आयसीसीकडून टीम इंडियासाठी गुड न्यूज, हा खेळाडू ठरला ‘प्लेयर ऑफ द मंथ’चा मानकरी
ICC Men’s Player of the Month winner for June : यंदाच्या टी-20 वर्ल्ड कप जिंकल्यानंतर टीम इंडियासाठी आयसीसीने आनंदाची बातमी दिली आहे. टीम इंडियाच्या खेळाडूला 'प्लेयर ऑफ द मंथ' चा पुरस्कार दिला आहे. कोण आहे तो खेळाडू?

यंदाच्या टी-20 वर्ल्ड कपवर टीम इंडियाने आपलं नाव कोरलं आहे. कॅप्टन रोहित शर्मा याच्या नेतृत्त्वाखाली भारताने दुसरा टी-20 वर्ल्ड कप जिंकत इतिहास रचला. अशातच आयसीसीकडून मोठी अपडेट आली असून जुन महिन्यातील ‘प्लेयर ऑफ द मंथ’ खेळाडूचा पुरस्कार टीम इंडियाच्या खेळाडूला मिळाला आहे. आयसीसीसकडून यासाठी तीन खेळाडूंना नामांकन मिळालेलं, यामधील टीम इंडियाचा हुकमी एक्का असणाऱ्या खेळाडूने बाजी मारलीये.
ICC T20 वर्ल्ड कपमधील कामगिरीवर आयसीसीने रोहित शर्मा, जसप्रीत बुमराह आणि रहमानउल्ला गुरबाज यांची निवड केलेली. तिन्ही खेळाडूंनी दमदार कामगिरी केली होती. यंदाच्या वर्ल्ड कपमध्ये 8 सामन्यांमध्ये 35.12 च्या सरासरीने सर्वाधिक 281 धावा केल्या होत्या. तर त्यापाठोपाठ रोहित शर्माने 156.7 स्ट्राइक रेटने 257 धावा केल्या. सुपर-8मध्ये ऑस्ट्रेलियाविरुद्ध 92 धावांची खेळी केली होती, तर उपांत्य फेरीत इंग्लंडविरुद्ध 57 धावांची खेळी केलेली. तिसरा खेळाडू जसप्रीत बुमराह यंदाच्या वर्ल्ड कपमध्ये सर्वाता आव्हानात्मक राहिला. टीम इंडियाला वर्ल्ड कप जिंकून देण्यात बुमराहचा स्पेल म्हणजे टर्निंग पॉईंट ठरला.
India’s bowling maestro caps off a phenomenal month of June with the ICC Men’s Player of the Month Award 🤩
— ICC (@ICC) July 9, 2024
जसप्रीत बुमराह याची आयसीसीने प्लेअर ऑफ द मंथ या पुरस्कारासाठी निवड केली आहे. यंदाच्या वर्ल्ड कपमध्ये बुमराहने 8.26 च्या सरासरीने एकूण 15 विकेट घेतल्या आणि संपूर्ण स्पर्धेत फक्त 4.17 च्या इकॉनॉमी रेटने धावा दिल्या. मात्र कॅप्टन रोहित शर्माचे चाहते नाराज झालेत. आयसीसीचा जून महिन्यातील ‘प्लेयर ऑफ द मंथ पुरस्कार’ हा बुमराहने जिंकलाय.
जून महिन्यातील आयसीसी प्लेयर ऑफ द मंथ म्हणून माझी निवड झाल्याने मला छान वाटत आहे. शानदार कामगिरी करत वर्ल्ड कप जिंकणं हा चांगला अनुभव आहे. मी कर्णधार रोहित शर्मा आणि रहमानउल्ला गुरबाज यांचेही उत्कृष्ट कामगिरीबद्दल अभिनंदन करतो. माझे सर्व सहकारी खेळाडू, प्रशिक्षक आणि कुटंबाचे मी आभार मानू इच्छितो असं, जसप्रीत बुमराह म्हणाला.
