ICC Rankings: विराट कोहलीची टॉप 5 मध्ये एन्ट्री, बाबर आझमला दिला धोबीपछाड
आयसीसीने वनडे क्रिकेटची ताजी क्रमवारी जाहीर केली आहे. या क्रमवारीत ऑस्ट्रेलियाविरुद्ध तिसऱ्या वनडे सामन्यात चमकदार कामगिरी करणाऱ्या विराट कोहलीला फायदा झाला आहे. त्याने टॉप 5 मध्ये एन्ट्री मारली आहे. तर बाबर आझमला धक्का बसला आहे.

आयसीसी प्रत्येक आठवड्याला क्रिकेटच्या तिन्ही फॉर्मेटचं मूल्यांकन करत असते. नुकतंच आयसीसीने वनडे क्रिकेटचं मूल्यांकन करत ताजी क्रमवारी जाहीर केली आहे. या वनडे रँकिंगमध्ये मोठी उलथापालथ पाहायला मिळत आहे. टीम इंडियाचा माजी कर्णधार रोहित शर्मा फलंदाजांच्या यादीत पहिल्या स्थानावर कायम आहे. ऑस्ट्रेलियाविरुद्धच्या तीन सामन्यांच्या वनडे मालिकेत त्याने चांगली कामगिरी केली होती. पहिल्या वनडे सामन्यात फेल गेला. मात्र दुसऱ्या वनडे सामन्यात अर्धशतक आणि तिसऱ्या वनडे सामन्यात शतकी खेळी केली. तसेच ऑस्ट्रेलियात पहिल्या दोन वनडे सामन्यात शून्यावर बाद झाल्यानंतर तिसऱ्या वनडे सामन्यात अर्धशतकी खेळी करणाऱ्या विराट कोहलीला फायदा झाला आहे. त्याची वनडे रँकिंगमध्ये टॉप 5 मध्ये एन्ट्री झाली आहे. मागच्या आठवड्यात विराट कोहली एकही वनडे सामना खेळलेला नाही. तरी त्याला त्याचा फायदा झाला. तर पाकिस्तान माजी कर्णधार बाबर आझमला मोठा फटका बसला आहे. आयसीसी वनडे क्रमवारीत दोन स्थानांची घसरण होत सातव्या स्थानावर पोहोचला आहे.
फलंदाज आणि संघाची क्रमवारी
रोहित शर्मा 781 रेटिंगसह पहिल्या स्थानावर, अफगाणिस्तानचा इब्राहिम झाद्रान 764 रेटिंगसह दुसऱ्या, न्यूझीलंडडा डेरिल मिचेल 746 रेटिंगसह तिसऱ्या, भारतीय संघाचा कर्णधार शुबमन गिल 745 रेटिंगसह चौथ्या आणि विराट कोहली 725 रेटिंगसह पाचव्या स्थानावर आहे. दुसरीकडे, वनडे संघाच्या क्रमवारीत टीम इंडियाने 39 सामन्यात 122 रेटिंग मिळवत पहिलं स्थान मिळवलं आहे. तर न्यूझीलंडने 41 सामन्यात 111 गुण मिळवत दुसरं, ऑस्ट्रेलियाने 38 सामन्यात 109 गुण मिळवत तिसरं, पाकिस्तान 39 सामन्यात 102 गुण मिळवत चौथं आणि श्रीलंका 42 सामन्यात 102 रेटिंगसह पाचव्या स्थानावर आहे.
गोलंदाजाची क्रमवारी
आयसीसी वनडे गोलंदाजांच्या क्रमवारीत 710 रेटिंगसह रशीद खान अव्वल स्थानावर आहे, तर इंग्लंडचा जोफ्रा आर्चरची दुसऱ्या स्थानावर घसरण झाली आहे. दक्षिण आफ्रिकेचा केशव महाराज एका स्थानाने घसरून तिसऱ्या स्थानावर पोहोचला आहे. टॉप 10 मध्ये कुलदीप यादव हा भारताचा एकमेव गोलंदाज आहे. कुलदीप यादव सहाव्या क्रमांकावर असून त्याची रेटिंग 634 आहे. तर मोहम्मद सिराज एका स्थानाने पुढे सरकला आहे आणि 15 व्या स्थानावर पोहोचला आहे. तर अक्षर पटेल दोन स्थानांनी घसरून 32 व्या स्थानावर पोहोचला आहे.
