AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

शेवटच्या ओव्हरमध्ये षटकारांची हॅट्रिक, पाहा व्हिडीओ

महिला राष्ट्रीय क्रिकेट लीग ही महिलांची एकदिवसीय स्पर्धा ऑस्ट्रेलियामध्ये सुरू झाली आहे. पहिल्याच दिवशी जोरदार सामना व्हिक्टोरिया आणि दक्षिण ऑस्ट्रेलियात झाला. यात एक मोठी कामगिरी समोर आलीय.

शेवटच्या ओव्हरमध्ये षटकारांची हॅट्रिक, पाहा व्हिडीओ
ताहलिया मॅकग्राImage Credit source: social
| Updated on: Sep 23, 2022 | 9:05 PM
Share

नवी दिल्ली : संघात दमदार फलंदाजीसह गोरंदाजी करणारे खेळाडू असतील तर तुमचा विजय जवळपास निश्चित मानला जातो. हे अनेकदा पहायलाही मिळतं. पण, यातही अपवाद असतातच. पण, शेवटच्या षटकात तुम्ही जर सलग षटकार मारत असला तर चर्चा होणारच. असं ऑस्ट्रेलिया संघात  झालंय. ऑस्ट्रेलियन क्रिकेट संघ (Australia Cricket Team) सध्या महिला टी20 (T20) आणि एकदिवसीय विश्वविजेता आहे. याचं कारण संघातील सामने विजेते खेळाडू आहे. त्यापैकी एक म्हणजे ताहलिया मॅकग्रा (Tahlia Mcgrath) हिनं असंच काहीसं केलंय.

स्फोटक फलंदाज मॅकग्रानं आपल्या छोट्या कारकिर्दीत जोरदार कामगिरी केलीय. तिनं ऑस्ट्रेलियासाठी सामने जिंकले आहेत. सध्या ऑस्ट्रेलियन संघ खेळत नाही. त्यामुळे मॅकग्रा देशांतर्गत स्पर्धेत भाग घेत आहे. तिनं एका सामन्यात रोमांचक पद्धतीनं षटकारांची हॅट्ट्रिक केलीय. या तिच्या कामगिरीमुळे ती सध्या चर्चेत आहे.

हा व्हिडीओ पाहा

एलिसचं शतक

महिला राष्ट्रीय क्रिकेट लीग ही महिलांची एकदिवसीय स्पर्धा ऑस्ट्रेलियामध्ये सुरू झाली. पहिल्याच दिवशी व्हिक्टोरिया आणि दक्षिण ऑस्ट्रेलिया यांच्यात झाला. ऑस्ट्रेलियाकडे दोन्ही संघात दोन उत्कृष्ट खेळाडू होते. व्हिक्टोरियाची खेळाडू अ‍ॅलिस पॅरीनं 117 धावा केल्या आणि तिच्यासोबत 20 वर्षीय अ‍ॅनाबेल सदरलँडनेही 110 धावा केल्या. याच्या जोरावर व्हिक्टोरियानं 264 धावा केल्या.

मॅकग्रान जोमात

मॅकग्राने उत्कृष्ट खेळी खेळली आहे. यात तिला इतर फलंदाजांचीही फारशी साथ मिळाली नाही. असं असूनही सामना दक्षिण ऑस्ट्रेलियाच्या आवाक्याबाहेर दिसत होता. शेवटच्या षटकात 15 धावांची गरज होती. मॅकग्रा 93 धावांवर खेळत असून शतकापासून 7 धावा दूर होती. यातच तिनं धडाकेबाज फलंदाजी करत तीन चेंडूंवर सलग तीन षटकार मारत आपलं शतक पूर्ण केलंय. शिवाय संघाला विजय मिळवून दिला.

शेवटच्या षटकात विजय

मॅकग्राने सामन्यात अप्रतिम कामगिरी केली. तिनं 111 चेंडूत 7 चौकार आणि 4 षटकारांसह नाबाद 111 धावा केल्या. यातही शेवटच्या तीन चेंडूंवर तीन षटकार खेचले. दक्षिण ऑस्ट्रेलियाने हा सामना ३ गडी राखून जिंकला आणि स्पर्धेत दमदार सुरुवात केली.

पार्थ पवारांवर गुन्हा का नाही?जमीन गैरव्यवहार प्रकरणी हायकोर्टाचा सवाल
पार्थ पवारांवर गुन्हा का नाही?जमीन गैरव्यवहार प्रकरणी हायकोर्टाचा सवाल.
सोमय्या भाजपवर नाराज...2019चा अपमान विसरलो नाही, बड्या नेत्यावर निशाणा
सोमय्या भाजपवर नाराज...2019चा अपमान विसरलो नाही, बड्या नेत्यावर निशाणा.
निधीवरून महायुतीतच चकमक, विधान परिषदेत भाजपची अजितदादांवर नाराजी
निधीवरून महायुतीतच चकमक, विधान परिषदेत भाजपची अजितदादांवर नाराजी.
'लाडकी बहीण योजनेला आमचा पाठिंबाच, पण शिंदेंना देखील पाठिंबा'
'लाडकी बहीण योजनेला आमचा पाठिंबाच, पण शिंदेंना देखील पाठिंबा'.
हा महाराष्ट्राचा तोटा, 1 नंबरचा आमचा माणूस... जयंत पाटील काय म्हणाले?
हा महाराष्ट्राचा तोटा, 1 नंबरचा आमचा माणूस... जयंत पाटील काय म्हणाले?.
चलान कट करताना होणारे वाद आता मिटणार, कारण...फडणवीस यांची मोठी घोषणा
चलान कट करताना होणारे वाद आता मिटणार, कारण...फडणवीस यांची मोठी घोषणा.
अण्णा हजारे यांचा तपोवनातील वृक्षतोडीला विरोध; म्हणाले, कुंभमेळा....
अण्णा हजारे यांचा तपोवनातील वृक्षतोडीला विरोध; म्हणाले, कुंभमेळा.....
"'लाडकी बहीण' बंद व्हावी म्हणून कोर्टात जाणारा नानांचा माणूस..."
गोगावलेंचा पैशांसोबत फोटो, महिला नेत्याचा गंभीर आरोप; राजकारणात खळबळ!
गोगावलेंचा पैशांसोबत फोटो, महिला नेत्याचा गंभीर आरोप; राजकारणात खळबळ!.
लाडक्या बहिणींना 2100 कधी मिळणार, तारीख काय? शिंदेंनी थेट सांगितलं...
लाडक्या बहिणींना 2100 कधी मिळणार, तारीख काय? शिंदेंनी थेट सांगितलं....