AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

Asia cup 2022: 3 संघांना लोळवून आशिया कप मध्ये पोहोचले, भारत-पाकिस्तानला ‘या’ टीमपासून धोका

Asia cup 2022:आशिया कप (Asia cup) स्पर्धेच काऊंटडाऊन सुरु झालय. सर्वांनाच भारत-पाकिस्तान (IND vs PAK) लढतीची उत्सुक्ता आहे. पण आशिया कप मध्ये असाही एक संघ आहे, जो भारत-पाकिस्तानसाठी धोकादायक ठरु शकतो.

Asia cup 2022: 3 संघांना लोळवून आशिया कप मध्ये पोहोचले, भारत-पाकिस्तानला 'या' टीमपासून धोका
hong kong team Image Credit source: AFP
| Updated on: Aug 25, 2022 | 11:22 AM
Share

मुंबई: आशिया कप (Asia cup) स्पर्धेच काऊंटडाऊन सुरु झालय. सर्वांनाच भारत-पाकिस्तान (IND vs PAK) लढतीची उत्सुक्ता आहे. पण आशिया कप मध्ये असाही एक संघ आहे, जो भारत-पाकिस्तानसाठी धोकादायक ठरु शकतो. दोन्ही टीम्सच्या पुढे जाण्याच्या मार्गात अडथळा बनू शकतो. हा संघ आहे, हाँगकाँगचा. आशिया कपसाठी हाँगकाँगचा संघ पात्र ठरला आहे. त्यांनी शेवटच्या क्वालिफायर सामन्यात UAE च्या संघाला पराभवाचं पाणी पाजलं. फक्त यूएईच नाही, हाँगकाँगने त्यांच्या आशिया कपच्या मार्गात आलेल्या प्रत्येक संघाला नमवलं. त्यांनी एकूण तीन संघांना पराभवाचा धक्का दिला व आशिया कप मध्ये दाखल झाले आहेत.

आशिया कपच तिकीट मिळवण्यासाठी हाँगकाँगने आपल्यापेक्षा मजबूत संघांना हरवलं. त्यांची स्वत:ची रँकिंग 27 आहे. पण तरीही त्यांनी त्यांच्यापेक्षा वरच्या रँकिंगच्या संघांना हरवलं. यूएईचं रँकिंग 12 आहे. ओमान 17 व्या स्थानावर आहे. या दोन्ही संघांना हाँगकाँगने नमवलं.

भारत-पाकिस्तानच्या गटात हाँगकाँग

आशिया कपच तिकीट मिळाल्यानंतर हाँगकाँगचा संघ ग्रुप ए मध्ये दाखल झालाय. भारत-पाकिस्तान या ग्रुपचे सदस्य आहेत. भारत-पाकिस्तानसमोर हाँगकाँगचा संघ आव्हान उभं करु शकतो. भारत-पाकिस्तानला पुढची फेरी गाठण्यासाठी या संघाला हरवावच लागेल.

हाँगकाँगच्या टीमपासून धोका ?

क्वालिफायर मध्ये हाँगकाँगच्या टीमने आपल्यापेक्षा सरस रँकिंगच्या टीमना हरवलय, त्यामुळे हाँगकाँगचा संघ घातक आहे. त्याशिवाय ते विजय रथावर स्वार आहेत. क्वालिफायर मध्ये त्यांनी एकही सामना गमावलेला नाही. विजयाची हॅट्ट्रिक करुन आशिया कप मध्ये दिमाखात प्रवेश केलाय. त्यामुळे सहाजिकच त्यांचा आत्मविश्वास उंचावलेला असणार.

बाबर हयात हाँगकाँगचा प्रमुख फलंदाज

भारत-पाकिस्तानला हाँगकाँगचा प्रमुख फलंदाज बाबर हयात पासून संभाळून रहाण्याची गरज आहे. एकट्याच्या बळावर तो बाजी उलटवू शकतो. टी 20 आशिया कपच्या इतिहासात शतक नावावर असलेला बाबर हयात एकमेव फलंदाज आहे. ग्रुप ए मध्ये भारत, पाकिस्तान, हाँगकाँग हे तीन संघ आहेत. ग्रुप बी मध्ये श्रीलंका, अफगाणिस्तान आणि बांगलादेशचा संघ आहे. वर्ष 2018 मध्ये सुद्धा दोन असेच ग्रुप होते. त्यावेळी भारतीय संघाने विजेतेपद मिळवलं होतं.

INTIMASIA 2025 एक्झिबिशनमध्ये फ्लोरेटच्या आधुनिक उत्पादनांचे प्रदर्शन!
INTIMASIA 2025 एक्झिबिशनमध्ये फ्लोरेटच्या आधुनिक उत्पादनांचे प्रदर्शन!.
राजीनामा स्वीकारताच कोकाटेंच्या अटकेसाठी पोलीस रवाना
राजीनामा स्वीकारताच कोकाटेंच्या अटकेसाठी पोलीस रवाना.
फलटण प्रकरणी राजकारण नको! फडणवीसांनी स्पष्टच सांगितलं
फलटण प्रकरणी राजकारण नको! फडणवीसांनी स्पष्टच सांगितलं.
ड्रग्जचे कारखाने गुंतवणूक आहे का? राऊतांचा खोचक प्रश्न
ड्रग्जचे कारखाने गुंतवणूक आहे का? राऊतांचा खोचक प्रश्न.
.. म्हणून एकनाथ शिंदेंचा राजीनामा घ्या! सुषमा अंधारेंची मोठी मागणी
.. म्हणून एकनाथ शिंदेंचा राजीनामा घ्या! सुषमा अंधारेंची मोठी मागणी.
थंडीचा कडाका वाढला; रब्बी हंगामासाठी पोषक वातावरण
थंडीचा कडाका वाढला; रब्बी हंगामासाठी पोषक वातावरण.
अजितदादांकडून फडणवीसांची भेट; मोठं कारण आलं समोर
अजितदादांकडून फडणवीसांची भेट; मोठं कारण आलं समोर.
मुंबईतलं 2017चं सूत्र आता नको; शिंदेंच्या नेत्यांची मागणी
मुंबईतलं 2017चं सूत्र आता नको; शिंदेंच्या नेत्यांची मागणी.
जोपर्यंत देवाभाऊ मुख्यमंत्री, तोपर्यंत...; फडणवीसांचं मोठं विधान
जोपर्यंत देवाभाऊ मुख्यमंत्री, तोपर्यंत...; फडणवीसांचं मोठं विधान.
नाना पटोलेंमुळं काँग्रेस डबघाईला आली! अशोक चव्हाणांचा गंभीर आरोप
नाना पटोलेंमुळं काँग्रेस डबघाईला आली! अशोक चव्हाणांचा गंभीर आरोप.