AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

INDW vs AUSW : विजय मिळवल्यानंतर कर्णधार हरमनप्रीत कौर स्पष्टच म्हणाली….

भारत आणि ऑस्ट्रेलिया महिला संघात तीन सामन्यांची वनडे मालिका सुरु आहे. या मालिकेतील पहिल्या सामन्यात पराभवाचं तोंड पाहावं लागलं होतं. मात्र दुसर्‍या सामन्यात टीम इंडियाने कमबॅक केलं आहे. या विजयानंतर कर्णधार हरमनप्रीत कौरने मनोगत व्यक्त केलं आहे.

INDW vs AUSW : विजय मिळवल्यानंतर कर्णधार हरमनप्रीत कौर स्पष्टच म्हणाली....
INDW vs AUSW : विजय मिळवल्यानंतर कर्णधार हरमनप्रीत कौर म्हणाली की, 'गोष्टी गुंतागुतीच्या...'Image Credit source: PTI
| Updated on: Sep 17, 2025 | 10:45 PM
Share

भारताने तीन सामन्यांच्या वनडे मालिकेत कमबॅक केलं. दुसऱ्या सामन्यात ऑस्ट्रेलियाचा 102 धावांनी पराभव करून 1-1 अशी बरोबरी साधली आहे. वनडे वर्ल्डकप 2025 स्पर्धेच्या दृष्टीने या मालिकेकडे रंगीत तालीम म्हणून पाहीलं जात आहे. पहिल्या सामन्यात ऑस्ट्रेलियाने भारताचा दारूण पराभव केला होता. त्यामुळे तयारीवर प्रश्नचिन्ह उपस्थित केलं जात होतं. मात्र दुसऱ्या सामन्यात टीम इंडियाने कमबॅक केलं आहे. या सामन्यातही स्मृती मंधानाने चमकदार कामगिरी केली. तिच्या शतकी खेळीमुळे मोठी धावसंख्या उभारण्यास मदत झाली. भारतीय संघाने 49.5 षटकात सर्व गडी गमवून 292 धावा केल्या आणि विजयासाठी 293 धावांचं आव्हान दिलं. मात्र पहिल्या सामन्यासारखं ऑस्ट्रेलियाला खेळता आलं नाही. ऑस्ट्रेलियाचा संपूर्ण संघ 40.5 षटकातच गारद झाला. ऑस्ट्रेलियाने फक्त 190 धावा केल्या. यासह भारताने या सामन्यात ऑस्ट्रेलियावर 102 धावांनी विजय मिळवला. त्यामुळे तिसऱ्या आणि अंतिम सामन्याचं महत्त्व वाढलं आहे. या मालिकेनंतर भारतीय संघ थेट वनडे वर्ल्डकप 2025 स्पर्धेत उतरणार आहे. त्यामुळे हा सामना खूपच महत्त्वाचा असणार आहे. या विजयानंतर कर्णधार हरमनप्रीत कौरने आपलं मत व्यक्त केलं.

हरमनप्रीत कौर म्हणाली की, ‘आज आम्ही चांगले क्रिकेट खेळलो याचा आम्हाला आनंद आहे. गेल्या टीम मीटिंगमध्ये आम्ही यावरच चर्चा केली होती की काहीही झाले तरी आम्ही आमच्या योजनांवर ठाम राहू आणि योग्य गोष्टी वारंवार करत राहू. निकाल आमच्या बाजूने मिळाल्याचा आम्हाला आनंद आहे. आम्ही गोष्टी सोप्या आणि स्पष्ट ठेवण्याबद्दल बोलतो. जेव्हा जेव्हा आम्हाला गरज असेल तेव्हा ते आम्हाला ब्रेकथ्रू देत आहे, ते आमच्यासाठी महत्त्वाचे आहे. आम्ही त्या गोष्टी पुन्हा पुन्हा करत राहू इच्छितो. आम्हाला स्मृतीकडून धावा मिळाल्या. पण इतरांनी धावा काढल्या नाहीत पण आम्ही 300 च्या जवळ पोहोचू शकलो. आम्ही याबद्दल बोलत राहतो, फलंदाजी करत राहतो, खेळपट्टीवर राहतो आणि आम्हाला नेहमीच त्या धावा मिळत राहतील कारण आता आमच्या फलंदाजीत खोली आहे.’

‘आमचे क्षेत्ररक्षण थोडेसे इकडे तिकडे होते. आम्ही काही संधी गमावल्या पण आमचे गोलंदाज आम्हाला संधी देत ​​राहिले आणि आम्ही त्याचा फायदा घेतला. या मालिकेत, आम्हाला प्रत्येकाला संधी द्यायची होती. आजच्या संयोजनामुळे आनंदी, प्रत्येकाने जबाबदारी घेतली आणि संघासाठी चांगले केले.’ , असंही हरमनप्रीत कौर पुढे म्हणाली.

महायुतीतील मतभेद दूर, आगामी निवडणुका एकत्र लढणार! बघा कोण काय म्हणालं?
महायुतीतील मतभेद दूर, आगामी निवडणुका एकत्र लढणार! बघा कोण काय म्हणालं?.
राणीच्या बागेतील दोन्ही वाघांचा मृत्यू, कारण लपवण्याचं कारण काय?
राणीच्या बागेतील दोन्ही वाघांचा मृत्यू, कारण लपवण्याचं कारण काय?.
'अडीच वर्षाचा स्पीड ब्रेकर सोडला, तर गेल्या 11 वर्षात प्रगतीचं...'
'अडीच वर्षाचा स्पीड ब्रेकर सोडला, तर गेल्या 11 वर्षात प्रगतीचं...'.
पुतीन यांची भारताला मोठी ग्वाही अन् रशिया-भारत करारांवर दिला भर
पुतीन यांची भारताला मोठी ग्वाही अन् रशिया-भारत करारांवर दिला भर.
भारत-रशियात महत्त्वपूर्ण करार, PM मोदी म्हणाले आता व्यापारी संबंधाना..
भारत-रशियात महत्त्वपूर्ण करार, PM मोदी म्हणाले आता व्यापारी संबंधाना...
भाजप-ठाकरे सेनेचा कामगार युनियनवरून राडा, वांद्र्यानंतर वरळीत घडल काय?
भाजप-ठाकरे सेनेचा कामगार युनियनवरून राडा, वांद्र्यानंतर वरळीत घडल काय?.
सुट्ट्यांबाबत इंडिगोचे नियम शिथिल, DGCA कडून जारी केलेले नवे आदेश काय?
सुट्ट्यांबाबत इंडिगोचे नियम शिथिल, DGCA कडून जारी केलेले नवे आदेश काय?.
सारंगखेड्याच्या घोडेबाजारात 21 लाखांच्या बाबाची क्रेझ, का होतेय चर्चा?
सारंगखेड्याच्या घोडेबाजारात 21 लाखांच्या बाबाची क्रेझ, का होतेय चर्चा?.
2029 ला मोदीच PM, महायुतीला एक वर्ष अन् फडणवीसांना थेट सांगून टाकलं..
2029 ला मोदीच PM, महायुतीला एक वर्ष अन् फडणवीसांना थेट सांगून टाकलं...
महायुतीच्या वर्षपूर्ती निमित्त अनाथ मुलांशी संवाद साधताना फडणवीस भावूक
महायुतीच्या वर्षपूर्ती निमित्त अनाथ मुलांशी संवाद साधताना फडणवीस भावूक.