GT vs LSG IPL 2022: आज गुजरातच्या गोलंदाजांची परीक्षा, विजयासाठी लखनौला सोपं टार्गेट

हार्दिक पंड्या, राहुल तेवतिया आणि डेविड मिलर हे गुजरातचे तीन प्रमुख आधारस्तंभ आहेत. या तिघांनीच अटी-तटीच्या सामन्यात गुजरातला विजय मिळवून दिला आहे.

GT vs LSG IPL 2022: आज गुजरातच्या गोलंदाजांची परीक्षा, विजयासाठी लखनौला सोपं टार्गेट
Abhinav Manohar - Hardik Pandya
Image Credit source: IPL
दीनानाथ मधुकर परब, टीव्ही 9 मराठी डिजीटल

|

May 10, 2022 | 9:28 PM

मुंबई: सध्या जबरदस्त फॉर्ममध्ये असलेल्या गुजरात टायटन्सच्या संघाला लखनौ सुपर जायंट्सच्या (GT vs LSG) गोलंदाजांनी 144 धावांवर रोखलं. गुजरातचे फक्त चार विकेट गेले. शुमभन गिलचं अर्धशतक आणि राहुल तेवतियाने अखेरीस केलेल्या फलंदाजीच्या बळावर गुजरातला 144 पर्यंत पोहोचता आला. सलामीवीर शुभमन गिलने (Shubhaman Gill) 49 चेंडूत नाबाद 63 धावा केल्या. यात सात चौकार होते. तेवतियाने 16 चेंडूत चार चौकारांसह 22 धावा केल्या. लखनौच्या गोलंदाजांनी आज सुपर कामगिरी केली. खासकरुन आवेश (Avesh Khan) आणि मोहसीन खानने भेदक मारा केला. आवेश खानने मॅथ्यू वेड आणि हार्दिक पंड्या हे दोन महत्त्वाचे विकेटस मिळवले. डेविड मिलरने 24 चेंडूत 26 धावा केल्या. यात फक्त एक चौकार आणि एक षटकार होता.

तीन आधारस्तंभच फेल

हार्दिक पंड्या, राहुल तेवतिया आणि डेविड मिलर हे गुजरातचे तीन प्रमुख आधारस्तंभ आहेत. या तिघांनीच अटी-तटीच्या सामन्यात गुजरातला विजय मिळवून दिला आहे. पण आज हे तिघेही चमक दाखवू शकले नाहीत. वेगाने धावा करण्याची गरज असताना गुजरात टायटन्सच्या फलंदाजीत ती धारच दिसली नाही.

प्लेऑफमध्ये पहिलं कोण पोहोचणार?

IPL 2022 च्या प्लेऑफमध्ये कुठला संघ दाखल होणार, त्याचा निर्णय आज होणार आहे. पुण्याच्या महाराष्ट्र क्रिकेट असोशिएशनच्या स्टेडियमवर लखनौ सुपर जायंट्स आणि गुजरात टायटन्समध्ये सामना होत आहे. पॉइंटस टेबलमध्ये लखनौ पहिल्या, तर गुजरात दुसऱ्या स्थानावर आहे. दोन्ही संघांचे समान 16 पॉइंटस आहेत. या सामन्यात गुजरातचा कॅप्टन हार्दिक पंड्याने टॉस जिंकून प्रथम फलंदाजी करण्याचा निर्णय घेतला आहे. आयपीएलमधला आजचा 57 वा सामना आहे. लखनौ आणि गुजरात या दोन्ही टीम्सनी यंदा आयपीएलमध्ये डेब्यु केलाय. आज जो संघ जिंकेल, तो प्लेऑफमध्ये सर्वप्रथम दाखल होईल. आजच्या लढतीआधी दोन्ही टीम्सनी संघात बदल केले आहेत.

Follow us on

Related Stories

Most Read Stories

Click on your DTH Provider to Add TV9 MARATHI

राज्य चुनें