AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

‘आपण त्याच्या हेतूबद्दल बोलतोय, पण…’, विराटच्या आक्रमक फलंदाजीवर गावस्कर म्हणाले…

वेस्ट इंडिज विरुद्ध विराट कोहलीने (Virat kohli) केलेल्या आक्रमक फलंदाजीवर माजी कर्णधार सुनील गावस्कर यांनी आपलं मत व्यक्त केलं आहे. काल विडिंज विरुद्धच्या (India vs West indies) दुसऱ्या टी 20 सामन्यात विराटने 41 चेंडूत 52 धावांची अर्धशतकी खेळी केली.

'आपण त्याच्या हेतूबद्दल बोलतोय, पण...', विराटच्या आक्रमक फलंदाजीवर गावस्कर म्हणाले...
| Updated on: Feb 19, 2022 | 3:29 PM
Share

कोलकाता: वेस्ट इंडिज विरुद्ध विराट कोहलीने (Virat kohli) केलेल्या आक्रमक फलंदाजीवर माजी कर्णधार सुनील गावस्कर यांनी आपलं मत व्यक्त केलं आहे. काल विडिंज विरुद्धच्या (India vs West indies) दुसऱ्या टी 20 सामन्यात विराटने 41 चेंडूत 52 धावांची अर्धशतकी खेळी केली. विराटच्या या आक्रमक फलंदाजीने अनेकांना प्रभावित केलं आहे. प्रसिद्ध क्रिकेटपटू सुनील गावस्करही (Sunil Gavaskar) याला अपवाद नाहीत. विराटने मैदानावर आल्यापासून गोलंदाजांवर हल्लाबोल केला. त्याने गोलंदाजांना कुठेही वरचढ होऊ दिले नाही. इशान किशन लवकर बाद झाल्यामुळे विराट कोहलीला पावरप्लेची काही षटक मिळाली. विराटने यामध्ये पाच चौकार लगावले. विराटने आधी कॅप्टन रोहित शर्मा आणि त्यानंतर ऋषभ पंत सोबत मिळून भारताच्या डावाला आकार दिला.

विराटने काल टी-20 मधलं 30 वं अर्धशतक झळकावलं. “विराटच्या कालच्या फलंदाजीमध्ये एक वेगळा दृष्टीकोन दिसला. विराटच्या बॅटमधून निघाणारे फटके पाहून डोळ्यांना खूप बरं वाटलं. त्याच्या फलंदाजीत वेगळा उद्देश दिसत होता” असं गावस्कर म्हणाले.

जमिनीलगतचे फटके खेळताना दिसला

“विराट ‘व्ही’ शेप मध्ये जमिनीलगतचे फटके खेळताना जास्त दिसतो. त्यामुळे कट सारखे नाजूक फटके सहसा पहायला मिळत नाहीत. काल विराटने कट सारखे काही हवाई फटके मारले. त्याच्या फलंदाजीमध्ये एक वेगळा उद्देश दिसत होता” असे गावस्कर म्हणाले. “आपण त्याच्या हेतूबद्दल बोलतोय. पण इशान किशनचा विकेट गेला, म्हणून त्याने गोलंदाजाला वरचढ होऊ दिलं नाही. तो उद्देश त्याच्या फलंदाजीत दिसत होता” असे गावस्कर म्हणाले.

कोहलीमुळे रोहितवर दबाव जाणवला नाही

एकेरी-दुहेरी धावा पळून निर्धाव चेंडू कमी करण्याच्या कोहलीच्या रणनितीचेही गावस्करांनी कौतुक केलं. कोहलीमुळे दबाव जाणवला नाही, असं रोहित स्वत: म्हणाला. “रोहित आज बॅटिंग करताना त्याच्या नेहमीच्या शैलीत दिसत नव्हता. त्यामुळे एकाने दुसऱ्याचा दबाव कमी केला पाहिजे” असं गावस्कर म्हणाले. कोहलीच्या 52 धावा आणि वेंकटेश अय्यर-ऋषभ पंतमध्ये झालेल्या 75 धावांच्या भागीदारीमुळे भारताची धावसंख्या 186 पर्यंत पोहोचली.

Gavaskar gives verdict on Virat Kohli’s aggressive batting in 2nd T20I vs WI

Follow Us
पावसाने पाठ फिरवली, सोयाबीन करपले; बीडमध्ये शेतकरी संकटात
पावसाने पाठ फिरवली, सोयाबीन करपले; बीडमध्ये शेतकरी संकटात
हात जोडून सांगते आता अजित पवारांच्या अपघाताबाबत बोलणार नाही; सुप्रिया
हात जोडून सांगते आता अजित पवारांच्या अपघाताबाबत बोलणार नाही; सुप्रिया सुळे असं का म्हणाल्या?
विनोद तावडे यांचे भेटीगाठींचे सत्र सुरुच; प्रभारी म्हणून नियुक्ती...
विनोद तावडे यांचे भेटीगाठींचे सत्र सुरुच; प्रभारी म्हणून नियुक्ती होताच उत्तर प्रदेशमध्ये....
दिल्ली सत्यनिकेतनमध्ये पाच मजली इमारत अचानक कोसळली, अनेकजण अडकल्याची..
दिल्ली अचानक कोसळली मोठी इमारत; अनेकजण अडकल्याची भीती, काय घडलं?
संजय शिरसाट यांना दहीहंडी उत्सवादरम्यान अचानकच मराठा आंदोलकांचा सवाल,
संजय शिरसाट यांना दहीहंडी उत्सवादरम्यान अचानकच मराठा आंदोलकांचा सवाल, काय घडलं?
शिंदे गटातील नेत्यावर गंभीर आरोप; आक्षेपार्ह शिवगाळ प्रकरणी थेट...
शिंदे गटातील नेत्यावर गंभीर आरोप; आक्षेपार्ह शिवगाळ प्रकरणी थेट... अडचणी वाढणार?
महाराष्ट्रातील 2 कोटी मतदारांची नावे गाळली? राजू पाटलांच्या दाव्याने..
महाराष्ट्रातील 2 कोटी मतदारांची नावे गाळली? राजू पाटलांच्या दाव्याने खळबळ
गरबा खेळण्यासाठी मुस्लिमांना प्रवेश नाही, हिंदूंनाही टिळा लावणं आवश्यक
Vishva Hindu Parishad | गरबा खेळण्यासाठी मुस्लिमांना प्रवेश नाही, हिंदूंनाही टिळा लावणं आवश्यक; आणखी नियम कोणते?
हिंजवडीतील आयटी कर्मचाऱ्यांच्या मोर्चात आदित्य ठाकरे सहभागी, पायाभूत..
हिंजवडीतील आयटी कर्मचाऱ्यांच्या मोर्चात आदित्य ठाकरे सहभागी, पायाभूत सुविधांसाठी मागणी
मीनाताईंच्या स्मृतीस्थळी ठाकरे कुटुंबीय; उद्धव-रश्मी ठाकरेंनी...
मीनाताईंच्या स्मृतीस्थळी ठाकरे कुटुंबीय; उद्धव-रश्मी ठाकरेंनी वाहिली आदरांजली