AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

AUS vs ENG : 12 बॉलमध्ये 50 रन्स, इतक्याच चेंडूत शतक, बेन डकेटची सेंच्युरी, माजी कर्णधाराच्या रेकॉर्डची बरोबरी

Ben Duckett Century Icc Champions Trophy 2025 : इंग्लंडच्या बेन डकेट याने आयसीसी चॅम्पियन्स ट्रॉफी 2025 मोहिमेतील पहिल्याच सामन्यात खणखणीत शतक झळकावलं आहे. डकेटचं हे ऑस्ट्रेलियाविरुद्धचं दुसरं एकदिवसीय शतक ठरलं आहे.

AUS vs ENG : 12 बॉलमध्ये 50 रन्स, इतक्याच चेंडूत शतक, बेन डकेटची सेंच्युरी, माजी कर्णधाराच्या रेकॉर्डची बरोबरी
Ben Duckett Century
| Updated on: Feb 22, 2025 | 5:42 PM
Share

इंग्लंडचा सलामीवीर बेन डकेट याने आयसीसी चॅम्पियन्स ट्रॉफी 2025 स्पर्धेतील आपल्या पहिल्यावहिल्या सामन्यात अप्रतिम सुरुवात केली आहे. बेन डकेट याने लाहोरमधील गद्दाफी स्टेडियममध्ये ऑस्ट्रेलियाविरुद्धच्या सामन्यात खणखणीत शतक झळकावलं आहे. बेन डकेट याने या शतकी खेळीसह माजी कर्णधार एंड्रयू फ्लिंटॉफच्या विक्रमाची बरोबरी साधली आहे. बेन डकेटने या शतकी खेळीत किती चौकार-षटकार ठोकले तसेच कोणत्या विक्रमाची बरोबरी केली? हे सविस्तर जाणून घेऊयात.

ऑस्ट्रेलियाने टॉस जिंकून इंग्लंडला बॅटिंगसाठी भाग पाडलं. ऑस्ट्रेलियाच्या गोलंदाजांनी इंग्लंडला झटपट 2 झटके दिले. फिलिप सॉल्ट याने 10 आणि जेमी स्मिथने 15 धावा केल्या. त्यामुळे इंग्लंडची 2 बाद 43 अशी स्थिती झाली. मात्र त्यानंतर बेन डकेट आणि जो रुट याने दोघांनी सार्थपणे डाव सावरला आणि इंग्लंडला 200 पार पोहचवलं. मात्र त्यानंतर ही जोडी फुटली. जो रुट 78 बॉलमध्ये 4 फोरसह 68 रन्स करुन आऊट झाला.

त्यानंतर बेन डकेट याने हॅरी ब्रूकसह पुन्हा एकदा भागीदारी रचायला सुरुवात केली. डकेटने 32 व्या ओव्हरमधील पाचव्या बॉलवर फोर ठोकून शतक पूर्ण केलं. डकेटच्या एकदिवसीय कारकीर्दीतील हे तिसरं शतक ठरलं. डकेटने यासह माजी कर्णधार एंड्रयू फ्लिंटॉफच्या 3 एकदिवसीय शतकांची बरोबरी केली.

डकेटने 95 बॉलमध्ये 106.32 च्या स्ट्राईक रेटने हे शतक पूर्ण केलं. डकेटने शतकी खेळीत 11 चौकार आणि 1 षटकार ठोकला. डकेटने चौकार आणि षटकारांच्या मदतीने 12 चेंडूत 50 धावा केल्या.

बेन डकेट सहावा शतकवीर

दरम्यान बेन डकेट आयसीसी चॅम्पियन्स ट्रॉफी 2025 स्पर्धेत शतक करणारा इंग्लंडचा पहिला आणि एकूण सहावा फलंदाज ठरला आहे. या स्पर्धेत आतापर्यंत अनुक्रमे टॉम लॅथम, विल यंग, तॉहिद हृदॉय,शुबमन गिल, रायन रिकेल्टन आणि बेन डकेट यांनी शतकी खेळी केली आहे.

डकेटचं चॅम्पियन्स ट्रॉफी पदार्पणात शतक

ऑस्ट्रेलिया प्लेइंग ईलेव्हन : स्टीव्हन स्मिथ (कॅप्टन), मॅथ्यू शॉर्ट, ट्रॅव्हिस हेड, मार्नस लाबुशेन, जोश इंगलिस (विकेटकीपर), एलेक्स केरी, ग्लेन मॅक्सवेल, बेन द्वारशुइस, नॅथन एलिस, अ‍ॅडम झॅम्पा आणि स्पेन्सर जॉन्सन.

इंग्लंड प्लेइंग ईलेव्हन : जोस बटलर (कॅप्टन), फिलिप साल्ट, बेन डकेट, जेमी स्मिथ (विकेटकीपर), जो रूट, हॅरी ब्रूक, लियाम लिव्हिंगस्टोन, ब्रायडन कार्स, जोफ्रा आर्चर, आदिल रशीद आणि मार्क वूड.

राणीच्या बागेतील दोन्ही वाघांचा मृत्यू, कारण लपवण्याचं कारण काय?
राणीच्या बागेतील दोन्ही वाघांचा मृत्यू, कारण लपवण्याचं कारण काय?.
'अडीच वर्षाचा स्पीड ब्रेकर सोडला, तर गेल्या 11 वर्षात प्रगतीचं...'
'अडीच वर्षाचा स्पीड ब्रेकर सोडला, तर गेल्या 11 वर्षात प्रगतीचं...'.
पुतीन यांची भारताला मोठी ग्वाही अन् रशिया-भारत करारांवर दिला भर
पुतीन यांची भारताला मोठी ग्वाही अन् रशिया-भारत करारांवर दिला भर.
भारत-रशियात महत्त्वपूर्ण करार, PM मोदी म्हणाले आता व्यापारी संबंधाना..
भारत-रशियात महत्त्वपूर्ण करार, PM मोदी म्हणाले आता व्यापारी संबंधाना...
भाजप-ठाकरे सेनेचा कामगार युनियनवरून राडा, वांद्र्यानंतर वरळीत घडल काय?
भाजप-ठाकरे सेनेचा कामगार युनियनवरून राडा, वांद्र्यानंतर वरळीत घडल काय?.
सुट्ट्यांबाबत इंडिगोचे नियम शिथिल, DGCA कडून जारी केलेले नवे आदेश काय?
सुट्ट्यांबाबत इंडिगोचे नियम शिथिल, DGCA कडून जारी केलेले नवे आदेश काय?.
सारंगखेड्याच्या घोडेबाजारात 21 लाखांच्या बाबाची क्रेझ, का होतेय चर्चा?
सारंगखेड्याच्या घोडेबाजारात 21 लाखांच्या बाबाची क्रेझ, का होतेय चर्चा?.
2029 ला मोदीच PM, महायुतीला एक वर्ष अन् फडणवीसांना थेट सांगून टाकलं..
2029 ला मोदीच PM, महायुतीला एक वर्ष अन् फडणवीसांना थेट सांगून टाकलं...
महायुतीच्या वर्षपूर्ती निमित्त अनाथ मुलांशी संवाद साधताना फडणवीस भावूक
महायुतीच्या वर्षपूर्ती निमित्त अनाथ मुलांशी संवाद साधताना फडणवीस भावूक.
मी कोणालाही घाबरत नाही, मला मारण्याची.. जैन मुनींच राज ठाकरेंना चॅलेंज
मी कोणालाही घाबरत नाही, मला मारण्याची.. जैन मुनींच राज ठाकरेंना चॅलेंज.