Sourav Ganguly : राजकीय मैदानात ‘दादा’गिरी; सौरव गांगुलीचा तो मोठा खुलासा, 2026 मधील निवडणुकीविषयी काय दावा
Sourav Ganguly : सौरव गांगुली राजकारणात येणार असल्याच्या चर्चा रंगल्या आहेत. आता राजकीय मैदानात सुद्धा दादागिरी चालेल का अशी चर्चा होत आहे. त्यावर आता खुद्द दादानेच प्रतिक्रिया दिली आहे. काय म्हणाला सौरव गांगुली?

पश्चिम बंगालमध्ये पुढील वर्षी विधानसभा निवडणूक होत आहे. या निवडणुकीत अनेक दिग्गज उतरण्याची शक्यता आहे. भाजपाविरुद्ध तृणमूल काँग्रेस अशी थेट लढत होईल. त्यातच सौरव गांगुली राजकारणात येणार असल्याच्या चर्चा रंगल्या आहेत. आता राजकीय मैदानात सुद्धा दादागिरी चालेल का अशी चर्चा होत आहे. त्यावर आता खुद्द दादानेच प्रतिक्रिया दिली आहे. काय म्हणाला सौरव गांगुली?
पश्चिम बंगालमध्ये पुढील वर्षी विधानसभा निवडणूक होणार आहे. अनेक दिग्गज या विधानसभा निवडणुकीत नशीब आजमावण्याच्या तयारीत आहेत. भाजप आणि तृणमूल काँग्रेसमध्ये काँटे की टक्कर असेल. यापूर्वी भारतीय क्रिकेट संघाचा माजी कर्णधार सौरव गांगुली यांनी राजकारणात येणार का याविषयी मतं मांडले आहे. भारतीय क्रिकेट संघाचा कोच होण्यात अडचण नसल्याचे त्याने सांगितले. टीम इंडियाचा कोच होण्याची इच्छा त्याने लपवून ठेवली नाही.
राजकारणात दादागिरी?
सौरव गांगुली येत्या विधानसभेत मैदानात उतरू शकतो, असा दावा करण्यात येत होता. पण गांगुलीने हा दावा फेटाळला. राजकारणात येणार नसल्याचे सौरव गांगुलीने स्पष्ट केले. गांगुलीने 2018-19 आणि 2022-24 दरम्यान दिल्ली कॅपिटल्स या संघाचा निदेशक होता. त्याने एका मुलाखतीदरम्यान भारतीय संघाचा कोच होण्याची इच्छा नाकारली नाही. येणाऱ्या काळात बघू काय होते असा गांगुली म्हणाला. मी सध्या विविध भूमिकेतून जात असल्याचा तो म्हणाला.
जुलै महिन्यात सौरव गांगुली हा 53 वर्षांचा होईल. 2013 मध्ये आपण क्रिकेट खेळणे बंद केले. बीसीसीआयचा अध्यक्ष झालो. आता कोच होणार का या प्रश्नावर त्याने थेट उत्तर देणे टाळले. आपण सध्या 53 वर्षांचे आहोत, पाहूयात पुढे काय होते. माझी कोच होण्यास काहीच हरकत नसल्याचे त्याने म्हटले.
गौतमचं काम चांगले
गांगुलीने सध्याचा कोच गौतम गंभीर याचे कौतुक केले. दुबईत चॅम्पियन्स ट्रॉफीनंतर त्याने चांगली पकड निर्माण केली आहे. गंभीरमध्ये क्रिकेटविषयी उत्साह आहे. तो एक कुशल रणनीतीकार आहे. क्रिकेट हा त्याच्या आवडीचा विषय आहे आणि तो एकदम चांगला खेळाडू असल्याचे तो म्हणाला.
