AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

अनुष्काला वहिनी बोला…! हर्षित राणाने विराट कोहलीसोबतचा मजेशीर किस्सा केला शेअर Video

न्यूझीलंडविरुद्धच्या तिसऱ्या वनडे सामन्यात भारताचा पराभव झाला आणि मालिका गमावली. पण असं असूनही विराट कोहली आणि हर्षित राणा यांची भागीदारी चर्चेत राहिली. दुसरीकडे, हर्षित राणाने विराट कोहलीबाबत एक मजेशीर किस्सा शेअर केला आहे.

अनुष्काला वहिनी बोला...! हर्षित राणाने विराट कोहलीसोबतचा मजेशीर किस्सा केला शेअर Video
अनुष्काला वहिनी बोला...! हर्षित राणाने विराट कोहलीसोबतचा मजेशीर किस्सा केला शेअर VideoImage Credit source: BCCI/Viral Video Grab
| Updated on: Jan 19, 2026 | 5:19 PM
Share

भारताने न्यूझीलंडविरूद्ध वनडे मालिका 1-2 ने गमावली. या मालिकेतील तिसर्‍या सामन्यात भारताने विजयासाठी कडवी झुंज दिली. पण पराभवाचं तोंड पाहावं लागलं. आघाडीचे फलंदाज झटपट बाद झाल्याने विराट कोहलीने हर्षित राणासोबत सातव्या विकेटसाठी 69 चेंडूत 99 धावांची भागीदारी केली. विराट कोहलीने 124 धावा केल्या. तर आठव्या क्रमांकावर उतरत हर्षित राणाने 52 धावांची खेळी केली. मात्र 337 धावांचा पाठलाग करताना भारतीय संघ 297 धावांपर्यंत मजल मारली आणि सामना 41 धावांनी गमावला. असं असताना विराट कोहली आणि हर्षित राणाच्या भागीदारीची चर्चा होत आहे. दुसरीकडे, अष्टपैलू हर्षित राणाने विराट कोहली आणि त्याची पत्नी अनुष्काबाबत एक मजेशीर किस्सा शेअर केला होता. एका मुलाखतीत हर्षित राणाने हा किस्सा सर्वांना सांगितला होता. तेव्हा नेमकं काय झालं होतं ते जाणून घ्या.

हर्षित राणाने सांगितलं की, पहिल्यांदा अनुष्का शर्माला भेटला तेव्हा मी त्यांना मॅम असं संबोधलं. तेव्हा विराट कोहलीने त्याला अडवलं आणि अनुष्काला वहिनी बोल असं सांगितलं. हर्षित राणाने सांगितलं की, ‘मी पहिल्यांदा अनुष्काला भेटलो होतो. तेव्हा मी सहज त्यांना मॅम असं बोललो. तेव्हा विराट कोहलीने सांगितलं की मॅम नको बोलूस. वहिनी बोल. मी सांगितल की मी त्यांना पहिल्यांदाच भेटलो आहे. तेव्हा विराटने मजेशीर अंदाजात सांगितलं की, हा बाहेर माझ्यावर शँपेन फेकत होता. आता तुला मॅम बोलत आहे.’

टीम इंडियात सामील होण्यापूर्वी विराट कोहली आणि हार्दिक पांड्याबाबत गैरसमज होता. पण संघात सहभागी झाल्यानंतर त्यांच्याशी संवाद झाला आणि माझे सर्व गैरसमज दूर झाले. हर्षित राणा म्हणाला की, ‘टीव्हीवर पाहताना मला वाटायचं की विराट कोहली आणि हार्दिक पांड्या आक्रमक स्वभावाचे आहेत. ते सर्वांना घाबरवत असतील. पण हा एक गैरसमज होता. जेव्हा त्यांना प्रत्यक्षात भेटलो तेव्हा ते मजेदार होते. त्यामुळे मी काय विचार करत होतो त्यापेक्षा वेगळे निघाले.’

Follow Us
ये डर अच्छा है! ऑपरेशन टायगरच्या चर्चेत वाघमारेंचा ठाकरे गटाला इशारा
ये डर अच्छा है! ऑपरेशन टायगरच्या चर्चेत ज्योती वाघमारेंचा ठाकरे गटाला थेट इशारा, संजय राऊतांवरही निशाणा
पाणी डोक्यावरून गेलंय... ठाकरे गटाची तातडीने बैठक अन् अंबादास दानवेंचं
पाणी डोक्यावरून गेलंय... ठाकरे गटाची तातडीने बैठक अन् अंबादास दानवेंचं विधान; राजकारणात मोठा भूकंप येणार?
प्रणित मोरे प्रकरण थेट संसदेत? शिंदेंच्या महिला खासदाराचा प्रचंड संताप
आता प्रणित मोरे प्रकरण थेट संसदेत? शिंदेंच्या महिला खासदाराचा प्रचंड संताप; लवकरच...
कर्जमाफीवरून सरकारने अखेर बैठक बोलवली, नेमकं काय घडतंय?
Dattatray Bharne | कर्जमाफीवरून सरकारने अखेर बैठक बोलवली, रोहित पवारांच्या उपोषणामुळे हालचाली वाढल्या, नेमकं काय घडतंय?
24 तासांतच चांदीचा मुकुट पुन्हा चोरला; तुळजाभवानी मंदिरातील धक्कादायक
24 तासांतच चांदीचा मुकुट पुन्हा चोरला; तुळजाभवानी मंदिरातील धक्कादायक CCTV फुटेज समोर!
अर्वाच्च भाषेतील ऑडीओ क्लिप व्हायरल; बड्या अधिकाऱ्यावर मोठी कारवाई,
अर्वाच्च भाषेतील ऑडीओ क्लिप व्हायरल; बड्या अधिकाऱ्यावर मोठी कारवाई,  ठाकरेंच्या नगरसेवकाला... नेमकं प्रकरण काय?
भाजप आमदाराच्या पत्नीच्या गाडीचा भीषण अपघात; डोक्याला अन्....
मोठी बातमी! भाजप आमदाराच्या पत्नीच्या गाडीचा भीषण अपघात; डोक्याला आणि पायाला दुखापत
40 वर्षांच्या अनुभवासह धीरज सेठ यांच्याकडे देशाच्या सुरक्षेची धुरा
Dhiraj Seth | भारतीय लष्कराला नवे सेनाप्रमुख! 40 वर्षांच्या अनुभवासह धीरज सेठ यांच्याकडे देशाच्या सुरक्षेची धुरा
अजितदादांप्रमाणेच एकनाथ शिंदेंचाही घातपात होणार? बड्या नेत्याच्या
अजितदादांप्रमाणेच एकनाथ शिंदेंचाही घातपात होणार? बड्या नेत्याच्या दाव्याने एकच खळबळ; नेमकं काय सांगितलं?
भिवंडीत गॅस पाईपलाईनला गळती; जेसीबीच्या धक्का लागताच...
Bhiwandi | भिवंडीत गॅस पाईपलाईनला गळती; जेसीबीच्या धक्का लागताच...अनर्थ टाळण्यासाठी मोठी तारांबळ!