Women’s World Cup 2022: बांगलादेशच्या पोरींचं वादळ, पाकिस्तान नेस्तनाबूत, 5 धावांत 5 विकेट्स घेत विजयी सलामी

आयसीसी महिला विश्वचषक 2022 (ICC Women’s World Cup 2022) स्पर्धेत बांगलादेशविरुद्धही (Bangladesh) पाकिस्तानला (Pakistan) विजय मिळवणे शक्य झाले नाही. बांगलादेशी महिलांनी पाकिस्तानला पराभूत करून स्पर्धेत आपले विजयाचे खाते उघडले.

Women’s World Cup 2022: बांगलादेशच्या पोरींचं वादळ, पाकिस्तान नेस्तनाबूत, 5 धावांत 5 विकेट्स घेत विजयी सलामी
Bangladesh Women’s Team (PAK W vs BAN W) Image Credit source: ICC
Follow us
| Updated on: Mar 14, 2022 | 11:28 AM

मुंबई : आयसीसी महिला विश्वचषक 2022 (ICC Women’s World Cup 2022) स्पर्धेत बांगलादेशविरुद्धही (Bangladesh) पाकिस्तानला (Pakistan) विजय मिळवणे शक्य झाले नाही. बांगलादेशी महिलांनी पाकिस्तानला पराभूत करून स्पर्धेत आपले विजयाचे खाते उघडले. बांगलादेशच्या महिला संघाने विश्वचषकाच्या इतिहासात पाकिस्तानवर पहिला विजय नोंदवला. दुसरीकडे, पाकिस्तानला सलग चौथ्या पराभवाला सामोरे जावे लागले. या सामन्यात प्रथम फलंदाजी करताना बांगलादेशने एकदिवसीय क्रिकेटमधील त्यांची सर्वात मोठी धावसंख्या उभारली, जी पाहून पाकिस्तानचा संघ फलंदाजीसाठी आल्यावर पहिल्या चेंडूपासून दबावात होती. परिणामी पाकिस्तानला दारुण पराभवाला सामोरं जावं लागलं.

बांगलादेशने पाकिस्तानचा 9 धावांनी पराभव केला. बांगलादेशने प्रथम फलंदाजी करताना 50 षटकांत 7 बाद 234 धावा केल्या होत्या. प्रत्युत्तरात पाकिस्तानच्या संघाला 50 षटकांत 9 फलंदाजांच्या बदल्यात केवळ 225 धावा करता आल्या. 234 धावांपूर्वी, बांगलादेशची सर्वोच्च एकदिवसीय धावसंख्या 211 धावा इतकी होती, जी त्यांनी 2019 मध्ये पाकिस्तानविरुद्ध लक्ष्याचा पाठलाग करताना केली होती.

5 धावांत 5 बळी घेत बांगलादेशची पाकिस्तानवर मात

बांगलादेशच्या वनडेतील सर्वात मोठ्या धावसंख्येसमोर पाकिस्तानने आपल्या डावाची चांगली सुरुवात केली होती. या स्पर्धेत पहिल्यांदाच त्यांच्या सलामीच्या जोडीमध्ये अर्धशतकी भागीदारी झाली. 42 व्या षटकात 183 धावा झाल्या. म्हणजेच विजय आता 52 धावा दूर होता, त्या करण्यासाठी 7 विकेट्स आणि 8 षटके शिल्लक होती. सर्वात मोठी गोष्ट म्हणजे खेळपट्टीवर सेट झालेली फलंदाज सिद्रा अमीन क्रीझवर होती. त्यामुळे हा सामना पाकिस्तानचा संघ सहज जिंकेल असे सर्वांना वाटत होते.

