AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

IND W vs WI W: मिताली राज, स्मृती मानधना जबाबदारी कधी घेणार? कोच रमेश पोवार म्हणाले…

महिला विश्वचषक 2022 (Womens World Cup 2022) मध्ये न्यूझीलंडकडून दारुण पराभव पत्करावा लागलेल्या भारतीय संघाचं मनोबल खचलं आहे. त्यामुळे संघाचे मुख्य प्रशिक्षक रमेश पोवार (Ramesh Powar) यांनी शनिवारी संघातील वरिष्ठ खेळाडूंना वेस्ट इंडिजविरुद्ध अधिक जबाबदारीने खेळण्याचे आवाहन केले आहे.

IND W vs WI W: मिताली राज, स्मृती मानधना जबाबदारी कधी घेणार? कोच रमेश पोवार म्हणाले...
India women's cricket team Image Credit source: BCCI TWITTER
| Updated on: Mar 11, 2022 | 2:48 PM
Share

मुंबई : महिला विश्वचषक 2022 (Womens World Cup 2022) मध्ये न्यूझीलंडकडून दारुण पराभव पत्करावा लागलेल्या भारतीय संघाचं मनोबल खचलं आहे. त्यामुळे संघाचे मुख्य प्रशिक्षक रमेश पोवार (Ramesh Powar) यांनी शनिवारी संघातील वरिष्ठ खेळाडूंना वेस्ट इंडिजविरुद्ध अधिक जबाबदारीने खेळण्याचे आवाहन केले आहे. न्यूझीलंडविरुद्धच्या सामन्यात भारताची आघाडीची फळी पुन्हा एकदा अपयशी ठरली आणि त्यांना पहिल्या 20 षटकात केवळ 50 धावा करता आल्या. विजयासाठी 261 धावांच्या लक्ष्याला प्रत्युत्तर देताना भारतीय संघ 62 धावांनी पराभूत झाला. पोवार वेस्ट इंडिज विरुद्धच्या (IND W vs WI W) सामन्यापूर्वी व्हर्च्युअल पत्रकार परिषदेत म्हणाले, ‘तो एक दिवस होता जेव्हा गोष्टी आम्हाला अनुकूल घडत नव्हत्या. खरे सांगायचे तर, पहिल्या 20 षटकांतील फलंदाजी पाहून मला आश्चर्य वाटले.’ पण न्यूझीलंडविरुद्धच्या शेवटच्या सहा सामन्यांतील कामगिरी पाहिल्यास, आम्ही आमची रणनीती अतिशय चांगल्या पद्धतीने राबवली होती.’ पोवार म्हणाले की, स्पर्धेपूर्वी तयारीसाठी भरपूर वेळ होता आणि आता चांगली कामगिरी करण्याची वेळ आली आहे.

रमेश पोवार यांनी संघातील ज्येष्ठ खेळाडूंना जबाबदारीने खेळण्यास सांगितले. ते म्हणाले, ‘मिताली, स्मृती आणि झुलनसारख्या ज्येष्ठ खेळाडूंनी आता अतिरिक्त जबाबदारी घेऊन सामने जिंकावे लागतील. त्यामुळे युवा खेळाडूंवर दडपण येणार नाही. मला वाटते विश्वचषकाचे दडपण आहे, पण मला कारणं द्यायची नाहीत. आता चांगलं प्रदर्शन करण्याची वेळ आली आहे. गेल्या सहा महिन्यांपासून आम्ही सराव करत आहोत. आम्ही इंग्लंड आणि ऑस्ट्रेलियाला गेलो आणि न्यूझीलंडला लवकर पोहोचलो. आम्हाला सरावासाठी पूर्ण वेळ मिळाला आहे आणि आता मैदानावर चांगली कामगिरी करण्याची वेळ आली आहे.

