AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

भारतीय क्रिकेटपटूचा यूटर्न! बोर्डाकडून मागितली होती ‘एनओसी’, आता पुन्हा तिथेच परतण्याचा निर्णय

भारतीय संघाकडून खेळलेल्या क्रिकेटपटूने रणजी ट्रॉफी दरम्यान क्रिकेट बोर्डाविरुद्ध बंड पुकारलं होतं. इतकंच काय तर आंध्र प्रदेशसाठी पुन्हा न खेळण्याचा निर्णय घेतला होता. मात्र आता यूटर्न आंध्र प्रदेशसाठी खेळणार असल्याचं सांगितलं.हनुमा विहारीने याबाबतची माहिती सोशल मीडियावर दिली आहे.

भारतीय क्रिकेटपटूचा यूटर्न! बोर्डाकडून मागितली होती 'एनओसी', आता पुन्हा तिथेच परतण्याचा निर्णय
| Updated on: Jun 25, 2024 | 8:37 PM
Share

भारतीय क्रिकेट संघात खेळलेल्या हनुमा विहारीने आंध्र क्रिकेट संघावर गंभीर आरोप केले होते. इतकंच काय तर स्पर्धेदरम्यान कर्णधारपदही सोडलं होतं. तसेच आंध्र प्रदेशसाठी पुन्हा खेळणार नसल्याचं सांगितलं होतं. मध्य प्रदेशने आंध्र प्रदेशला 4 धावांनी पराभूत केल्यानंतर हनुमा विहारीने आपलं मत जाहीरपणे मांडलं होतं. यावेळी त्याने एका खेळाडूवर ओरडल्याने माझ्यावर कारवाई करण्यात आल्याचा आरोप केला होता. या खेळाडूवर राजकीय वरदहस्त असल्याचंही त्याने सांगितलं होतं. यासाठी कर्णधारपद सोडण्याचा दबाव होता आणि ते सोडावं लागलं असंह त्याने जाहीरपणे सांगितलं होतं. पण आता हनुमा विहारीने युटर्न घेतला असून पुन्हा एकदा आंध्र प्रदेशसाठी खेळणार असल्याचं स्पष्ट केलं आहे. हनुमा विहारीने मंगळवारी सोशल मिडिया एक्सवर याबाबतची माहिती दिली आहे. इतकंच काय तर टीडीपी नेते नारा लोकेश यांच्यासोबतचा एक फोटोही शेअर केला आहे. हनुमा विहारीने कर्णधारपद सोडलं तेव्हा राज्यात वायएसआर काँग्रेसचं सरकार होतं. मात्र आता सरकार बदललं असून टीडीपीची सत्ता आली आहे.

“पाठिंबा दिल्याबद्दल धन्यवाद सर. मी आंध्र प्रदेशला पुढे घेऊन जाण्यास सज्ज आहे. मला खात्री आहे की, आंध्र क्रिकेटचं भविष्य सुरक्षित आहे.”, अशी पोस्ट हनुमा विहारीने सोशल मीडियावर लिहिली आहे. हनुमा विहारीने आंध्र क्रिकेटला रामराम ठोकून एनओसीही घेतली होती. इतकंच काय तर एनओसी देण्यास दिरंगाई केल्याचा आरोपही केला होता. हनुमा विहारीने मध्य प्रदेशकडून खेळण्याची तयारी केली होती. पण आता या बाबींवर पडदा पडला असून हनुमा विहारी आंध्र प्रदेशकडूनच खेळणार आहे.

हनुमा विहारी भारतीय संघासाठी 16 कसोटी सामने खेळला आहे. यात त्याने 33.56 च्या सरासरीने 839 धावा केल्या आहेत. यात एक शतक आणि 5 अर्धशतकं ठोकली आहे. विहारीने आपला शेवटचा कसोटी सामना इंग्लंडविरुद्ध बर्मिंघममध्ये 2022 मध्ये खेळला होता. हनुमा विहारीची ऑस्ट्रेलियाविरुद्धची खेळी कायम स्मरणात राहणारी आहे. या कसोटीत विहारीने चांगली खेळी केली होती आणि गाबा टेस्ट जिंकून मालिका आपल्या नावावर केली होती.

फडणवीस सरकारच 1 वर्ष, मुख्यमंत्र्यांना किती मार्क? काय सांगतो सर्व्हे?
फडणवीस सरकारच 1 वर्ष, मुख्यमंत्र्यांना किती मार्क? काय सांगतो सर्व्हे?.
फोडाफोडीन नाराजी, वाक् युद्धानंतर आज शिंदे-रवींद्र चव्हाण एकाच मंचावर?
फोडाफोडीन नाराजी, वाक् युद्धानंतर आज शिंदे-रवींद्र चव्हाण एकाच मंचावर?.
फडणवीसांच्या इशाऱ्याने इतर पक्ष चालतात, कुणाच्या वक्तव्याची होते चर्चा
फडणवीसांच्या इशाऱ्याने इतर पक्ष चालतात, कुणाच्या वक्तव्याची होते चर्चा.
CM सह शिंदे दादांची महत्त्वाची बैठक; पक्षांतर्गत प्रवेशबंदीवर तोडगा?
CM सह शिंदे दादांची महत्त्वाची बैठक; पक्षांतर्गत प्रवेशबंदीवर तोडगा?.
इंडिगोच्या विस्कळीत सेवेविरोधात प्रवाशांना मनस्ताप, थेट कोर्टात याचिका
इंडिगोच्या विस्कळीत सेवेविरोधात प्रवाशांना मनस्ताप, थेट कोर्टात याचिका.
रूपाली ठोंबरेंकडून बाळासाहेब अन् पवारांसोबत फोटो शेअर, चर्चांना उधाण
रूपाली ठोंबरेंकडून बाळासाहेब अन् पवारांसोबत फोटो शेअर, चर्चांना उधाण.
मुंबईत भाजपच्या महापौरामुळं कॉलर टाईट होणार! लोढांचं मोठं वक्तव्य काय?
मुंबईत भाजपच्या महापौरामुळं कॉलर टाईट होणार! लोढांचं मोठं वक्तव्य काय?.
चैत्यभूमीवर जनसागर... बाबासाहेबांच्या महापरिनिर्वाण दिनी मोठी गर्दी
चैत्यभूमीवर जनसागर... बाबासाहेबांच्या महापरिनिर्वाण दिनी मोठी गर्दी.
डॉ. आंबेडकरांना राज्यपाल, मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्र्यांकडून आदरांजली
डॉ. आंबेडकरांना राज्यपाल, मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्र्यांकडून आदरांजली.
बहरीनमध्ये जय पवार यांची हळदी, बघा दिमाखदार सोहळ्याचे फोटो
बहरीनमध्ये जय पवार यांची हळदी, बघा दिमाखदार सोहळ्याचे फोटो.