गुजरात टायटन्सने या स्टार खेळाडूंना ठेवलं कायम, आता खिशात एवढे पैसे शिल्लक
आयपीएल 2026 स्पर्धेपूर्वी गुजरात टायटन्सनेही फासे टाकले आहेत. मिनी लिलावापूर्वी गुजरात टायटन्स रिटेन केलेल्या खेळाडूंची यादी जाहीर केली आहे. त्यामुळे मिनी लिलावात नवे खेळाडू घेण्यासाठी किती पैसे शिल्लक आहेत ते जाणून घेऊयात.

आयपीएल 2026 स्पर्धेपूर्वी फ्रेंचायझींनी रिटेन केलेल्या खेळाडूंची यादी जाहीर केली आहे. यात शुबमन गिल कर्णधारपद भूषवत असलेल्या गुजरात टायटन्सकडे लक्ष लागून होतं. कारण मुंबई इंडियन्सने ट्रेड करत गुजरातच्या अष्टपैलू शेरफेन रदरफोर्डला घेतलं. त्यामुळे आता कोणत्या खेळाडूंना रिलीज करणार याकडे लक्ष लागून होतं. अखेर यावरचा पडदा दूर झाला आहे. फ्रँचायझीने शुभमन गिल, रशीद खान, साई सुदर्शन आणि जोस बटलर सारख्या मॅचविनर्सवर अवलंबून राहिलं आहे. गोलंदाजीत त्यांनी कागिसो रबाडा आणि प्रसिद्ध कृष्णावर अवलंबून राहिलं आहे. मधल्या फळीत राहुल तेवतिया आणि ग्लेन फिलिप्ससारखे शक्तिशाली अष्टपैलू खेळाडू आहेत. तर महिपाल लोमरोर, करीम जनत, दासुन शनाका, गेराल्ड कोएत्झी आणि कुलवंत खेजरोलिया यांनाही रिलीज करण्याचा निर्णय घेतला आहे.
गुजरात टायटन्सने या खेळाडूंना रिलीज केल्यानंतर आता मिनी लिलावासाठी पर्समध्ये 12.9 कोटी शिल्लक आहेत. आता रकमेत आवश्यक असलेल्या खेळाडूसाठी बोली लावावी लागणार आहे. इतर फ्रेंचायझींच्या तुलनेत ही रक्कम कमी आहे. त्यामुळे फार मोठी बोली लावणार नाही हे स्पष्ट आहे. एखादा खेळाडू स्वस्तात मिळत असेल तर गुजरात टायटन्स नक्कीच फासे टाकेल. केकेआरने वेंकटेश अय्यरला रिलीज केलं आहे. आता त्याला इतर फ्रेंचायझी कसा भाव देतात यावर गुजरातची बोली ठरणार आहे.
मागच्या पर्वात गुजरात टायटन्सने प्लेऑफमध्ये एन्ट्री मारली होती. लीग स्पर्धेत 14 पैकी 9 सामने जिंकले होते. तसेच एलिमिनेटर सामन्यात मुंबईने 20 धावांनी पराभूत केलं होते. दरम्यान, गुजरातने 2022 मध्ये पहिल्याच फटक्यात जेतेपद मिळवलं होतं. त्यानंतर 2023 मध्ये अंतिम फेरी गाठली होती. यंदाही शुबमन गिलच्या नेतृत्वात तशाच कामगिरीची अपेक्षा आहे.
कायम ठेवलेले खेळाडू: शुबमन गिल (कर्णधार), रशीद खान, साई सुदर्शन, राहुल तेवतिया, शाहरुख खान, कागिसो रबाडा, जोस बटलर, मोहम्मद सिराज, प्रसीध कृष्णा, निशांत सिंधू, कुमार कुशाग्रा, अनुज रावत, मानव सुथार, वॉशिंग्टन सुंदर, अरशद शर्मा, गुरशांत शर्मा, कुमार शर्मा, कुमार शर्मा, कुमार शर्मा यादव, ग्लेन फिलिप्स
