AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

IND vs ENG : टीम इंडियात अचानक या गोलंदाजाची एन्ट्री, लॉर्ड्समध्ये प्लेइंग 11 मध्ये मिळणार संधी?

भारत आणि इंग्लंड यांच्यात तीन सामन्यांच्या वनडे मालिकेतील शेवटचा आणि निर्णायक सामना लॉर्डसवर होणार आहे. या सामन्यापूर्वी टीम इंडियाला वॉशिंग्टन सुंदरच्या रुपाने धक्का बसला. दुखापतग्रस्त असल्याने फलंदाजीनंतर फिल्डिंगला आला नाही. त्याच्या रिप्लेसमेंटची घोषणा बीसीसीआयने केली आहे.

IND vs ENG : टीम इंडियात अचानक या गोलंदाजाची एन्ट्री, लॉर्ड्समध्ये प्लेइंग 11 मध्ये मिळणार संधी?
IND vs ENG : टीम इंडियात अचानक या गोलंदाजाची एन्ट्री, लॉर्ड्समध्ये प्लेइंग 11 मध्ये मिळणार संधी?Image Credit source: PTI
| Updated on: Jul 18, 2026 | 8:59 PM
Share

भारत आणि इंग्लंड वनडे मालिकेतील निर्णय सामना लॉर्ड्सवर होणार आहे. या सामन्यासाठी दोन्ही संघ सज्ज आहे. तसं पाहिलं तर लॉर्ड्सवर भारताची कामगिरी काही खास नाही. त्यामुळे मागची आकडेवारी पाहता इंग्लंडचा रेकॉर्ड चांगला आहे. असं असताना या सामन्यापूर्वी टीम इंडियाला नाइलाजास्तव संघात एक बदल करावा लागला आहे. या सामन्याच्या एक दिवस आधी बीसीसीआयने संघात एक बदल केल्याची घोषणा केली आहे. दुसऱ्या वनडे सामन्यात दुखापतीमुळे अष्टपैलू वॉशिंग्टन सुंदर उतरू शकला नव्हता. त्याची दुखापत पाहता मालिकेतून आऊट झाला आहे. त्याच्या अष्टपैलू हर्ष दुबे यला संघात स्थान दिलं गेलं आहे. हर्ष दुबेने मागच्या महिन्यात अफगाणिस्तानविरुद्धच्या वनडे मालिकेत आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये पदार्पण केलं होतं. दुबेने मालिकेत दोन सामने खेळले होते आणि चार विकेट काढल्या होत्या. यापूर्वी अफगाणिस्तानविरुद्धच्या कसोटी संघाचा भागही होता. तेव्हा त्याला संधी मिळाली नव्हती. आता झिम्बाब्वे दौऱ्यासाठी त्याची संघात निवड केली आहे.

वॉशिंग्टन सुंदरला काय झालं?

16 जुलैला कार्डिफमध्ये भारत इंग्लंड यांच्यात दुसरा वनडे सामना खेळला गेला. या सामन्यात फलंदाजी करताना वॉशिंग्टन सुंदरच्या पायाला वेदना झाल्या. त्यामुळे मैदानात फार काही टिकू शकला नाही. फक्त 5 चेंडूंचा सामना केला आणि बाद झाला. त्यानंतर फील्डिंगलाही उतरला नाही. त्यानंतर मालिकेतून आऊट झाल्याची बातमी समोर आली. बीसीसीआयने या प्रकरणी स्पष्टीकरण देत सांगितलं की, वॉशिंग्टनला हॅमस्ट्रिंगला दुखापत झाली आहे. त्यामुळे लॉर्ड्समध्ये तिसरा वनडे सामना खेळणार नाही.

हर्ष दुबेला प्लेइंग 11 मध्ये जागा मिळणार?

