AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

T20 World Cup: पाकिस्तानविरुद्धच्या सामन्यात भारताला टेन्शन त्या ’12 चेंडूचं’, गोलंदाजीचं गणित फारचं अवघड

भारताने दोन्ही सराव सामने जिंकले असले तरी सर्वाधिक चिंता ही पाकिस्तान विरुद्धच्या सामन्याची आहे. विश्वचषकातील पहिला सामना असण्यासोबतच पाकिस्तान विरुद्धचा सामना म्हणजे खेळाडूंवर वेगळाच तणाव असतो. अशावेळी गोलंदाजांचं गणितही थोडं अवघड झालं आहे.

T20 World Cup: पाकिस्तानविरुद्धच्या सामन्यात भारताला टेन्शन त्या '12 चेंडूचं', गोलंदाजीचं गणित फारचं अवघड
भारतीय क्रिकेट संघ
| Edited By: | Updated on: Oct 21, 2021 | 4:25 PM
Share

दुबई: एकीकडे टी-20 विश्वचषकाला (T20 World Cup) सुरुवात झाली आहे.  ग्रुप स्टेजमधील सामन्यांचा थरार सुरु असला तरी अनेकांचे खासकरुन भारत आणि पाकिस्ता देशातील क्रिकेटप्रेमींचे लक्ष 24 ऑक्टोबर या तारखेकडे लागले आहे. सुपर 12 गटाचे सामने 23 ऑक्टोबरपासून सुरु झाल्यानंतर भारतीय संघाचा पहिला सामना 24 तारखेला पाकिस्तान विरुद्ध असणार आहे. विश्वचषकातील पहिल्याच आणि त्यात कट्टर प्रतिस्पर्धी पाकिस्तान विरुद्ध असणाऱ्या या सामन्यासाठी भारतीय संघ रणनीती करण्यात व्यस्त असून नेमके अंतिम 11 खेळाडू कोण असतील? या प्रश्नाचं उत्तर शोधत आहे.

दोन्ही सराव सामन्यात भारताने फलंदाजीने समोरच्या टीमला सळो की पळो केलं. त्यामुळे फलंदाजीचा तसा मोठा प्रश्न नाही. पण गोलंदाजीमध्येच भारतीय संघाला थोडा विचार करावा लागणार आहे. कारण टी20 सामन्यामध्ये 5 मुख्य गोलंदाद असले तरी एक अधिकचा पर्याय 6 वा गोलंदाज म्हणून लागतो. याचे कारण 5 पैकी 1 गोलंदाज खराब फॉर्ममध्ये असतोच. कधी आणखी एक गोलंदाजही खराब फॉर्ममध्ये असल्यास 6 वा गोलंदाज अनिवार्य होतो. सध्या भारत 3 वेगवान आणि 2 फिरकीपटूंचा विचार करत आहे.यामध्ये जसप्रीत बुमराह, भुवनेश्वर कुमार, मोहम्मद शमी, रवींद्र जाडेजा आणि वरुण चक्रवर्ती किंवा आर आश्विन यांच्यातील एकजण असे 5 गोलंदाज असतील.  त्यात भारताचा अष्टपैलू हार्दीक गोलंदाजी करत नसल्याने भारतासमोर 6 व्या गोलंदाजाचा प्रश्न निर्माण झाला आहे.

विराट कोहली पर्याय?

वरील प्रश्नाचे उत्तर मिळवण्यासाठी ऑस्ट्रेलियाविरुद्ध भारताने विराट कोहलीकडून दोन ओव्हर देखील टाकून घेतल्या. विराटने देखील केवळ 12 धावाच दिल्या. पण हा एक सराव सामना असल्याने मुख्य सामन्यात मात्र विराटला गोलंदाजी देताना आणखी विचार करणे गरजेचे आहे. विराटने मुख्य सामन्यात 2 ओव्हर टाकून त्यात कमीत कमी धावा दिल्या तरी भारतीय संघाचा हा प्रश्न सुटु शकतो.

