Icc Champions Trophy 2025 : पाकिस्तानने टॉस जिंकला, न्यूझीलंडविरुद्ध प्लेइंग ईलेव्हनमध्ये कोण?
Pakistan vs New Zealand Toss And Playing Eleven : चॅम्पियन्स ट्रॉफी 2025 स्पर्धेतील सलामीच्या सामन्यात पाकिस्तानने टॉस जिंकला आहे. न्यूझीलंडची बॅटिंग की फिल्डिंग? जाणून घ्या.

आयसीसी चॅम्पियन्स ट्रॉफी 2025 स्पर्धेतील सलामीचा सामना आज 19 फेब्रुवारीला खेळवण्यात येत आहे. या स्पर्धेतील पहिल्या सामन्यात यजमान पाकिस्तान विरुद्ध न्यूझीलंड आमनेसामने आहेत. या सामन्याचं आयोजन हे कराचीतील नॅशनल स्टेडियममध्ये करण्यात आलं आहे. सामन्याला भारतीय वेळेनुसार दुपारी 2 वाजून 30 मिनिटांनी सुरुवात होणार आहे. त्याआधी 2 वाजता टॉस झाला. पाकिस्तानच्या बाजूने नाणेफेकीचा कौल लागला. कर्णधार मोहम्मद रिझवान याने फिल्डिंगचा निर्णय घेत न्यूझीलंडला बॅटिंगसाठी भाग पाडलं आहे.
आठवड्याभरात दुसऱ्यांदा आणि एकूण तिसऱ्यांदा आमनेसामने
पाकिस्तान आणि न्यूझीलंड दोन्ही संघांची आठवड्याभरात आमनेसामने येण्याची ही दुसरी वेळ आहे. चॅम्पियन्स ट्रॉफीआधी पाकिस्तान, न्यूझीलंड आणि दक्षिण आफ्रिका यांच्यात त्रिसदस्यीय एकदिवसीय मालिका पार पडली. या 4 सामन्यांच्या मालिकेत पाकिस्तान आणि न्यूझीलंड दोन्ही संघ साखळी फेरीत आणि अंतिम सामन्यात असे एकूण 2 वेळा आमनेसामने आले होते. न्यूझीलंडने तेव्हा दोन्ही वेळा पाकिस्तानचा धुव्वा उडवला होता. त्यामुळे आता न्यूझीलंडचा चॅम्पियन्स ट्रॉफीतही पाकिस्तानचा धुव्वा उडवण्याचा प्रयत्न असणार आहे. तर यजमान या नात्याने पाकिस्तानचा या स्पर्धेत विजयाने सुरुवात करण्याचा मानस असणार आहे.
पाकिस्तान न्यूझीलंडवर वरचढ
दरम्यान एकदिवसीय क्रिकेटमध्ये पाकिस्तान न्यूझीलंडवर वरचढ राहिली आहे. दोन्ही संघात आतापर्यंत एकूण 118 एकदिवसीय सामने खेळवण्यात आले आहेत. पाकिस्तानने या 118 पैकी सर्वाधिक सामने जिंकले आहेत. पाकिस्तानने किवींचा 61 वेळा धुव्वा उडवला आहे. तर न्यूझीलंडने पाकिस्तानवर 53 सामन्यात मात केली आहे. तसेच दोन्ही संघात झालेल्या 3 सामन्यांचा निकालच लागला नाही. तर 1 मॅच टाय राहिली.
पाकिस्तान विन द टॉस
It’s #ChampionsTrophy time 🤩
Pakistan have won the toss and opted to bowl first in their tournament opener against New Zealand 👊
Live Updates ⬇️https://t.co/zwf58nMyN9
— ICC (@ICC) February 19, 2025
न्यूझीलंड प्लेइंग ईलेव्हन : मिचेल सँटनर (कॅप्टन), डेव्हॉन कॉनव्हे, विल यंग, केन विल्यमसन, डॅरिल मिशेल, टॉम लॅथम (डब्ल्यू), ग्लेन फिलिप्स, मायकेल ब्रेसवेल, नॅथन स्मिथ, मॅट हेन्री आणि विल्यम ओरुर्के.
पाकिस्तान प्लेइंग इलेव्हन : मोहम्मद रिझवान (कॅप्टन आणि विकेटकीपर), फखर जमान, बाबर आझम, सौद शकील, सलमान आगा, तय्यब ताहिर, खुशदिल शाह, शाहीन आफ्रिदी, नसीम शाह, हरिस रौफ आणि अबरार अहमद.