पण इतकं सगळं पाकिस्तानच्या बाजूने असूनही पुढच्या 13 चेंडूंमध्ये असं काही घडतं, ज्यामुळे सामन्याचं दृश्यच बदलून जातं. पाकिस्तानची मधली फळी अचानक कोलमडली. 183 धावांवर तिसरी विकेट पडल्यानंतर 188 धावांपर्यंत पाकिस्तानच्या 7 विकेट्स गेल्या होत्या. म्हणजेच 13 चेंडूत केवळ 5 धावांवर 5 फलंदाज पॅव्हेलियनमध्ये परतले. मधली फळी उद्ध्वस्त झाल्यानंतर पाकिस्तानच्या हातून सामना निसटला. बांगलादेशने त्यांच्या आणखी दोन विकेट्स घेतल्या आणि त्यांच्या स्पर्धेतील पहिल्या विजयाची नोंद केली.

इतर बातम्या

ICC WWC 2022: पुरुषांनाही लाजवतील असे दोन झेल आणि रनआऊट, ‘या’ महिला क्रिकेटपटूंनी अचाट कामगिरी, पहा VIDEO

ICC WWC 2022: न्यूझीलंडला मोठ्या फरकाने हरवून ऑस्ट्रेलियाची विजयी हॅट्ट्रिक

IND W vs WI W: मिताली राज, स्मृती मानधना जबाबदारी कधी घेणार? कोच रमेश पोवार म्हणाले…

Non Stop LIVE Update
2017 ला कुठे बैठक झाली? हे सांगू शकतो, मुंडेंचा पवारांबाबत गौप्यस्फोट
2017 ला कुठे बैठक झाली? हे सांगू शकतो, मुंडेंचा पवारांबाबत गौप्यस्फोट.
मतदान करावं म्हणून न्हाव्याची भन्नाट ऑफर, बोटावरची शाई दाखवा आणि...
मतदान करावं म्हणून न्हाव्याची भन्नाट ऑफर, बोटावरची शाई दाखवा आणि....
बूथवर मतदारांच्या रांगा अन् मतदान बंद ठेऊन कर्मचारी करतायत जेवण
बूथवर मतदारांच्या रांगा अन् मतदान बंद ठेऊन कर्मचारी करतायत जेवण.
म्हातार लय खडूस, तिजोरीची किल्ली कंबरेला.., शरद पवारांवर कुणाचा निशाणा
म्हातार लय खडूस, तिजोरीची किल्ली कंबरेला.., शरद पवारांवर कुणाचा निशाणा.
मतदारच नाही, मतदान केंद्र पडली ओस; मतदारांचा मतदानावर का बहिष्कार?
मतदारच नाही, मतदान केंद्र पडली ओस; मतदारांचा मतदानावर का बहिष्कार?.
हे मोदीकृत भाजपाचे षडयंत्र, EVM वर शंका व्यक्त करत राऊतांचा गंभीर आरोप
हे मोदीकृत भाजपाचे षडयंत्र, EVM वर शंका व्यक्त करत राऊतांचा गंभीर आरोप.
राणा दाम्पत्याची बुलेटस्वारी, किती मतांनी विजय? नवनीत राणा म्हणाल्या..
राणा दाम्पत्याची बुलेटस्वारी, किती मतांनी विजय? नवनीत राणा म्हणाल्या...
दुसऱ्या टप्प्यात अनोख्या मतदाराची चर्चा, थेट माकड कडेवर घेऊन केल मतदान
दुसऱ्या टप्प्यात अनोख्या मतदाराची चर्चा, थेट माकड कडेवर घेऊन केल मतदान.
पुन्हा मरायला तयार... मतदानासाठी निघालेले जरांगे पाटील काय म्हणाले?
पुन्हा मरायला तयार... मतदानासाठी निघालेले जरांगे पाटील काय म्हणाले?.
हातांची झोळी केली...सोपे नव्हते मला हरविणे म्हणून...तुपकरांचा हल्लाबोल
हातांची झोळी केली...सोपे नव्हते मला हरविणे म्हणून...तुपकरांचा हल्लाबोल.