भुवनेश्वर आणि राहुलवर टांगती तलवार

भारतीची गोलंदाजी ही पूर्वीपासून एक समस्या आहे. अलीकडे अव्वल दर्जाचे गोलंदाज संघात असले तरी नेमका कोणता खेळाडू कधी फॉर्ममध्ये आहे? असे प्रश्न आहेतच. त्यात सध्या टी20 संघात स्थान देण्यात आलेले गोलंदाज राहुल चाहर आणि भुवनेश्वर कुमार हे खास लयीत दिसत नाहीत. अनुभवी भुवीला स्वींग जमत नसून त्याने इंग्लंडविरुद्धच्या सराव सामन्यात बऱ्याच धावा खालल्या. 4 षटकात 54 धावा देत त्याने एकही विकेट घेतला नाही. तर दुसरीकडे युझवेंद्र चहलच्या जागी संघात आलेल्या राहुल चाहरनेही 4 षटकात 43 धावा देत केवळ एकच विकेट घेतली. त्यामुळे या दोघांना संघात कायम राहण्यासाठी ऑस्ट्रेलियाविरुद्ध चांगली कामगिरी करणं अनिवार्य आहे.

इतर बातम्या

ठरलं की, आपला मुंबईकर रोहीत टीम इंडियाचा कॅप्टन होणार, T20 World Cup नंतर घोषणा

फिल्डिंग कोच आर. श्रीधरच्या जागी ‘या’ माजी भारतीय क्रिकेटपटूची वर्णी?, T20 World Cup नंतर होणार घोषणा

T20 World Cup 2021: श्रीलंकेचा आयर्लंडवर दमदार विजय, सुपर 12 मध्ये दणक्यात एन्ट्री

(In india vs pakistan match which 6th bowler should team india will choose main question fot big event)

...हे श्रीमंत भिकाऱ्यांचं लक्षण, संजय राऊत यांची भाजपवर जहरी टीका
...हे श्रीमंत भिकाऱ्यांचं लक्षण, संजय राऊत यांची भाजपवर जहरी टीका.
नाशकात भूंकप, युतीनंतर ठाकरे बंधूंना धक्का; मनसे-ठाकरे नेते भाजपवासी
नाशकात भूंकप, युतीनंतर ठाकरे बंधूंना धक्का; मनसे-ठाकरे नेते भाजपवासी.
देवयानी फरांदे भावूक; भाजप प्रवेश अन निष्ठावंतांच्या न्यायासाठी उद्रेक
देवयानी फरांदे भावूक; भाजप प्रवेश अन निष्ठावंतांच्या न्यायासाठी उद्रेक.
जागावाटपाचा तिढा फडणवीसांच्या दरबारात, भाजपकडून 115 जणांची नाव निश्चित
जागावाटपाचा तिढा फडणवीसांच्या दरबारात, भाजपकडून 115 जणांची नाव निश्चित.
पुण्यात ठाकरेंची सेना अन् मनसेची युती होणार? कोण किती जागांवर लढणार?
पुण्यात ठाकरेंची सेना अन् मनसेची युती होणार? कोण किती जागांवर लढणार?.
राज ठाकरेंवर माझी नाराजी नाही, पण... दिनकर पाटलांची पहिली प्रतिक्रिया
राज ठाकरेंवर माझी नाराजी नाही, पण... दिनकर पाटलांची पहिली प्रतिक्रिया.
भाजप कार्यकर्त्यांचा विरोध तरीही मनसेचे दिनकर पाटील भाजपात अन्..
भाजप कार्यकर्त्यांचा विरोध तरीही मनसेचे दिनकर पाटील भाजपात अन्...
कोणतीही तडजोड नाही, वंचितकडून काँग्रेसला मोठा प्रस्ताव अन् राज्यात...
कोणतीही तडजोड नाही, वंचितकडून काँग्रेसला मोठा प्रस्ताव अन् राज्यात....
जगताप यांच्या काँग्रेस प्रवेशावरून पुणे शहर काँग्रेसमध्ये नाराजी?
जगताप यांच्या काँग्रेस प्रवेशावरून पुणे शहर काँग्रेसमध्ये नाराजी?.
भाजपचा एकाचवेळी काँग्रेस, ठाकरे सेनेला जोर का धक्का! BJPची ताकद वाढणार
भाजपचा एकाचवेळी काँग्रेस, ठाकरे सेनेला जोर का धक्का! BJPची ताकद वाढणार.