AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

T20I World Cup 2024: वर्ल्ड कप मोड ऑन, बीसीसीआयकडून टीम इंडियाचे इन्साईड फोटो पोस्ट, हार्दिक पंड्या कुठे गेला?

Team India Icc T20I World Cup 2024 : टीम इंडिया रोहित शर्मा याच्या नेतृत्वात टी 20 वर्ल्ड कप 2024 स्पर्धेत खेळणार आहे. त्याआधी बीसीसीआयने खास फोटो पोस्ट केले आहेत. या फोटोत हार्दिक पंड्या कुठेच दिसत नाहीय.

T20I World Cup 2024: वर्ल्ड कप मोड ऑन, बीसीसीआयकडून टीम इंडियाचे इन्साईड फोटो पोस्ट, हार्दिक पंड्या कुठे गेला?
team india rohit sharma icc t20i world cupImage Credit source: BCCI/IPL
| Updated on: May 25, 2024 | 10:58 PM
Share

आयपीएलच्या 17 व्या मोसमातील अंतिम सामना हा 26 मे रोजी चेन्नईतील एमए चिंदबरम स्टेडियममध्ये खेळवण्यात येणार आहे. कोलकाता नाईट रायडर्स विरुद्ध सनरायजर्स हैदराबाद यांच्यात ट्रॉफीसाठी अंतिम लढत होणार आहे. या अंतिम सामन्याआधीच टीम इंडियाच्या चाहत्यांचा वर्ल्ड कप मोड ऑन झाला आहे. आयपीएलच्या अंतिम सामन्यातील दोन्ही संघात वर्ल्ड कपसाठी निवड झालेल्यापैकी एकही टीम इंडियाचा खेळाडू नाही. त्यामुळे टीम इंडिया आता टी 20 वर्ल्ड कप स्पर्धेसाठी भरारी घेण्यासाठी सज्ज झाली आहे. बीसीसीआयने एक्स या सोशल मीडियावर टीम इंडियाचे खास फोटो पोस्ट करत चाहत्यांना आवाहन केलं आहे.

आयसीसी टी 20 वर्ल्ड कप 2024 स्पर्धेचं आयोजन हे अमेरिका आणि वेस्ट इंडिजमध्ये करण्यात आलं आहे. टीम इंडियाचे खेळाडू आणि सपोर्ट स्टाफ रवाना झाले आहेत. बीसीसीआयने एक्स पोस्टमध्ये टीम इंडियाच्या खेळाडूंचे फोटो पोस्ट केले आहेत. या एकूण 4 फोटोंमध्ये कॅप्टन रोहित शर्मासह, शिवम दुबे, सूर्यकुमार यादव,  अर्शदीप सिंह, अक्षर पटेल, मोहम्मद सिराज, रवींद्र जडेजा, कुलदीप यादव, जसप्रीत बुमराह, हेड कोच राहुल द्रविड, पारस म्हांम्ब्रे आणि इतर सपोर्ट स्टाफ दिसत आहे. “अखेर प्रतिक्षा संपली, आम्ही परत आलो आहोत. टीम इंडियासाठी आपला पांठिहा दर्शवूयात”, असं बीसीसीआयने या पोस्टद्वारे चाहत्यांना आवाहन केलंय.

टीम इंडिया वर्ल्ड कपसाठी रवाना झाली आहे. टीम इंडियाच्या खेळाडूंनी शनिवारी संध्याकाळी मुंबईतून वर्ल्ड कपच्या प्रवासाला निघाले. वर्ल्ड कप स्पर्धेचं यजमानपद हे यंदा अमेरिका आणि विंडिजमध्ये करण्यात आलं आहे. टीम इंडिया साखळी फेरीतील सामन्याआधी सराव सामना खेळणार आहे. टीम इंडियासमोर या सराव सामन्यात बांगलादेशचं आव्हान असणार आहे. टीम इंडिया त्यानंतर साखळी फेरीतील पहिले 3 सामने हे न्यूयॉर्कमध्ये खेळणार आहे. त्यानंतर उर्वरित एक सामना हा फ्लोरिडा येथे होणार आहे. टीम इंडिया ए ग्रुपमध्ये आहे. टीम इंडियासह या ग्रुपमध्ये पाकिस्तान, आयर्लंड, यूएसए आणि आयर्लंडचा समावेश आहे. एकूण 20 सहभागी संघांना 5-5 नुसार 4 गटात विभागण्यात आलं आहे.

