AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

IND vs ENG, Rahul Dravid : मला कोणतंही कारण सांगायचं नाही, टीम इंडियाच्या पराभवावर राहुल द्रविडची प्रतिक्रिया, व्हिडीओ व्हायरल

राहुल द्रविड म्हणतो की, 'भारतीय संघाची ही कामगिरी आम्ही नक्कीच पाहणार आहोत. आमच्यासाठी प्रत्येक सामना धड्यासारखा आहे. त्यातून आपण काही शिकण्याचा प्रयत्न करतो. आम्ही तिसऱ्या डावात चांगली फलंदाजी का करू शकलो नाही याचा आढावा घेऊ.'

IND vs ENG, Rahul Dravid : मला कोणतंही कारण सांगायचं नाही, टीम इंडियाच्या पराभवावर राहुल द्रविडची प्रतिक्रिया, व्हिडीओ व्हायरल
प्रशिक्षक राहुल द्रविडImage Credit source: social
| Updated on: Jul 06, 2022 | 9:08 AM
Share

नवी दिल्ली : एजबॅस्टन कसोटीत इंग्लंड संघानं भारतावर (IND vs ENG) सात गडी राखून मात केली. या पराभवानंतर भारतीय (IND) संघावरही टीका होत आहे. भारतीय संघानं पहिल्या डावात जबरदस्त फलंदाजी करत 416 धावा केल्या. इतकेच नाही तर टीम इंडियाने पहिल्या डावात इंग्लंडला 284 धावांत गुंडाळत 132 धावांची आघाडी घेतली. टीम इंडिया दुसऱ्या डावात पिछाडीवर पडली होती आणि चौथ्या दिवशी फलंदाजीला अनुकूल खेळपट्टीवर 245 धावा झाल्या होत्या. यानंतर इंग्लंडने 378 धावांचे लक्ष्य केवळ तीन गडी गमावून पूर्ण केले. भारतीय संघाला याआधी दक्षिण आफ्रिकेविरुद्धही याच शैलीत पराभव पत्करावा लागला होता. त्यानंतरही दक्षिण आफ्रिकेनं चौथ्या डावात शानदार फलंदाजी करत विजय मिळवला.आता प्रशिक्षक राहुल द्रविड (Rahul Dravid) यांनी एजबॅस्टन कसोटीनंतर या मुद्द्याचा आढावा घेण्याचा निर्णय घेतला आहे. इंग्लंडविरुद्धच्या पराभवानंतर प्रशिक्षक द्रविड म्हणाला, ‘आम्ही काही काळापासून इतके क्रिकेट खेळत आहोत की आमच्याकडे कशाचाही विचार करायला वेळ नाही. दोन दिवसांनंतर आम्ही तुम्हाला इतर काही गोष्टींबद्दल बोलताना पाहू. इंग्लंडमधून होणाऱ्या टी-20 मालिकेबाबत द्रविडने हे सांगितले.

द्रविड काय म्हणाला?

आढावा घेणार

राहुल द्रविड म्हणतो की, ‘भारतीय संघाची ही कामगिरी आम्ही नक्कीच पाहणार आहोत. आमच्यासाठी प्रत्येक सामना धड्यासारखा आहे. त्यातून आपण काही शिकण्याचा प्रयत्न करतो. आम्ही तिसऱ्या डावात चांगली फलंदाजी का करू शकलो नाही याचा आढावा घेऊ. यासोबतच आम्ही चौथ्या डावात 10 विकेट का काढू शकलो नाही, याचाही आढावा घेणार आहोत.

राहुलचा व्हिडीओ व्हायरल

रिपोर्टरने बझबॉलबाबत प्रश्न विचारताच राहुल द्रविडच्या उत्तरावर उपस्थित सर्वजण हसले.राहुल द्रविडचा हा व्हिडिओ सोशल मीडियावर चांगलाच व्हायरल होत आहे.

राहुल व्हिडीओ पाहा

रिपोर्टर म्हणाला, ‘बॅझबॉल… बझबॉल, तुम्ही ऐकलं असेल, अनेकांना असं वाटतंय की यामुळे संपूर्ण क्रिकेट बदलेल, मग तुम्ही बझबॉलबद्दल काय सांगाल?’ हा प्रश्न ऐकताच राहुल द्रविड हसला आणि उत्तरात म्हणाला, ‘बॅझबॉल म्हणजे काय हे मला माहीत नाही, पण मला एक गोष्ट सांगायलाच हवी की तो उत्तम क्रिकेट खेळला.’ब्रेंडन मॅक्युलम जेव्हापासून इंग्लंड संघाचा प्रशिक्षक झाला, तेव्हापासून हा संघ कसोटी क्रिकेटमध्ये अतिशय आक्रमकपणे खेळत आहे.

राहुल द्रविडचा हा व्हिडीओ प्रचंड व्हायरल झालाय.

फडणवीस सरकारच 1 वर्ष, मुख्यमंत्र्यांना किती मार्क? काय सांगतो सर्व्हे?
फडणवीस सरकारच 1 वर्ष, मुख्यमंत्र्यांना किती मार्क? काय सांगतो सर्व्हे?.
फोडाफोडीन नाराजी, वाक् युद्धानंतर आज शिंदे-रवींद्र चव्हाण एकाच मंचावर?
फोडाफोडीन नाराजी, वाक् युद्धानंतर आज शिंदे-रवींद्र चव्हाण एकाच मंचावर?.
फडणवीसांच्या इशाऱ्याने इतर पक्ष चालतात, कुणाच्या वक्तव्याची होते चर्चा
फडणवीसांच्या इशाऱ्याने इतर पक्ष चालतात, कुणाच्या वक्तव्याची होते चर्चा.
CM सह शिंदे दादांची महत्त्वाची बैठक; पक्षांतर्गत प्रवेशबंदीवर तोडगा?
CM सह शिंदे दादांची महत्त्वाची बैठक; पक्षांतर्गत प्रवेशबंदीवर तोडगा?.
इंडिगोच्या विस्कळीत सेवेविरोधात प्रवाशांना मनस्ताप, थेट कोर्टात याचिका
इंडिगोच्या विस्कळीत सेवेविरोधात प्रवाशांना मनस्ताप, थेट कोर्टात याचिका.
रूपाली ठोंबरेंकडून बाळासाहेब अन् पवारांसोबत फोटो शेअर, चर्चांना उधाण
रूपाली ठोंबरेंकडून बाळासाहेब अन् पवारांसोबत फोटो शेअर, चर्चांना उधाण.
मुंबईत भाजपच्या महापौरामुळं कॉलर टाईट होणार! लोढांचं मोठं वक्तव्य काय?
मुंबईत भाजपच्या महापौरामुळं कॉलर टाईट होणार! लोढांचं मोठं वक्तव्य काय?.
चैत्यभूमीवर जनसागर... बाबासाहेबांच्या महापरिनिर्वाण दिनी मोठी गर्दी
चैत्यभूमीवर जनसागर... बाबासाहेबांच्या महापरिनिर्वाण दिनी मोठी गर्दी.
डॉ. आंबेडकरांना राज्यपाल, मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्र्यांकडून आदरांजली
डॉ. आंबेडकरांना राज्यपाल, मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्र्यांकडून आदरांजली.
बहरीनमध्ये जय पवार यांची हळदी, बघा दिमाखदार सोहळ्याचे फोटो
बहरीनमध्ये जय पवार यांची हळदी, बघा दिमाखदार सोहळ्याचे फोटो.