AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

Icc Odi Ranking : रोहितचा नाद नाय, 7 दिवसात हिशोब करत हिटमॅन पुन्हा नंबर 1, भारताचा टॉप 10 मध्ये दबदबा

Rohit Sharma Icc Odi Batting Ranking : रोहित शर्मा याने पुन्हा एकदा आयसीसी वनडे रँकिंगमधील पहिलं स्थान पटकावलं आहे. रोहितने काहीही न करता न्यूझीलंडच्या डॅरेल मिचेल याने मागे टाकलं आहे. जाणून घ्या रोहितव्यतिरिक्त टॉप 10 मध्ये इतर किती भारतीय फलंदाज आहेत.

Icc Odi Ranking : रोहितचा नाद नाय, 7 दिवसात हिशोब करत हिटमॅन पुन्हा नंबर 1, भारताचा टॉप 10 मध्ये दबदबा
Daryl Mitchell and Rohit SharmaImage Credit source: PTI
| Updated on: Nov 26, 2025 | 9:49 PM
Share

रोहित शर्मा आणि विराट कोहली टीम इंडियाची अनुभवी जोडी ऑस्ट्रेलिया दौऱ्यानंतर आता मायदेशात दक्षिण आफ्रिकेविरुद्ध एकदिवसीय मालिकेत खेळण्यासाठी सज्ज आहे. उभयसंघातील 3 सामन्यांच्या एकदिवसीय मालिकेला 30 नोव्हेंबरपासून सुरुवात होणार आहे. या मालिकेला अवघे काही तास शिल्लक असताना रोहित शर्माला आनंदाची बातमी मिळाली आहे. रोहितने आयसीसी वनडे रँकिंगमध्ये पुन्हा एकदा अव्वल स्थान पटकावलं आहे. तसेच या रँकिंगमध्ये टीम इंडियाचा दबदबा पाहायला मिळत आहे.

रोहित पुन्हा पहिल्या स्थानी

रोहितने अखेरचा एकदिवसीय सामना हा 25 ऑक्टोबला ऑस्ट्रेलिया विरुद्ध खेळला होता. त्यानंतर आता रोहित बरोबर 1 महिन्यांनंतर एक्शन मोडमध्ये दिसणार आहे. या मोठ्या अंतरामुळे रोहितला आठवड्याआधी 19 नोव्हेंबर रोजी वनडे रँकिंगमधील पहिलं स्थान गमवावं लागलं होतं. न्यूझीलंडचा अनुभवी फलंदाज डॅरेल मिचेल रोहितला मागे टाकत नंबर 1 वनडे बॅट्समन ठरला होता. मात्र रोहितने एकाच आठवड्यात डॅरेल मिचेल याचा हिशोब केलाय. रोहित डॅरेलला मागे टाकत पुन्हा एकदा पहिल्या स्थानी विराजमान झाला आहे.

डॅरेलला दुखापत, रोहितला फायदा

आयसीसीकडून दर आठवड्यात कसोटी, वनडे आणि टी 20i या तिन्ही फॉर्मेटमधील क्रमवारी जाहीर करण्यात येते. या सुधारित एकदिवसीय क्रमवारीत रोहितने पहिल्या स्थानी झेप घेतली आहे. डॅरेल मिचेल याला झालेली दुखापत रोहितसाठी फायदेशीर ठरली. डॅरेलच्या दुखापतीमुळे रोहितला 1 महिना सामना न खेळूनही पहिलं स्थान मिळालं आहे. डॅरेलला दुखापतीमुळे 2 एकदिवसीय सामन्यांत खेळता आलं नाही. त्यामुळे डॅरेलच्या खात्यातील रेटिंग पॉइंट्समध्ये घट झाली.

टॉप 10 मध्ये 4 भारतीय

ताज्या आकडेवारीनुसार, रोहित शर्मा वनडे रँकिंगमध्ये 781 रेटिंग पॉइंट्ससह पहिल्या स्थानी आहे. तर डॅरेल मिचेलच्या खात्यात 766 रेटिंग पॉइंट्स आहेत. रोहित व्यतिरिक्त टॉप 10 मध्ये टीम इंडियाचे 3 फलंदाज आहेत. यामध्ये कर्णधार शुबमन गिल, विराट कोहली आणि श्रेयस अय्यर यांचा समावेश आहे. शुबमन, विराट आणि श्रेयस या तिघांच्या खात्यात 745, 725 आणि 700 इतके रेटिंग पॉइंट्स आहेत.

हार्दिक पंड्या एकमेव ऑलराउंडर

दरम्यान टी 20I रँकिंगमध्ये ऑलराउंडर्सच्या यादीत टॉप 10 मध्ये एकमेव भारतीय आहे. हार्दिक पंड्या सहाव्या स्थानी विराजमान आहे. हार्दिकच्या खात्यात 211 रेटिंग पॉइंट्स आहेत. तर या यादीत झिंबाब्वेचा कर्णधार सिकंदर रझा हा पहिल्या स्थानी आहे. सिकंदर रझा सध्या पाकिस्तान टी 20I ट्राय सीरिजमध्ये खेळत आहे.

भाजपात खळबळ, अजितदादांनी बडा नेता फोडला, थेट पक्षप्रवेश
भाजपात खळबळ, अजितदादांनी बडा नेता फोडला, थेट पक्षप्रवेश.
महाबळेश्वरमध्ये राजमाता जिजाऊंचा ‘सुवर्णतुलादिन' उत्साहात पडला पार
महाबळेश्वरमध्ये राजमाता जिजाऊंचा ‘सुवर्णतुलादिन' उत्साहात पडला पार.
शिवसेना, राष्ट्रवादी पक्ष चिन्हावरील सुनावणी 21 जानेवारीला होणार
शिवसेना, राष्ट्रवादी पक्ष चिन्हावरील सुनावणी 21 जानेवारीला होणार.
अनेक नगरसेवक आमच्या संपर्कात, भाजपच्या बड्या नेत्याचे विधान
अनेक नगरसेवक आमच्या संपर्कात, भाजपच्या बड्या नेत्याचे विधान.
केडीएमसीत ठाकरेंचे नगरसेवक कुणासोबत; काय आली मोठी प्रतिक्रिया?
केडीएमसीत ठाकरेंचे नगरसेवक कुणासोबत; काय आली मोठी प्रतिक्रिया?.
मुंबईत महापौर कोणाचा? राऊतांच्या प्रश्नाला शिरसाट यांचे उत्तर
मुंबईत महापौर कोणाचा? राऊतांच्या प्रश्नाला शिरसाट यांचे उत्तर.
कल्याण डोंबिवली पालिकेत महापौर कोणाचा?; शिंदे-भाजपमध्ये रस्सीखेच सुरू
कल्याण डोंबिवली पालिकेत महापौर कोणाचा?; शिंदे-भाजपमध्ये रस्सीखेच सुरू.
एकनाथ शिंदे नाराज; 'या' आमदारांना डच्चू देण्याची तयारी?
एकनाथ शिंदे नाराज; 'या' आमदारांना डच्चू देण्याची तयारी?.
भाजपचा महापौर होईल, तेव्हा मुंबई शोकसागरात बुडेल; राऊतांचा हल्लाबोल
भाजपचा महापौर होईल, तेव्हा मुंबई शोकसागरात बुडेल; राऊतांचा हल्लाबोल.
फोडाफोडीचा खेळ भाजप शिवसेनेमध्येच होणार; शिंदेंवर राऊतांचा हल्लाबोल
फोडाफोडीचा खेळ भाजप शिवसेनेमध्येच होणार; शिंदेंवर राऊतांचा हल्लाबोल.