अखेर प्रतिक्षा संपली, बीसीसीआयचं ट्विट

टीम इंडियाची ही पहिली तुकडी वर्ल्ड कपसाठी रवाना झालीय. ज्या संघांचं आयपीएलमधून आधीच पॅकअप झालं, त्या खेळाडूंचा वर्ल्ड कप संघातील पहिल्या तुकडीत समावेश आहे. तर क्वालिफायरमधून पराभूत झालेल्या संघातील खेळाडू हे दुसऱ्या तुकडीत वर्ल्ड कपसाठी रवाना होतील. तर संजू सॅमसन, यशस्वी जयस्वाल, युजवेंद्र चहल आणि इतर उर्वरित खेळाडू हे दुसऱ्या तुकडीत रवाना होतील.

टी 20 वर्ल्ड कपसाठी टीम इंडिया : रोहित शर्मा (कर्णधार), हार्दिक पंड्या (उपकर्णधार), यशस्वी जयस्वाल, विराट कोहली, सूर्यकुमार यादव, ऋषभ पंत (विकेटकीपर), संजू सॅमसन (विकेटकीपर), शिवम दुबे, रवींद्र जडेजा, अक्षर पटेल, कुलदीप यादव, युझवेंद्र चहल , अर्शदीप सिंग, जसप्रीत बुमराह आणि मोहम्मद सिराज.

राखीव खेळाडू : शुभमन गिल, रिंकू सिंग, खलील अहमद आणि आवेश खान

माणिकराव कोकाटे यांना मोठा दिलासा, जामीन मिळल्याने अटक टळली
माणिकराव कोकाटे यांना मोठा दिलासा, जामीन मिळल्याने अटक टळली.
ठाकरे सेनेच्या शिवतीर्थवर येण्याचं कारण मनसे नेत्यानं स्पष्टच सांगितलं
ठाकरे सेनेच्या शिवतीर्थवर येण्याचं कारण मनसे नेत्यानं स्पष्टच सांगितलं.
कोकाटेंनंतर आणखी एका मंत्र्याचा राजीनामा होणार, उद्धव ठाकरेंचा दावा
कोकाटेंनंतर आणखी एका मंत्र्याचा राजीनामा होणार, उद्धव ठाकरेंचा दावा.
म्हणून सरकारी वकील उज्वल निकम यांना बदला, आरोपी घुलेचा कोर्टाकडे अर्ज
म्हणून सरकारी वकील उज्वल निकम यांना बदला, आरोपी घुलेचा कोर्टाकडे अर्ज.
कोकाटे शिक्षेच्या स्थगितीसाठी कोर्टात, आतापर्यतच्या सुनावणीत काय घडलं?
कोकाटे शिक्षेच्या स्थगितीसाठी कोर्टात, आतापर्यतच्या सुनावणीत काय घडलं?.
मीरा भाईंदरमध्ये 6 तासांचा थरार, लोकवस्तीत शिरलेला बिबट्या अखेर जेरबंद
मीरा भाईंदरमध्ये 6 तासांचा थरार, लोकवस्तीत शिरलेला बिबट्या अखेर जेरबंद.
कोकाटे यांना अटक वॉरंट जारी पण अद्याप सरेंडर नाही, कोर्टात घडतंय काय?
कोकाटे यांना अटक वॉरंट जारी पण अद्याप सरेंडर नाही, कोर्टात घडतंय काय?.
लिओनेल मेस्सीची 'वनतारा'ला विशेष भेट अन् वन्यजीव संवर्धनाचं केलं कौतुक
लिओनेल मेस्सीची 'वनतारा'ला विशेष भेट अन् वन्यजीव संवर्धनाचं केलं कौतुक.
ठाकरे बंधूंचं अस्तित्व 16 तारखेला संपलेलं असेल... भाजप नेत्याचा निशाणा
ठाकरे बंधूंचं अस्तित्व 16 तारखेला संपलेलं असेल... भाजप नेत्याचा निशाणा.
'या' 3 जागांची मनसेकडून मागणी, युतीच्या चर्चेदरम्यान जागावाटपावरून पेच
'या' 3 जागांची मनसेकडून मागणी, युतीच्या चर्चेदरम्यान जागावाटपावरून पेच.