तर तिसऱ्या साखळीत टीम इंडिया फायनलमध्ये पोहचण्यात अपयशी ठरली. त्यामुळे आता चौथ्या साखळीची सुरुवात जोरदार करण्याचा प्रयत्न टीम इंडियाचा असणार आहे.

सामन्याला किती वाजता सुरुवात होणार?

इंग्लंड विरुद्ध इंडिया पहिल्या कसोटी सामन्याला भारतीय वेळेनुसार दुपारी 3 वाजून 30 मिनिटांनी सुरुवात होईल. तर 3 वाजता टॉस होईल. हा सामना टीव्हीवर सोनी स्पोर्ट्स नेटवर्कवरील चॅनेल्सवर पाहायला मिळेल. तर मोबाईलवर जिओहॉटस्टार एपवर लाईव्ह पाहायला मिळेल. हा सामना हेडिंग्ले लीड्समध्ये खेळवण्यात येणार आहे.

हेड टु हेड रेकॉर्ड्स

टीम इंडिया विरुद्ध इंग्लंड या दोन्ही संघात कसोटी क्रिकेटमध्ये आतापर्यंत 136 सामने खेळवण्यात आले आहेत. भारताला फक्त 35 सामन्यांमध्ये विजयी होता आलं आहे. तर 51 सामन्यांमध्ये पराभूत व्हावं लागलंय. तर 50 सामने अनिर्णित राहिले आहेत. भारताची इंग्लंडमधील आकडेवारी ही चिंताजनक आहे. टीम इंडियाने इंग्लंडमध्ये एकूण 67 सामने खेळले आहेत. टीम इंडियाला त्यापैकी फक्त 9 सामनेच जिंकता आले आहेत. तर तब्बल 36 सामन्यांमध्ये पराभूत व्हावं लागलं. तर टीम इंडिया 22 सामने बरोबरीत सोडवण्यात यशस्वी ठरली आहे.

टीम इंडियाची हेडिंग्लेमधील कामगिरी

दरम्यान टीम इंडियाने हेडिंग्लेमधील या मैदानात 1952 साली पहिला सामना खेळला होता. टीम इंडियाला तेव्हा 7 विकेट्सने पराभूत व्हावं लागलं होतं. तेव्हापासून टीम इंडियाने हेडिंग्ले येथे 7 सामने खेळले आहेत. भारताला 7 पैकी फक्त 2 सामन्यांमध्येच विजयी होता आलंय. उभयसंघातील 1 सामना हा अनिर्णित राहिला. तर इंग्लंडने 4 सामन्यांमध्ये टीम इंडियावर विजय मिळवला आहे.

भाजपच्या धोरणांवर वर्षा गायकवाड यांचा हल्लाबोल
भाजपच्या धोरणांवर वर्षा गायकवाड यांचा हल्लाबोल.
दमानियांचा सुषमा अंधारे यांना पाठिंबा; शिंदेंच्या राजीनाम्याची मागणी
दमानियांचा सुषमा अंधारे यांना पाठिंबा; शिंदेंच्या राजीनाम्याची मागणी.
सनसनाटी निर्माण करण्याचा केविलवाणा प्रयत्न! शंभूराज देसाईंचा टोला
सनसनाटी निर्माण करण्याचा केविलवाणा प्रयत्न! शंभूराज देसाईंचा टोला.
त्यांच्यासोबत जाणं परवडणारं नाही! मलिकांबाबत शिरसाट यांचं मोठं विधान
त्यांच्यासोबत जाणं परवडणारं नाही! मलिकांबाबत शिरसाट यांचं मोठं विधान.
सुप्रिया सुळेंकडून मुख्यमंत्र्यांचे तोंडभरून कौतुक! म्हणाल्या...
सुप्रिया सुळेंकडून मुख्यमंत्र्यांचे तोंडभरून कौतुक! म्हणाल्या....
नाना पटोलेंचा भाजपवर सत्तेतून आमदार विकत घेतल्याचा आरोप
नाना पटोलेंचा भाजपवर सत्तेतून आमदार विकत घेतल्याचा आरोप.
हिंगोलीत कॉंग्रेसला खिंडार! प्रज्ञा सातव यांचा भाजपात प्रवेश
हिंगोलीत कॉंग्रेसला खिंडार! प्रज्ञा सातव यांचा भाजपात प्रवेश.
नागपूर सत्र न्यायालयाला बॉम्बने उडवून देण्याची धमकी!
नागपूर सत्र न्यायालयाला बॉम्बने उडवून देण्याची धमकी!.
ठाकरे बंधू भाजपचा पराभव करणार! संजय राऊतांचा मोठा दावा
ठाकरे बंधू भाजपचा पराभव करणार! संजय राऊतांचा मोठा दावा.
दोन मंत्री गेले, हा काळिमा! राऊतांचा सरकारवर गंभीर आरोप
दोन मंत्री गेले, हा काळिमा! राऊतांचा सरकारवर गंभीर आरोप.