AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

IND vs NZ : टीम इंडियाची आर या पार सामन्यात न्यूझीलंड विरुद्ध बॅटिंग, प्लेइंग ईलेव्हनमध्ये 1 बदल

India Women vs New Zealand Women Toss and Playing 11 : यजमान टीम इंडियासाठी उपांत्य फेरीच्या हिशोबाने न्युझीलंड विरुद्धचा सामना हा करो या मरो असा आहे. उपांत्य फेरीत पोहचण्यासाठी भारताला कोणत्याही स्थितीत हा सामना जिंकावा लागणार आहे.

IND vs NZ : टीम इंडियाची आर या पार सामन्यात न्यूझीलंड विरुद्ध बॅटिंग, प्लेइंग ईलेव्हनमध्ये 1 बदल
IND vs NZ Womens TossImage Credit source: bcci women X Account
| Updated on: Oct 23, 2025 | 3:25 PM
Share

आयसीसी वनडे वुमन्स वर्ल्ड कप 2025 स्पर्धेतील 24 व्या सामन्यात टीम इंडिया विरुद्ध न्यूझीलंड आमनेसामने आहेत. दोन्ही संघांचा हा या स्पर्धेतील सहावा सामना आहे. हरमनप्रीत कौर हीच्याकडे भारतीय संघाच्या नेतृत्वाची जबाबदारी आहे. तर सोफी डेव्हाईन न्यूझीलंडच्या कर्णधारपद सांभाळत आहेत. या सामन्याचं आयोजन हे नवी मुंबईतील डी वाय पाटील स्टेडियममध्ये करण्यात आलं आहे. सामन्याला दुपारी 3 वाजता सुरुवात होणार आहे. त्याआधी 2 वाजून 30 मिनिटांनी टॉस झाला. न्यूझीलंडने टॉस जिंकत भारताला बॅटिंगसाठी भाग पाडलं आहे.

दोन्ही संघांसाठी शेवटची संधी

वनडे वर्ल्ड कप स्पर्धेत आतापर्यंत 3 संघांनी सेमी फायनलमध्ये धडक दिली आहे. ऑस्ट्रेलिया, दक्षिण आफ्रिका आणि इंग्लंडने उपांत्य फेरी गाठली आहे. तर आता 1 जागेसाठी भारत आणि न्यूझीलंडमध्ये जोरदार चुरस आहे. हा सामना जिंकणारा संघ उपांत्य फेरीत पोहेचेल. त्यामुळे या सामन्यात चांगलीच चुरस पाहायला मिळणार आहे.

टीम इंडिया चौथ्या स्थानी

या स्पर्धेत टीम इंडिया आणि न्यूझीलंड दोन्ही संघांची सारखीच कामगिरी राहिली आहे. दोन्ही संघांनी 5 पैकी 2 सामने जिंकले आहेत. मात्र न्यूझीलंडच्या तुलनेत टीम इंडियाचा नेट रनरेट चांगला आहे. त्यामुळे टीम इंडिया पॉइंट्स टेबलमध्ये चौथ्या स्थानी आहे. तर न्यूझीलंड पाचव्या क्रमांकावर आहे.

टीम इंडियात एकमेव बदल

दरम्यान कॅप्टन हरमनप्रीत कौर हीने न्यूझीलंड विरूद्धच्या सामन्यासाठी प्लेइंग ईलेव्हनमध्ये 1 बदल केला आहे. हरमनने ऑलराउंडर अमनजोत कौर हीला बाहेर केलं आहे. तर जेमिमाह रॉड्रिग्सला संधी दिली आहे. जेमिमाहला या स्पर्धेत अपवाद वगळता काही खास करता आलेलं नाही. त्यामुळे आऊट ऑफ फॉर्म असलेल्या जेमीसाठी ऑलराउंडर आणि मॅचविनर अमनजोतला निर्णायक सामन्यातून डच्चू का दिला? असा प्रश्नही या निमित्ताने उपस्थित केला जात आहे.

वूमन्स टीम इंडिया प्लेइंग ईलेव्हन : प्रतिका रावल, स्मृती मंधाना, हरलीन देओल, हरमनप्रीत कौर (कर्णधार), जेमिमाह रॉड्रिग्स, दीप्ती शर्मा, रिचा घोष (विकेटकीपर), स्नेह राणा, क्रांती गौड, श्री चरणी आणि रेणुका सिंग ठाकूर.

न्यूझीलंड प्लेइंग ईलेव्हन : सोफी डेव्हाईन (कॅप्टन), सुझी बेट्स, जॉर्जिया प्लिमर, अमेलिया केर, ब्रुक हॅलिडे, मॅडी ग्रीन, इसाबेला गेज (विकेटकीपर), जेस केर, रोझमेरी मायर, ली ताहुहू आणि ईडन कार्सन.

भाजपात खळबळ, अजितदादांनी बडा नेता फोडला, थेट पक्षप्रवेश
भाजपात खळबळ, अजितदादांनी बडा नेता फोडला, थेट पक्षप्रवेश.
महाबळेश्वरमध्ये राजमाता जिजाऊंचा ‘सुवर्णतुलादिन' उत्साहात पडला पार
महाबळेश्वरमध्ये राजमाता जिजाऊंचा ‘सुवर्णतुलादिन' उत्साहात पडला पार.
शिवसेना, राष्ट्रवादी पक्ष चिन्हावरील सुनावणी 21 जानेवारीला होणार
शिवसेना, राष्ट्रवादी पक्ष चिन्हावरील सुनावणी 21 जानेवारीला होणार.
अनेक नगरसेवक आमच्या संपर्कात, भाजपच्या बड्या नेत्याचे विधान
अनेक नगरसेवक आमच्या संपर्कात, भाजपच्या बड्या नेत्याचे विधान.
केडीएमसीत ठाकरेंचे नगरसेवक कुणासोबत; काय आली मोठी प्रतिक्रिया?
केडीएमसीत ठाकरेंचे नगरसेवक कुणासोबत; काय आली मोठी प्रतिक्रिया?.
मुंबईत महापौर कोणाचा? राऊतांच्या प्रश्नाला शिरसाट यांचे उत्तर
मुंबईत महापौर कोणाचा? राऊतांच्या प्रश्नाला शिरसाट यांचे उत्तर.
कल्याण डोंबिवली पालिकेत महापौर कोणाचा?; शिंदे-भाजपमध्ये रस्सीखेच सुरू
कल्याण डोंबिवली पालिकेत महापौर कोणाचा?; शिंदे-भाजपमध्ये रस्सीखेच सुरू.
एकनाथ शिंदे नाराज; 'या' आमदारांना डच्चू देण्याची तयारी?
एकनाथ शिंदे नाराज; 'या' आमदारांना डच्चू देण्याची तयारी?.
भाजपचा महापौर होईल, तेव्हा मुंबई शोकसागरात बुडेल; राऊतांचा हल्लाबोल
भाजपचा महापौर होईल, तेव्हा मुंबई शोकसागरात बुडेल; राऊतांचा हल्लाबोल.
फोडाफोडीचा खेळ भाजप शिवसेनेमध्येच होणार; शिंदेंवर राऊतांचा हल्लाबोल
फोडाफोडीचा खेळ भाजप शिवसेनेमध्येच होणार; शिंदेंवर राऊतांचा हल्लाबोल.