GT vs LSG, Shubman Gill: अविश्वसनीय! शुभमनची ही कॅच पाहून तुम्हाला 1983 वर्ल्ड कपमधील कपिलच्या कॅचची आठवण येईल, पहा VIDEO

GT vs LSG, Shubman Gill: मुंबईच्या वानखेडे स्टेडियमवर लखनौ सुपर जायंट्स आणि गुजरात टायटन्समध्ये (LSG vs GT) सामना सुरु आहे. केएल राहुल (KL Rahul) लखनौ तर हार्दिक पंड्या गुजरातचं नेतृत्व करतोय.

GT vs LSG, Shubman Gill: अविश्वसनीय! शुभमनची ही कॅच पाहून तुम्हाला 1983 वर्ल्ड कपमधील कपिलच्या कॅचची आठवण येईल, पहा VIDEO
शुभमन गिलची ऑरेंज कॅपमध्ये आगेकूचImage Credit source: twitter
Follow us
| Updated on: Mar 28, 2022 | 9:05 PM

मुंबई: मुंबईच्या वानखेडे स्टेडियमवर लखनौ सुपर जायंट्स आणि गुजरात टायटन्समध्ये (LSG vs GT) सामना सुरु आहे. केएल राहुल (KL Rahul) लखनौ तर हार्दिक पंड्या गुजरातचं नेतृत्व करतोय. गुजरातच्या तुलनेत लखनौचा संघ सरस समजला जात होता. पण हार्दिक पंड्याच्या (Hardik Pandya) गुजरात टायटन्सने लखनौ संघाला जोरदार झटके दिले आहेत. त्यामुळे लखनौचा संघ बॅकफूटवर आहे. मोहम्मद शमीच्या भेदक गोलंदाजीसमोर लखनौची टॉप ऑर्डर कोसळली. मोहम्मद शमीने केएल राहुल, क्विंटन डिकॉक आणि मनीष पांडे या तीन विकेट आतापर्यंत काढल्या आहेत. लखनौ सुपर जायंट्सचा कॅप्टन केएल राहुलला तर मोहम्मद शमीने पहिल्याच चेंडूवर विकेटकीपर करवी झेलबाद केले. राहुलने डिफेंस करण्याचा प्रयत्न केला. पण चेंडू बॅटची कड घेऊन विकेटकिपरच्या ग्लोव्हजमध्ये विसावला.

पांडेचा ऑफ स्टंम्प उडवला

या मोठ्या विकेटसाठी हार्दिक पंड्याला DRS चा आधार घ्यावा लागला. त्यानंतर दुसरा सलामीवीर क्विंटन डी कॉक ची दांडी गुल केली. त्याने फक्त सात धावा केल्या. त्यानंतर शमीने एका अप्रतिम चेंडूवर मनीष पांडेचा ऑफ स्टंम्प उडवला.

चेंडू बॅटच्या टॉप एजला लागला

या सामन्यात अप्रतिम क्षेत्ररक्षणही पहायला मिळाले. गुजरात टायटन्सकडून खेळणाऱ्या शुभमन गिलने अप्रतिम फिल्डिंग केली. वरुण एरॉनच्या गोलंदाजीवर शुभमन गिलने एव्हिन लुइसचा जो झेल घेतला, त्याला तोड नाहीय. वरुण एरॉनच्या चौथ्या षटकाच्या तिसऱ्या चेंडूवर हा झेल पहायला मिळाला. लुइसने पुलचा मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न केला. पण चेंडू बॅटच्या टॉप एजला लागला.

उलटा 25 यार्ड पळाला

शुभमन गिल झेल घेण्यासाठी मिडविकेटच्या दिशेने उलटा पळाला. त्याने 25 यार्ड पर्यंत पळत जाऊन डाइव्ह मारुन एक सुंदर झेल घेतला. शुभमन गिलने घेतलेल्या या कॅचने 1983 च्या वर्ल्ड कप मध्ये कपिल देव यांनी घेतलेल्या त्या ऐतिहासिक कॅचची आठवण करुन दिली. खरंतर शुभमन गिलने ही कॅच बनवली. त्यामुळे वरुण एरॉनच्या खात्यात एक विकेट जमा झाली. शुभमनने शेवटपर्यंत चेंडूवरुन नजर हटवली नाही. फिल्डिंगप्रमाणे शुभमन गिलकडून फलंदाजीतही अशाच अपेक्षा आहेत. कोलकाता नाइट रायडर्सच्या या प्रतिभावान युवा खेळाडूला गुजरात टायटन्सने ड्राफ्ट प्लेयर म्हणून विकत घेतलं होतं.

Non Stop LIVE Update
वसंत मोरे वंचितच्या तिकिटावर लोकसभा निवडणूक लढणार?
वसंत मोरे वंचितच्या तिकिटावर लोकसभा निवडणूक लढणार?.
'अजित पवार गट फ्रॉड 420 गँग, फार काळ सत्तेत...', कुणाची खोचक टीका?
'अजित पवार गट फ्रॉड 420 गँग, फार काळ सत्तेत...', कुणाची खोचक टीका?.
आता नाही तर कधी ? हातकणंगलेतून लढण्याचा राहुल आवाडे यांचा निर्धार
आता नाही तर कधी ? हातकणंगलेतून लढण्याचा राहुल आवाडे यांचा निर्धार.
मराठा समाजाच्या बैठकीत हाणामारी, लाथा-बुक्क्यांनी मारहाण; बघा व्हिडीओ
मराठा समाजाच्या बैठकीत हाणामारी, लाथा-बुक्क्यांनी मारहाण; बघा व्हिडीओ.
हातकणंगलेत धैर्यशील माने यांची वाट बिकट, भाजपा कार्यकर्त्यांची नाराजी
हातकणंगलेत धैर्यशील माने यांची वाट बिकट, भाजपा कार्यकर्त्यांची नाराजी.
काँग्रेस पक्षाला आयकरकडून नवी नोटीस, इतक्या कोटींचा ठोठावला दंड
काँग्रेस पक्षाला आयकरकडून नवी नोटीस, इतक्या कोटींचा ठोठावला दंड.
तर युतीतून बाहेर पडू पण उमेदवार मागे नाही, बच्चू कडू यांचा थेट इशारा
तर युतीतून बाहेर पडू पण उमेदवार मागे नाही, बच्चू कडू यांचा थेट इशारा.
हर्षवर्धन यांची नाराजी दूर होणार का? फडणवीसांच्या सागर बंगल्यावर बैठक
हर्षवर्धन यांची नाराजी दूर होणार का? फडणवीसांच्या सागर बंगल्यावर बैठक.
गैरव्यवहाराच्या आरोपात अजितदादांनंतर प्रफुल्ल पटेलांनाही दिलासा
गैरव्यवहाराच्या आरोपात अजितदादांनंतर प्रफुल्ल पटेलांनाही दिलासा.
महायुतीत जागा वाटपावरून तिढा कायम, कुठं अंतर्गत रस्सीखेच तर पेच कायम?
महायुतीत जागा वाटपावरून तिढा कायम, कुठं अंतर्गत रस्सीखेच तर पेच कायम?.