WTC Final 2023 IND vs AUS | रोहित शर्मा याच्या नेतृत्वात टीम इंडिया वर्ल्ड चॅम्पियन होणार का?

World Test Championship Final 2023 IND vs AUS | टीम इंडिया रोहित शर्मा याच्या नेतृत्वात पॅट कमिन्स याच्या ऑस्ट्रेलिया टीम विरुद्ध वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशीप फायनलमध्ये भिडणार आहे.

WTC Final 2023 IND vs AUS | रोहित शर्मा याच्या नेतृत्वात टीम इंडिया वर्ल्ड चॅम्पियन होणार का?
Follow us
| Updated on: Jun 07, 2023 | 12:39 AM

लंडन | टीम इंडियाच्या क्रिकेट चाहत्यांना गेल्या काही महिन्यांपासून ज्या दिवसाची प्रतिक्षा होती, तो आजचाच दिवस. टीम इंडिया विरुद्ध ऑस्ट्रेलिया यांच्यात आजपासून म्हणजेच 7 जूनपासून ते 11 जून पर्यंत वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशीप फायनल सामना रंगणार आहे. तर 12 जून हा राखीव दिवस ठेवण्यात आला आहे. या सामन्याचं आयोजन हे लंडनमधील द केनिंग्टन ओव्हल इथे करण्यात आलं आहे. सामन्याला दुपारी 3 वाजता सुरुवात होणार आहे. भारतीय क्रिकेट संघाचं नेतृत्व रोहित शर्मा करणार आहे.  तर पॅट कमिन्स याच्याकडे ऑस्ट्रेलियाच्या नेतृत्वाची धुरा आहे.

रोहित शर्मा याची आयसीसीच्या अंतिम सामन्यात टीम इंडियाचं नेतृत्व करण्याची पहिलीच वेळ आहे. तसेच टीम इंडियाला 2011 पासून एकदाही आयसीसी वर्ल्ड कप जिंकता आलेला नाही. त्यामुळे रोहित शर्मा आपल्या नेतृत्वात टीम इंडियाची गेल्या 12 वर्षांपासूनची प्रतिक्षा संपवणार का, याकडे भारतीय चाहत्यांचं लक्ष लागलेलं आहे.

आकडे काय सांगतात?

टीम इंडिया विरुद्ध ऑस्ट्रेलिया यांच्यातील कसोटीतील आकडे आपण पाहुयात. टीम इंडिया विरुद्ध ऑस्ट्रेलिया यांच्यात आतापर्यंत एकूण 106 कसोटी सामने खेळवण्यात आले आहेत. ऑस्ट्रेलियाने या 106 सामन्यांपैकी 44 सामन्यांमध्ये विजय मिळवला आहे. तर टीम इंडियाने 32 सामन्यात कांगारुंचा धुव्वा उडवला आहे. दोन्ही संघांना 29 सामने ड्रॉ करण्यात यश आले आहे. तर 1 सामना हा टाय झालाय.

हे सुद्धा वाचा

ऑस्ट्रेलियाने या 44 पैकी 30 सामने घरच्या मैदानात जिंकले आहेत. तर 14 सामने ऑस्ट्रेलियाबाहेर जिंकले आहेत. तर भारताने 23 देशात आणि 9 परदेशात सामने जिंकले आहेत. त्यामुळे आकडेवारीच्या हिशोबाने ऑस्ट्रेलिया भारतावर वरचढ आहे.

WTC Final साठी टीम इंडिया

रोहित शर्मा (कर्णधार), शुबमन गिल, विराट कोहली, चेतेश्वर पुजारा, अजिंक्य रहाणे, इशान किशन (विकेटकीपर), आर. अश्विन, रविंद्र जडेजा, अक्षर पटेल, केएस भरत, शार्दुल ठाकुर, मोहम्मद शमी, मोहम्मद सिराज, उमेश यादव आणि जयदेव उनाडकट.

राखीव खेळाडू | सूर्यकुमार यादव, यशस्वी जयस्वाल आणि मुकेश कुमार

WTC Final साठी टीम ऑस्ट्रेलिया

पॅट कमिन्स (कॅप्टन), स्टीव्ह स्मिथ, डेव्हिड वॉर्नर, स्कॉट बोलँड, ॲलेक्स कॅरी, कॅमेरॉन ग्रीन, मार्कस हॅरिस, जोश हेझलवूड, ट्रॅव्हिस हेड, जोश इंग्लिस, उस्मान ख्वाजा, मार्नस लॅबुशेन, नॅथन लायन , मिचेल मार्श, टॉड मर्फी, मिचेल स्टार्क आणि मॅथ्यू रेनशॉ.

राखीव खेळाडू | मिचल मार्श आणि मॅथ्यू रेनशॉ.

Non Stop LIVE Update
ही धमकी समजा नाहीतर... , राज ठाकरेंच्या टीकेवरून मनसेचा राऊतांना इशारा
ही धमकी समजा नाहीतर... , राज ठाकरेंच्या टीकेवरून मनसेचा राऊतांना इशारा.
सांगलीत तिहेरी लढत, मविआतच बंड अन् ठाकरेंचं वाढलं टेन्शन
सांगलीत तिहेरी लढत, मविआतच बंड अन् ठाकरेंचं वाढलं टेन्शन.
अमरावतीत शरद पवारांचा माफीनामा, ... तेव्हा चूक झाली, यापुढं होणार नाही
अमरावतीत शरद पवारांचा माफीनामा, ... तेव्हा चूक झाली, यापुढं होणार नाही.
वंचित उमेदवाराची माघार, भाजपची डोकेदुखी तर काँग्रेसला मिळणार दिलासा
वंचित उमेदवाराची माघार, भाजपची डोकेदुखी तर काँग्रेसला मिळणार दिलासा.
शिंदेंच्या बंडाचा आणखी एक पत्ता उघडला, टपरीवरून शिंदेंचा ठाकरेंना फोन
शिंदेंच्या बंडाचा आणखी एक पत्ता उघडला, टपरीवरून शिंदेंचा ठाकरेंना फोन.
विशाल पाटलांची बंडखोरी कायम, माघार नाहीच; ‘या’ चिन्हावर लोकसभा लढणार
विशाल पाटलांची बंडखोरी कायम, माघार नाहीच; ‘या’ चिन्हावर लोकसभा लढणार.
माफी मागत शरद पवार म्हणाले, 'ती' चूक पुन्हा कधीच नाही; निशाणा कुणावर?
माफी मागत शरद पवार म्हणाले, 'ती' चूक पुन्हा कधीच नाही; निशाणा कुणावर?.
पत्रकार परिषदेत डुलकी,गोऱ्हेंनी जरा उठा...म्हणताच प्रवक्ते खजबडून जागे
पत्रकार परिषदेत डुलकी,गोऱ्हेंनी जरा उठा...म्हणताच प्रवक्ते खजबडून जागे.
आता उशीर झालाय, ठाकरेंना दिल्लीतून सांगितले; शिंदेंचा मोठा गौप्यस्फोट
आता उशीर झालाय, ठाकरेंना दिल्लीतून सांगितले; शिंदेंचा मोठा गौप्यस्फोट.
पैसे पाठवा अन्यथा,सलमानसारख प्रकरण करू, शरद पवार गटाच्या नेत्याला धमकी
पैसे पाठवा अन्यथा,सलमानसारख प्रकरण करू, शरद पवार गटाच्या नेत्याला धमकी.