न्यूझीलंडविरुद्ध 162 डॉट बॉल

न्यूझीलंडविरुद्ध टीम इंडियाची फलंदाजी निराशाजनक होती. या सामन्यात भारतीय फलंदाजांनी 162 डॉट बॉल खेळले, जे टीम इंडियाच्या पराभवाचे सर्वात मोठे कारण ठरले. या मुद्द्यावर मुख्य प्रशिक्षक पोवार म्हणाले, पहिल्या दहा षटकांमध्ये आक्रमक फलंदाजी करणे महत्त्वाचे आहे. या विश्वचषकात लक्ष्याचा पाठलाग करणे सोपे नाही. एक गोष्ट चांगली होती की, ती खेळपट्टी फलंदाजीला अनुकूल होती. मात्र, पहिल्या 20 षटकांतच आम्ही मागे पडलो.

वरिष्ठ खेळाडू फ्लॉप ठरल्या

स्मृती मानधना, मिताली राज, यस्तिका भाटिया आणि दीप्ती शर्मा यांच्यावर न्यूझीलंडविरुद्धच्या सामन्यात अतिरिक्त प्रयत्न न केल्याबद्दल मोठी टीका झाली. विजयासाठी 261 धावांच्या लक्ष्याचा पाठलाग करताना 62 चेंडूत 71 धावा करणाऱ्या हरमनप्रीत कौरशिवाय कोणीही मोठी खेळी करु शकले नाही. भारतीय फलंदाजांनी 162 चेंडू निर्धाव सोडले, म्हणजेच तब्बल 27 षटकात एकही धाव घेता आली नाही. पहिल्या 20 षटकात संघाला केवळ 50 धावा करता आल्या. याचा दबाव अखेरपर्यंत राहिला.

इतर बातम्या

IND VS SL: कुलदीप यादवला संधी न देताच बाहेर का केलं? जसप्रीत बुमराहने दिलं अजब उत्तर

IPL 2022: लखनौचे 7.5 कोटी रुपये पाण्यात, मॅच विनर खेळाडूला जोफ्रा आर्चरसारखी दुखापत

IND vs WI: वर्ल्ड कपमध्ये आतापर्यंत वेस्ट इंडिज विरुद्ध भारत अजिंक्य, आकडे यावेळी बदलणार?

कल्याण डोंबिवली महापालिकेत शिवसेनेचाच महापौर बसेल
कल्याण डोंबिवली महापालिकेत शिवसेनेचाच महापौर बसेल.
हर्षवर्धन पाटलांच्या कन्या घड्याळ चिन्हावर झेडपी निवडणूक लढणार?
हर्षवर्धन पाटलांच्या कन्या घड्याळ चिन्हावर झेडपी निवडणूक लढणार?.
लातूरमध्ये मोठ्या घडामोडी, ZP निवडणुकीसाठी शेवटचा दिवस असल्याने...
लातूरमध्ये मोठ्या घडामोडी, ZP निवडणुकीसाठी शेवटचा दिवस असल्याने....
KDMC मध्ये मोठा गेम? या पक्षाच्या मदतीने होणार शिंदेंचा महापौर?
KDMC मध्ये मोठा गेम? या पक्षाच्या मदतीने होणार शिंदेंचा महापौर?.
गणितं बदलू शकत नाही, पण चित्र बदलेल, संजय राऊतांचा सूचक इशारा
गणितं बदलू शकत नाही, पण चित्र बदलेल, संजय राऊतांचा सूचक इशारा.
दावोसमध्ये मुख्यमंत्र्यांची पिकनिक; संजय राऊतांची खोचक टीका
दावोसमध्ये मुख्यमंत्र्यांची पिकनिक; संजय राऊतांची खोचक टीका.
महाराष्ट्राचं पालघर गुजरातमध्ये विलीन झालं का?
महाराष्ट्राचं पालघर गुजरातमध्ये विलीन झालं का?.
पालघरमध्ये12 मागण्यांसाठी जिल्हाधिकारी कार्यालयासमोर ठिय्या आंदोलन
पालघरमध्ये12 मागण्यांसाठी जिल्हाधिकारी कार्यालयासमोर ठिय्या आंदोलन.
मुंबईचा महापौर कुणाचा? दिल्लीतून ठरणार की...
मुंबईचा महापौर कुणाचा? दिल्लीतून ठरणार की....
वाशीममध्ये लाडक्या बहिणीचा हप्ता बंद झाल्याने महिला आक्रमक
वाशीममध्ये लाडक्या बहिणीचा हप्ता बंद झाल्याने महिला आक्रमक.