हर्ष दुबेची संघात निवड झाली आहे, पण त्याला प्लेइंग 11 मध्ये जागा मिळणार का? हा प्रश्न विचारला जात आहे. कारण मागच्या दोन्ही सामन्यात टीम इंडियाने प्रथम फलंदाजी केली. त्यात भारताची फलंदाजी काही खास नव्हती. कार्डिफमध्ये तर फलंदाजांची दाणादाण उडाली. त्यामुळे भारतीय संघ एक अतिरिक्त फलंदाजासह मैदानात उतरू शकते. त्यामुळे इशान किशन आणि केएल राहुल दोघेही संघात असू शकतात.

भारताची संभाव्य प्लेइंग 11

शुबमन गिल (कर्णधार), रोहित शर्मा, विराट कोहली, श्रेयस अय्यर, केएल राहुल (विकेटकीपर), शिवम दुबे, अक्षर पटेल, गुरनूर ब्रार, कुलदीप यादव, जसप्रीत बुमराह आणि प्रसिद्ध कृष्णा.

Follow Us
भगवा टिळा अन् धीरज परदेशी प्रकरण; आमदाराच्या खळबळजनक आरोपानंतर संताप,
भगवा टिळा अन् धीरज परदेशी प्रकरण; आमदाराच्या खळबळजनक आरोपानंतर संताप, अखेर मुख्यमंत्र्यांनी...
भारत-चीन सीमावाद पुन्हा चर्चेत, अरुणाचल प्रदेशातील 27 ठिकाण...
भारत-चीन सीमावाद पुन्हा चर्चेत, अरुणाचल प्रदेशातील 27 ठिकाण... अखेर भारताच्या परराष्ट्र मंत्रालयाने चीनचे टोचले कान, काय घडलं?
पंतप्रधानांच्या नव्या व्हिडीओचा सोशल मीडियावर धुमाकूळ!
पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या नव्या व्हिडीओचा सोशल मीडियावर धुमाकूळ; नेमकं काय म्हणाले?
सुनावणी संपताच ठाकरेंच्या वकिलांची कोर्टाकडे मोठी मागणी; काय घडलं?
ShivSena | सुनावणी संपताच ठाकरेंच्या वकिलांची कोर्टाकडे मोठी मागणी; नेमकं काय घडलं?
शिवसेना पक्ष-चिन्हाचा फैसला जवळ? संजय राऊत म्हणाले, आशेचा किरण...
Sanjay Raut | शिवसेना पक्ष-चिन्हाचा फैसला जवळ? कपिल सिब्बलांच्या युक्तिवादानंतर संजय राऊत म्हणाले, आशेचा किरण...
विधिमंडळ पक्षात फूट म्हणजे राजकीय पक्षात फूट नाही!
Shivsena Case Hearing | विधिमंडळ पक्षात फूट म्हणजे राजकीय पक्षात फूट नाही!; कपिल सिब्बलांचा सुप्रीम कोर्टात जोरदार युक्तिवाद
आमचा युक्तीवाद सुरु होईल तेव्हा... कपिल सिब्बल यांच्या दाव्यांवर शिंदे
आमचा युक्तीवाद सुरु होईल तेव्हा... कपिल सिब्बल यांच्या दाव्यांवर शिंदे गटाकडून सर्वात मोठी प्रतिक्रिया
2018ची घटना असंवैधानिक तर शिंदेंची निवड संवैधानिक कशी?
मोठी बातमी! 2018ची घटना असंवैधानिक तर शिंदेंची निवड संवैधानिक कशी? कपिल सिब्बलांचा कोर्टात मोठा युक्तिवाद
अखेर मुळ शिवसेना कुणाची? सिब्बलांकडून थेट लेखी निवेदनाची प्रत सादर
अखेर मुळ शिवसेना कुणाची? सिब्बलांकडून थेट लेखी निवेदनाची प्रत सादर, चार मुद्यामध्येच... कोर्टात नेमकं काय घडलं?
TET पेपरफुटीचं महाराष्ट्र कनेक्शन उघड! खासगी अकॅडमी चालकाला अटक
TET पेपरफुटीचं महाराष्ट्र कनेक्शन उघड! सोलापुरातून खासगी अकॅडमी चालकाला अटक